सामानाची यादी
सामानाची यादी
आज मुलीने पुढाकार घेऊन बाजारातून आणावयाची सामानाची यादी दिली. पूर्वी आई द्यायची तशी. फरक इतकाच की आई मराठीतूंन यादी देत असे मुलगी इंग्रजीतूंन लिस्ट देते. दोन्ही याद्या जोडणारा कॉमन दुवा म्हणजे मी. नातीने आजीचे सुवाच्च अक्षर हुबेहुब उचलले आहे. मधले बापाचे आणि आजोबाचे गलिच्छ अक्षर बायपास करून. यादीत बऱ्याच गोष्टी आहेत त्याला आठवणी आहेत. प्रत्येक जिन्नासाला आठवण वेगळी. मटर म्हटले की एकत्र मटर शेंगा सोलणारे गोलाकार आमच्ये एकत्र कुटुंब डोळ्या समोर उभे रहाते. आई असते, बाबा असतात, पूर्वा असते मी असतो. जो जास्त शेंगा सोलेल त्याला जास्त उसळ मिळेल अशी गमतीची चढाओढ असायची.
मिसळपाव