बडव्यांची दुनिया
प्रस्तावना
जंगलावर राज्य करायचं असेल
तर खबरीलाल पोपट पाळून चालत नाही
त्यासाठी सिंव्ह पाळावा लागतो
हा सिंव्ह आपल्यासमोर उभा आहे
फक्त आपल्या किमतीचा भाव जुळावा लागतो
-----------कविता -------
धूर दिसे , काहीही नसे
पोपट करी जो त्रागा
शिकाऱ्यास तो असे भासवे
जणू तोच जीवनधागा
जंगल मंगल पोपटामुळे
पोपट किती रे चपळ
हा नसता तर अवघड असते
पेलले नसते जंगल
बित्तम्बातमी अशी आणतो
जंगलाची जणू नस जाणतो
पोपट पोपट करी शिकारी
काहीच सुचे ना त्याला
पोपट मारी अशी फुशारी
जणू हाच एकमेव जंगलाला
सिंव्ह बिचारा सुखी आपला
मालूम नसे हे त्याला
शिकार्यासी तो देव मानुनी
रोज पूजी तयाल
Taxonomy upgrade extras
सर्कस (कथा)
- डॉ. सुधीर रा. देवरे
त्या एवढ्या एवढ्याश्या पटांगणात एवढी मोठी सर्कस उभी राहील असं कोणालाही वाटलं नव्हतं. तरीही दोन्ही बाजूच्या रस्त्यांना लागून का होईना तिथं सर्कशीचा तंबू दिमाखात उभा दिसत होता. तिकिट काढून आत गेलं की सर्कशीची मांडणी पाहून ती जागा पाहिलेल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नव्हतं. कारण त्या जागेचा संपूर्ण कायापालट झालेला होता. सर्कशीच्या गोल अशा रिंगणाचं व्यासपीठ सोडून बाकीचा जमिनीचा चर खोदून मागे मागे भर टाकून खुर्च्या ठेवण्यासाठी नाट्यगृहासारखा उतार केलेला होता आणि तोही रिंगणाकार. त्या उतारावरच खुर्च्या ठेवून बसण्याची सोय केलेली होती.
धाबा स्टाईल चिकन
नेहमीच पारंपारीक चिकनपासून थोड वेगळ काहीतरी करू म्हणून आंतरजालावर चिकनच्या प्रकाराचा शोध घेतला तेव्हा धाबा स्टाईल चिकन ची रेसिपी दिसली.
मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत? भाग १/३ (आकारमानाने पडणारे फरक)
पूर्वपीठिका
सध्या मी राहतो तिथे उन्हाळा चालू आहे. दक्षिण गोलार्धात असल्यामुळे इथले ऋतू आपल्यापेक्षा उलटे चालतात. त्यामुळे सध्या जिकडे तिकडे भसाभस मुंग्या अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडत आहेत. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्या मुंग्यांची मजा बघत बसणे हा एक आवडता छंद झाला होता. घरात कुठे मुंग्या लागल्या असतील तर त्यांची रांग बघत बघत मूळ स्रोत शोधायचा प्रयत्न करणे, रांगेच्या मध्येच बोटाने पुसून त्यांची रांग अस्ताव्यस्त करणे, मुंग्यांच्या भोवती पाणी शिंपडून त्याचं वर्तुळ करणे आणि मुंग्यांना हा भवसागर पार करून जाता येतं का ते पाहणे - असले अनेक उद्योग तेव्हा केलेत!
मिसळपाव