उर्वरित खनिजे व लेखमालेचा समारोप
(खनिजांचा खजिना : लेखांक ७)
या अंतिम लेखात आपण ५ खनिजांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
मॅग्नेशियम :
हा कॅल्शियम व फॉस्फरसचा हाडांमधला अजून एक साथी आहे.
आहारातील स्त्रोत:
हिरव्या पालेभाज्या, अख्खी धान्ये, वाटाणा, चवळी, बदाम इ. ते भरपूर प्रमाणात असते.
शरीरातील कार्य
मॅग्नेशियम मुख्यतः पेशींच्या आत आढळते. हाडांत त्याचा बऱ्यापैकी साठा असतो आणि तो त्यांच्या बळकटीस उपयुक्त असतो. पेशींत ते जवळपास ३०० एन्झाइम्सचे गतिवर्धक म्हणून काम करते.
मिसळपाव
बंगाली बाबा
रोज पेपरात, लोकलट्रेनमधे अशा बंगाली बाबूंच्या कडून वशीकरण आणि मुठ मारणे वगैरे हातखंडे वापरून जनतेला त्यांच्या वैयक्तिक कटकटी, शारीरिक समस्या, सहजासहजी सोडवायची हमी देणार्या छोट्या मोठ्या जाहिराती वाचून आपण सोडून देतो. काहीजण त्यांच्याकडे जाऊन समस्त समस्यांवर तोडगे, तोटके यांवर अवलंबून त्यांच्या आधीन होतात. त्यांना खरोखरच त्या उपायांनी हवा तो परिणाम साधला आला कि नाही याची शहानिशा करता येत नाही...
अशी कामे भरपूर वेळ आणि पैसे खर्च करायला लावणारी असतात हे ओघाने आलेच.