वाटणी - एक लघुकथा
त्या माणसाने स्वतःच्या मनाशी ठरवले - हीच मोठी लाकडी पेटी न्यावी. उचलण्याचा प्रयत्न केला तर पेटी एक इंचही हलली नाही. अवजड पेटीशी झटापट करत असतांना दुसरा त्याला बघत होता. ह्या दुसऱ्याला स्वतःसाठी काही सापडले नव्हते.
- 'मी मदत करू का तुला?' त्याने पहिल्याला विचारले. पहिला तयार झाला.
मजबूत हातांनी पेटी उचलून पाठीवर ठेवली. पहिल्याने फक्त हात लावला जरासा. दोघे बाहेर निघाले.
पेटी फारच जड होती. उचलणाऱ्याच्या पाठीला कळ लागत होती. त्याचे पायही दुखू लागले. पण पेटीत असलेल्या घबाडातून मिळणाऱ्या वाट्याच्या अपेक्षेमुळे तो त्रास सहन करायला तयार होता.
मिसळपाव
डाळिंबी वा वालाची उसळ हा मराठी घराघरात होणारा पदार्थ आहे
उसळ खूप चवदार बनते व ती अनेक प्रकाराने बनवली जाते
पण ते वाल भिजत घालणे मोड आणणे सोलाणे ह्या प्रक्रिया खूप उटा रेट्याचा असतात
परवा मंडईत गेलो असताना " वालाची डाळ " हा प्रकार समजला
विकत घेतली व घरी आलो
डाळ भिजत घातली ३- ४ तास भिजल्यावर ती फुगून मोठी झालेली दिसली
साधारण वालाच्या आकाराची
मग कांदा टोम्याटो मसाले वापरून त्याची उसळ / आमटी बनवली
खूप रुचकर लागते
जरूर ट्राय मारा