Skip to main content

जनुक जिन्याची सर्पिल वळणे

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 03/01/2019 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
जनुक जिन्याची सर्पिल वळणे अणुगर्भातिल अदम्य लवथव सूक्ष्माच्या प्रत्येक विभ्रमीे कल्पिताहुनी अद्भुत वास्तव अथांगासही क्षुद्र ठरविते असीम व्याप्ती विश्वाची प्रकाशवर्षे मोजुनी थकती स्थलकालाच्या थिट्या मिती शून्यस्पर्शी अन् अपार- व्यापक ताणे-बाणे गहनाचे तरल तलम सूक्ष्माचे तंतू विणती वस्त्र विराटाचे
काव्यरस

मुंबईचे धडे - ३

लेखक मालविका यांनी गुरुवार, 03/01/2019 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी ठाण्याला राहत होते. माझी आत्या पार्ल्याला राहायची. तिच्याकडे तिची जाऊ दीर एकत्र राहायचे.त्यामुळे आत्याची दोन शिवाय जावेची दोन अशी ४ साधारण माझ्याच वयाची मुलं तिच्याकडे होती. त्यात माझा कोकणातला चुलत भाऊ नोकरीसाठी तिच्याकडे येऊन राहिलेला. त्यामुळे तिकडे मजा यायची. वेळ मजेत जायचा. म्ह्णून मला तिकडे राहायला जायला खूप आवडायचं. पण लोकलने फक्त विद्याविहारला जायची सवय होती. दुसरीकडे कधी गेले नव्हते. अशीच एकदा शनिवार रविवार क्लासला सुट्टी मिळाली म्हणून आत्याकडे जायची जाम इच्छा झाली. पण जाणार कसं? आत्याला फोन केला कि यायचंय पण कशी येऊ? तिने सोप्पा उपाय सांगितला.

शवविच्छेदन...... भाग - ४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 03/01/2019 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
शवविच्छेदन...... भाग - १ शवविच्छेदन...... भाग - २ शवविच्छेदन...... भाग - ३ ....जी साठ वर्षाची म्हातारी मेली होती ती एका बाटलेल्या जमिनदाराची बायको होती. अर्थात त्या गावातील जमिनदाराची ! म्हणजे फार काही श्रीमंत नव्हती पण ते कुटुंब खाऊनपिऊन सुखी होते. घरी गाई म्हशी होत्या आणि ती शरीराने चांगली सुदृढ होती. तिने आयुष्यभर विजापूरला जाऊन गोलघुमट पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते पण तेही तिला शक्य झाले नव्हते.

Sbi क्रेडिट कार्ड वापर

लेखक डोके.डी.डी. यांनी बुधवार, 02/01/2019 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपा सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. डिसेंम्बर 2018 मध्ये मी HDFC व sbi या दोन्ही बँकेत माझे बचत खाते आहे . या दोन्ही बँकेत क्रेडिट कार्ड साठी अर्ज दिले होते. त्यातील sbi चे सिम्पली सेव्ह हे क्रेडिट कार्ड मला काल मिळाले. मी क्रेडिट कार्ड पहिल्यांदाच वापरणार आहे तरी नेमके कोठे वापर करावा , कोठे वापरू नये, आणि त्याचा जास्तीत जास्त फायदेशीर वापर कसा करता येईल याविषयी जर आपल्या सूचना आणि अनुभव असतील तर नक्की द्या. धन्यवाद!!!

सकाळी सकाळी

लेखक प्रमोद पानसे यांनी बुधवार, 02/01/2019 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
ग्लोबल इंटरनॕशनल स्कुलच्या प्री प्रायमरी सेक्शनच्या गेटवर आज एक नाट्य बघायला मिळालं.मी नेहमी सकाळी कामाला जाताना धवल मधे चहा प्यायला थांबतो .आजही चहा घेत असताना.समोर एक गाडी थांबली.आतुन एक पारोसा झोपाळलेला ,केस विस्कटलेला बाबा त्याचं गोंडस पिल्लु घेउन बाहेर पडला.गुबगुबीत जर्कीनच्या आतलं तेवढंच गोंडस गोरंगोरं बाहुलं बापाच्या गळ्याला मिठी मारुन बसलं होतं.एका खांद्यावर त्या बाहुल्याचं शिक्षण बांधलेली धोपटी आणी दुसर्या खांद्यावर बाहुली असा लवाजमा घेत कसंबसं गाडीचं दार लावुन आणी बाहुल्याची पप्पी घेत गप्पागोष्टी करत बाप शाळेच्या गेटकडे पोहचला.गेटवरच्या वॉचमन कडे सॕक देत बापाने लेकराला खाली उतरवले.चि

आरंभशूर

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 02/01/2019 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
``तूच ठरवतेस, आज व्यायाम सुरू करायचा. आज डायरी लिहायला सुरुवात करायची, आजपासून कामात जास्त लक्ष द्यायचं, टाइमपास करायचा नाही, सोशल मीडिया कमी वापरायचं, व्हर्च्युअल जगात जास्त वावरायचं नाही, सकाळी लवकर उठायचं, माती नि मसणं करायचं!`` ``मग?`` ``मग` काय `मग`? तू मागचापुढचा विचार न करता संकल्पांना होकार देऊन टाकतेस आणि आम्हाला ते पाळत बसावे लागतात ना!``

गावाची रचना

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/01/2019 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे कोणत्याही गावाला पूर्वी शीव असायची. गावातून बाहेर पडायला दरजा असायचा. गावाच्या आजूबाजूला कोट म्हणजे भिंत असायची. अथवा गावांतील घरांची रचनाच अशी असायची की घराच्या पुढच्या दारातून गावात प्रवेश व्हायचा तर मागच्या दारातून गावाबाहेर मळ्यात- खळ्यात वा प्रात:र्विधींसाठी जाता येत असे. या व्यतिरिक्‍त गावाला कुठे कुठे‍ खिंडी असत. या खिंडींमधून पांदीने शेतात बैलगाडीतून जाता येत असे. गावात येणार्‍या व्यक्‍तीला गावाच्या मुख्य दरवाजातूनच गावात प्रवेश करावा लागे. आणि गावाबाहेर जाण्यासाठी सुध्दा. गावाची शीव वेगळी आणि दरजा वेगळा.

Catharsis - 1 घालमेल

लेखक अमलताश_ यांनी मंगळवार, 01/01/2019 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
तर आडवी आली ती जात. म्हणजे कसं, तो एक राजा नाही का जो जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरी असं सगळ्यांना वाटत असतं? तस्साच attitude . पण इथे झाला घात. सोयी-सुविधांनी सज्ज असं समुद्रा - काठचं राज्य. त्यात गाई गुरं , कुत्रे मांजरं , असलेलं , हसतं खेळतं घर. अश्या घरावर स्वारी केली आंतरजातीय विवाहाने. मग राजे लढले. लढाईच्या गोष्टी तेवढ्याच मधुर असतात हं , बाकी सगळं कडू. म्हणजे कल्पना करा , तुम्ही ज्या मुलांना कष्टाने वाढवलं , आपल्या पायावर उभं राहायला शिकवलं , ती मुलं चक्क त्या ज्ञानाचा वापर करू लागली ? काय ते संकट. निर्णय काय घेतात, तार्किक उत्तरं काय देतात ....

माझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 01/01/2019 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा एक-हजारावा (१०००वा) पोस्ट. १ जानेवारी २००७ पासून मी माझा “कृष्ण उवाच” हा ब्लॉग लिहायला घेतला. ह्या वर्ष अखेर बारा वर्ष होतील ह्या लिखाणाला.