Skip to main content

आ..आ... च्छी ! अर्थात अ‍ॅलर्जिक सर्दी

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 31/12/2018 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आपल्याकडे थंडी पडली आहे. पहाटे व रात्री एकदम थंड तर दुपारी बऱ्यापैकी गरम असे विषम हवामान अनेक ठिकाणी आहे. आता पुढचे ३ महिने हवेतील अ‍ॅलर्जिक सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढत जाईल. मग या लेखाच्या शीर्षकात लिहिल्याप्रमाणे बऱ्याच जणांना फटाफट शिंका येत राहतील. त्यापुढे जाऊन सर्दी अथवा नाक बंद होणे, डोळे चुरचुरणे आणि एकूणच बेजार होणे अशा अवस्था येऊ शकतील. एकंदर समाजात या त्रासाचे प्रमाण लक्षणीय आहे आणि दिवसेंदिवस ते वाढतच आहे.

हंपी आणि हंपी..भाग 2

लेखक हर्षद खुस्पे यांनी रविवार, 30/12/2018 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
गाडीने ४ तास घेणाऱ्या प्रवासाला रेल्वेने ६ तास घेऊन एकदाचे ताकारी ला येऊन पोहोचलो . बीबी एक तरफ और बीबी का भाई एक तरफ हे वाक्य सार्थ ठरवत गाडी घेऊन जिजाजी वेळेवर घ्यायला आले. दुसऱ्यादिवशी ०६:३० ला सकाळी आमचा प्रवास सुरु झाला आणि बायको आणि बहिणीने उद्धार केला कि ०५:३० ला निघायचे होते आणि तब्बल एक तास उशिरा निघालो आहोत. आता ह्यावर आम्ही तोंड बंद ठेवायचे सोडून म्हटले अरे आमच टार्गेटच सकाळी ०६:०० वाजता च होत पण तुम्ही लवकर आवरावे म्हणून खोटी वेळ सांगितली . झाले तोंडाचा जो दांडपट्टा सुरु झाला की बापरे बाप.

वेदना जहरी

लेखक चांदणशेला यांनी रविवार, 30/12/2018 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
अनोळखी गंध कुणाचा आला दारी अंगणातल्या मोगऱ्याची गेला करुन चोरी वाट कुणाला पुसू त्याच्या गावाची सांगेल कुणी कहानी त्याच्या नावाची होऊन शहाऱ्यांचे भाले रुतले माझ्या उरी पाचोळ्यांच्या रानात फुलली ठिणगी पेटू लागल्या ज्वाला साऱ्या अंगी डोळ्यांत उगवली माझ्या प्रीत प्यारी आठवणींची भरुन येते रात सूर कुणी पेरले या ओठांत सोसते मी एकांताची वेदना जहरी

सिंहगडाची अखेरची लढाई (भाग २)

लेखक मनो यांनी रविवार, 30/12/2018 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
१८१७ सालच्या दसऱ्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. खडकी, येरवड्याच्या लढाईनंतर इंग्रजांनी पुणे घेतले, पण बाजीरावाने आपला खजिना आणि मौल्यवान वस्तू आधीच सिंहगड आणि रायगडावर हलवल्या होत्या. त्यामुळे २० फेब्रुवारी १८१८ या दिवशी साताऱ्याहून ब्रिटिश फौज सिंहगडच्या परिसरात पोचली. या फौजेने कुठे तोफा चढवल्या होत्या त्याचा एक नकाशा लढाईनंतर एका वर्षातच कर्नल व्हॅलेंटाईन ब्लॅकर याने एका पुस्तकात प्रकाशित केला.

स्टॅचू ऑफ युनिटी - सरदार पटेलांचा अतिभव्य पुतळा !!!!

लेखक माझीही शॅम्पेन यांनी शनिवार, 29/12/2018 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
३१ ऑक्टोबरला मोदींनी ह्या भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण केल्यावर कधी एकदा हा पुतळा पाहतो असं झालं होत , माहितीतील बऱ्याच जणांना काही अधिक माहिती आहे का हे विचारून झालेलं पण काहीही माहिती हाती लागली नाही , नंतर एकाशी बोलताना टेन्ट सिटी नावाचं काही तरी राहायला आहे एवढा धागा घेऊन आणि गुगल बाबाला साकडं घालून प्लॅन सुरु केला.

कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 29/12/2018 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली सखे काय सांगू. कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली * घेता मिठीत त्याने,आग अंगास लावली अधराने अधरावर प्रेम कविता कोरली सुटले भान पदराचे, गळून पडली चोळी कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली * स्पर्शिता उरोज त्याने,श्वास माझे थांबले, धुंद मिटल्या नयनी,कामस्वप्ने तरळले गात्र गोजिरी स्वप्ने फुलली,ग्लानी आली कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली ना डोळ्यास डोळा.
काव्यरस

तुला चाहते रे नवी कोरी मालिका

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 29/12/2018 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
तुला चाहते रे नवी कोरी मालिका मालिका सस्पेन्स प्रेम बदला प्रेमाचा त्रिकोण आदी मसाला ठासून भरला असून ती प्रत्यक्ष पाहण्यात मजा आहे साधारण गोषवारा असा आहे विक्रम पायमोजे ह्याच्या हजारो एकर चहा च्या बागा असतात उलाढाल साधारण पाच रे सहा हजार कोटीच्या घरात असते एकदा पायमोजे व त्यांच्या मातोश्री मळ्याची पाहणी करण्या साठी येतात शेतात कामगार काम करत असतात व त्याच मळ्यात ईशा हातमोजेा ना वाची अल्लड मुलगी काम करत असते तिच्या अनुपम सौंदर्या मुळे पायमोजेच तिच्या कडे लक्ष जाते व पायमोजे तिच्या प्रेमात पडतो ईशा मात्र "तुला चाहते रे तुला चाहते जरी आंधळी मी तुला चाहते " हे गाणे गुणगुणत चहाची पाने

'वों' च्या ऐस्या (निसटत्या) बाजू

लेखक माहितगार यांनी शनिवार, 29/12/2018 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
२७ डिसेंबरला तिहेरी तलाक विरुद्धचे बील भाजपा सरकारने लोकसभेत काही सुधारणा करून पुन्हा एकदा पास करून घेतले.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी

लेखक नायकुडे महेश यांनी शनिवार, 29/12/2018 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
जसे वाळवंटी असे निर्जरा, जसे सागराच्या तळाशी धरा, तसा एक तू जीव या भूवरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।। कुणी वृक्षप्रेमी पुकारी तुला, तया जीवनी एक आधार तू, कुणी वृक्षवैरी न ठावे तुला, करी स्वप्न साऱ्यांचे साकार तू, जसा देव नांदे सदा अंतरी ... वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।।
काव्यरस