Skip to main content

चित्रातल्या कळ्या...

लेखक कलम यांनी गुरुवार, 04/10/2018 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नात रंगलेल्या चित्रातल्या कळ्यांनो फुलणे तव बघाया मी अधीर झालो फुलतील फुले तुमची देतील गंध ह्रदया रंगूनी टाकतील अन माझ्याही जीवनाला फुलबाग मग कदाचित मनीही फुलेल माझ्या मन ही म्हणेल गाणे जुळवूनिया सुरांना पसरेल गंध तुमचा गंधीत होई माती होईल पूर्ण गाणे जुळुनी नवीन नाती फाकेल सूर्यबिंब पसरेल दश दिशांना माझेच नवे जग हे दावीन जीवनाला पण ह्या मनास वेड्या सांगू कसे तुम्हाला फुलण्यास वेळ नाही चित्रातल्या कळ्यांना

मारवा

लेखक शिवोऽहम् यांनी गुरुवार, 04/10/2018 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
कालचीच असावी तशी आठवते ती गोष्ट फाटकाबाहेर तुझी वाट पहाताना थकली नव्हती रविवारची आळसावलेली सकाळ आणि तू आलीस, सावळी-सुंदर, किरणांचं पाणी प्यालेले ओले केस घेऊन, सुगंधी.. पाकळ्यांवर दवं सावरणाऱ्या शेलाट्या निशिगंधासारखी. आणि दिसलीस फलाटावर वाट पहाताना त्या घुसमट गर्दीतही तुझं हसू तेवत होतंच तेच आठवतं अजून तुला आठवताना.. पण तुला जाणवले का माझे हात हासत 'दे टाळी!' म्हणताना कधी? जेंव्हा हिंडलो निवांत फुटपाथवर पुस्तकं धुंडाळत असू देत कितीही फसवं आता पण काही घडलं नसतं का निराळं? जेंव्हा तू बोलत होतीस भरभरून जाणाऱ्या क्षणांना थांबवणाऱ्या स्वप्नांबद्दल.. आणि प्रवास थांबूच नये वाटलं होतं मूक पाषाणशिळां

मोढेरा - पाटण - आबू पर्यटन

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 02/10/2018 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
***************************** कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा ***************************** मोढेरा - पाटण - आबू गुजरातचे पर्यटनाच्या दृष्टीने तीन ढोबळ भाग करता येतील. सौराष्ट्रातील पौराणिक महत्त्व प्राप्त असलेले धार्मिक पर्यटन, कच्छमधले नैसर्गिक रण, आणि राज्यात पसरलेली पुरातन कलाकौशल्य असलेली देवळे,मशिदी वगैरे. सापुतारा हे हिल स्टेशन तसे पाहिले तर नाशिकला जवळ असल्याने महाराष्ट्राचेच म्हणता येईल. तरंग हिल हे एक नव्याने उदयाला येत  आहे. अहमेदाबाद,गांधीनगर,वडोदरा,सूरत या मोठ्या शहरांमध्येही बरेच पाहण्यासारखे आहे.

अनवट अलिबाग. इस्राएली अलिबाग. Unconventional Israeli Alibag.

लेखक कौशिक लेले यांनी मंगळवार, 02/10/2018 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
अलिबाग म्हणजे समुद्रकिनारा (बीच) हे समिकरण सागळ्यांनाच माहिती आहे. पण अलिबागाचे काही पैलू कमी माहितीचे आहेत. उदा. २००० वर्षांपूर्वी भारतात आलेल्या ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ - सिनेगाॅग, यहुदी निर्वासितांच्या प्रवेशाचा स्मृतिस्तंभ, ज्यू दफनभूमी, जेरुसलेम गेट. नुकतीच मी या स्थळांना भेट दिली.

Nandini's Diary

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 02/10/2018 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
किती महिने झाले असावेत? सात, आठ? ख्रिसमसची सुट्टी संपून नुकतंच क्लिनिक पुन्हा सुरु झालं होतं. स्कॉटलंडमधल्या या लहानश्या शहरात ख्रिसमसच्या काळात सगळं ठप्पच असतं. जानेवारीत आळोखे पिळोखे देत शहर पुन्हा जागं होतं. त्याच दरम्यान कधीतरी ती पहिल्यांदी आली. रोज घरी जाण्याआधी पुढच्या दिवसाच्या पेशंट्सच्या फाईल्स वरून नजर फिरवते तशी तिचीही फाईल बघितली. वय पन्नाशीच्या पुढे, एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करणारी एलिझाबेथ - लिझ. तिच्या घराच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं. तिथे येणारे बरेच लोक त्या रस्त्यावर आजूबाजूला गाड्या पार्क करत. आसपास राहणार्या लोकांना हा तसा त्रासच होता.

राधिकेचा फोन

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 02/10/2018 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुनाथ शयाना सोबत गुटरगूं करत आहे, तेवढ्यात मोबाईलची घंटी वाजते,काहीसा वैतागून गुरुनाथ फोन उचलतो गुरुनाथ: हं, बोल राधिका राधिका: अहो, मला तुझी आणि शयानाची माफी मागायची आहे. गुरुनाथ: का! म्हणून? राधिका: तुझे शयना सोबतचे संबंध बघून मला नेहमीच वाटायचे माझा नवरा बाहेरख्याली, व्याभिचारी आहे. आज कोर्टाचा कोर्टाचा निकाल वाचला. माझे डोळे उघडले. त्या शयानाला धडा शिकविण्यासाठी, काय काय केले मी. ते आठवून माझी मलाच लाज वाटते. मला आधीच का कळले नाही, माझा गुरु कधीच चूक वागू शकत नाही. हे असेच आहे, जसे घरात रोज तेच-तेच खाऊन कंटाळा आला कि आपण हॉटेल मध्ये जातोच ना. आता मी कधीच तुमच्या आड येणार नाही.