Skip to main content

पूर

लेखक कहर यांनी शुक्रवार, 07/09/2018 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
इथे गूढ अंधार दाटून येता, तिथे तारकांचे दिवे लागले मिटताच डोळे हे होतील जागे, पुन्हा आठवांचे थवे मागले जुनी तीच ओढ, जुनी तीच उर्मी, जुनी तीच ती आर्त व्याकुळता भरुनी अकस्मात अस्मान येते नि जाते कडाडून विदयुल्लता दिसेना कुणाला तिच्या अंतरीचे, फुत्कारते जीवघेणे प्रकार "तिळा तिळा" मी किती घोकतो पण उघडीत नाही का हे कवाड अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, डोळ्यांमध्ये उतरते रक्त का ? पितांबरात घुसमटे एक काया, ये कंठात बावनकशी हुंदका मनाच्या तळाशी उदसताच पाणी, त्या वेदनांचा का पूर होतो ? चातकाप्रमाणे आतुर कोणी, उध्वस्त तेव्हा गझल पीत जातो -- विशाल

यात्रा

लेखक शाली यांनी गुरुवार, 06/09/2018 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा सगळा पट्टा तसा सधन. पावसावर होणारी शेती अगदीच नावाला किंवा मग गरजेपुरती. म्हणजे बाजरी, ज्वारी यासाठी. आमच्या वरच्या भागात मात्र पावसाचे प्रमाण जास्त. त्यामुळे तेथे मात्र भातशेतीच प्रमुख. हा भाग म्हणजे माळशेज घाटाचा परिसर. साधारण घाटाच्या अलीकडील, म्हणजे कोळेवाडी, मढ, करंजाळे वगैरे. पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरच्या कुशीत वसलेली गावे. भात खावा तर याच भागातला. आजी सांगायची “भाताच्या पेजेत वात वळून लावली तर दिवा पेटायचा आणि भात शिजलेला साऱ्या गावाला कळायचे असा सुवास पसरायचा.” अर्थात पिढ्या दर पिढ्या सगळ्याच गोष्टींचा दर्जा घसरत गेला.

फ्रायडे नाईट

लेखक लौंगी मिरची यांनी गुरुवार, 06/09/2018 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार आला कि अगदि सकाळपासुनच ह्याची तयारी चालु असते . सगळ्यात पहिली स्टेप माझी मानसिक तयारी करणे , जी लवकर होत नै . मी फारच आढेवेढे घेते , तो तेवढावेळ माझ्या मागेपूढे गोंडा घोळत असतो . सकाळपासुनच “ आज जरा रीलॅक्स व्हायचय , खुप काम केलं आठवडाभर “ . मी गप्प . परत एक दिड तासांनी ,“ थोडेसे हात पाय दाबुन देतेस का , नैतं तो पेन रीलिफ स्प्रे मारुन दे पाठीवर “ . मी गप्प . मग अजुन थोडा वेळ वाट बघुन ,“ आज रात्री तु मस्त चिकनचा रस्सा बनव , अगदि सेम तुझ्या आई सारखा “ ह्यावर मी फक्त “ ह्म्म “ एवढं बोलते . आजकाल त्याने जास्त युक्त्या काढल्यात .

सारंगिया

लेखक मनमेघ यांनी गुरुवार, 06/09/2018 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यातला सारंगिया माझ्या मागे सावलीसा कधी माझ्याहून आर्त कधी मूक अव्यक्तसा कधी माझ्याबरोबर सूर्यसा तू डोक्यावर कधी माझ्याहून दुणा जणू माझ्यातून उणा ! तुझ्यातल्या सारंगीचे रंग, माझा मनःपट, माझ्या सुरांचे कुंचले ओथंबून काठोकाठ विलंबित कधी द्रुत श्वासनि:श्वासांची लय मीट डोळे, पहा मन तुझे माझे चित्रमय ! ~ मनमेघ
Taxonomy upgrade extras

कोणीतरी असावे.......

लेखक फिझा यांनी गुरुवार, 06/09/2018 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
कोणीतरी असावे....... ओठात नाव ज्याचे श्वासासमान यावे । नात्यामधे असेही कोणीतरी असावे ।। रेखाटल्या चित्रांचे रंग फिकेच भासावे । अधुऱ्या स्वप्नांनी आता कुंपणांतच रहावे ।। एकरूप या मनांचे, वचन वेगळे नसावे। जीवघेणे प्रश्न तरी, उत्तराने हसत असावे ।। आयुष्यांचे नकाशे, दूर देशांत दिसावे । भाग्यांमधल्या रेषांनी, क्षितिजांवरी जुळावे ।। घाव हे जखमांचे, त्याच्या फुंकरीने मिटावे । निखारे ओले वाहती, कुणा न ते दिसावे ।। सौद्यात स्वप्नांच्या त्याच्या, अजून काय हरावे । गहाण ठेवले श्वासही , काय उधार मागावे ।। ----फिझा

द्वादशैतानि नामानि

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 05/09/2018 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
अगा वक्रतुण्डा, ध्यान जरा द्यावे जनांसी करावे, थोडे सुज्ञ II १ II अगा एकदंता, ध्वनी प्रदूषण वाढविती जन, ऐकवेना II २ II कृष्ण-पिंग-अक्षा, ऊर्जेची नासाडी करिती आवडी, अज्ञ जन II ३ II अगा गजवक्त्रा, बाजारू संगीत पिडे दिनरात, धाव आता II ४ II अगा लंबोदरा, वर्गणीची सक्ती जुलूमाची भक्ती, थांबवावी II ५ II अगा हे विकटा, साथ नवसाची करी जनतेची, बुद्धी भ्रष्ट II ६ II विघ्नराजेंद्रा रे -जल, भूमी, वात सर्व प्रदूषित, कैसे झाले II ७ II अगा धूम्रवर्णा, पर्यावरणाची जाणीव जनांची, वाढवावी II ८ II अगा भालचंद्रा, क्षुद्र भेदाभेद निरर्थ वितंड, नष्ट करी II ९ II अगा विनायका ,बुद्धीचा तू देव भक्तांना वैभव , बुद

मोबाईल मधील मेमरी कशी वाचवावी?

लेखक सान्वी यांनी बुधवार, 05/09/2018 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
माझा 32 gb इंटर्नल मेमरी चा अँड्रॉइड मोबाईल आहे. त्यात मी गरजेपुरते app ठेवले आहेत. Whatsapp चा autodownload चा option पण बंद ठेवला आहे. तरी आता माझ्या मोबाईल ची मेमरी 31.5 एवढी झालेली दाखवत आहे. ती मेमरी कशी फ्री करू? आणि आणखी एक, सतत नवीन सिस्टीम updates येत असतात. Option फक्त now वर later एवढाच असतो. आणि कधीतरी ते डाउनलोड करावेच लागतात त्यामुळे आणखी मेमरी लागते. याच्यावर काय मार्ग आहे?

मिपावरच्या धाग्यात लाईक सदृश्य बटण कसे समाविष्ट करावे.

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 05/09/2018 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एकदा मिपा वरील धाग्यांना रेटिंग असावे का? अशा प्रकारची चर्चा वाचनात आली होती. त्यावर आलेल्या प्रतिसादांमध्ये रेटिंग नको, परंतु वाचकांना लेखन आवडल्याची पोच देण्यासाठी लाईक सारखे बटण असावे असा सूर होता आणि तो योग्यही वाटला. मिपावरच्या धाग्यांमध्ये 'Applause Button' ह्या थर्ड पार्टी सर्व्हिसचा वापर करून आपण वाचकांना ती सोय सहज उपलब्ध करून देऊ शकतो. रियल टाईम अपडेट होणाऱ्या ह्या बटणावर क्लिक करून मिपाचे सदस्य नसलेले नित्यवाचकही लॉग इन न करताही आपली पसंती कळवू शकतात. खाली दिलेला १० ओळींचा छोटा कोड कॉपी करून लेखात सर्वात शेवटी पेस्ट करायचा.

विक्रमादित्याची दिनचर्या

लेखक तिमा यांनी बुधवार, 05/09/2018 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
बरीच वर्षे, रसायन कंपन्यांच्या 'शोध आणि विस्तार' (कसला बोडक्याचा शोध! भारतांत तरी बहुतांशी विस्तारच) विभागात नोकरीची उमेदवारी केल्यावर, नोकरीच गेल्यामुळे, 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार', अर्थात कन्सल्टन्सी करायला लागलो. मूळचा स्वभाव भिडस्त असल्यामुळे, सुरवातीला अनेकांनी फसवलेच. पण तरीही नेटाने काम करत राहिलो. कामे बहुतेक लहान रासायनिक उद्योगातीलच असायची. त्यासाठी, लांबलांबच्या उद्योगसमूहात प्रवास करुन जावे लागे. अशा ठिकाणी, अनेक वेळा, काही वल्ली भेटत. अशाच एका व्यक्तिमत्वाची ही ओळख! यशाची धुंदी वगैरे, आपण कथा-कादंबऱ्या, नाटके, चित्रपट अशा माध्यमातून पहातो.

बदमाश अँथनी स्मिथ भाग २

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 04/09/2018 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांच्या सुरतच्या लुटीच्या कारवाईची मोहीम पाद्री रेव्हरंड एल इस्कालियट एका पत्रात म्हणतो, 'अँथनी स्मिथ सुटून आल्यावर सांगत असे कि काय आणि किती लूट केली होती शिवाने. तो म्हणाला, मी पाहिलं ना, अश्शा थप्प्या लागल्या होत्या पैशांच्या राशींच्या! २० - २५ (हंड्रेड थाउजंड) लाख तरी रोकड लुटले रोकड! शिवाय ३०० हमालांकरवी मोठ्या पिशव्यात, पोत्यात हिरे, मोती, माणके, असे जड जवाहिरे गच्च भरायच्या कामाला लागले होते त्यांचे सैनिक. विरजी व्होरा, जो त्या वेळी जगातला सर्वात श्रीमंत व्यापारी होता त्या एकट्या कडून ८० लाखाचा माल जप्त केला होता.