पिया तू अब तो आजा.....
पिया तू अब तो आजा.....
रेडियोवर 'पिया तू अब तो आजा....' ची लकेर उठली की लालभडक फ्रिलच्या ड्रेस मधली हेलन डोळ्यासमोर येते.... आशाताईंचा आवाज जणूकाही हेलनसाठीच आहे असं वाटण्याइतपत हेलन आशाताईंच्या आवाजात विरघळते आणि आशाताई तिच्या नृत्यात! गाणं एकवेळ कोणीही सुरात म्हणू शकेल; पण आशाताई हे असं रसायन आहे की ज्यांनी श्वासाला देखील सूर-ताल-ह्रिदम दिला आहे. त्यांचं ते 'आ.. आ... आआ....' आपण बाथरूममध्ये देखील करू शकणार नाही... मग इतर कोणासमोर तर प्रश्नच येत नाही.
लता मंगेशकर हे भारताला पडलेलं एक नाजूक स्वप्न आहे; आणि आशा भोसले म्हणजे भारताचं चिरतारुण्य आहे!
मिसळपाव