Skip to main content

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ३

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी मंगळवार, 14/08/2018 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
(थोड्याकाळाचा ब्रेक घेतल्यावर परत दोन नवीन शब्दचित्र लिहितोय) पहील्या दोन भाग इथे पाहता येतील - सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १ सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग २ --------------- सह्याद्रीतील शब्दचित्रे: काल परवाच गाडीने एका ठिकाणी जाण्याची वेळ आली होती. जायचे होते ते ठिकाणाचा नक्की रस्ता माहीत नव्हता.
Taxonomy upgrade extras

करामत - एक लघुकथा

लेखक अनिंद्य यांनी सोमवार, 13/08/2018 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
* * * दंग्यात लुटल्या गेलेला माल जप्त करण्यासाठी पोलिसांनी छापे मारायला सुरवात केली. लोक घाबरले, लुटीचा माल रात्रीच्या अंधारात घराबाहेर फेकू लागले. काहींनी तर स्वतःचाच माल फेकून दिला, उगाच पोलिसांचे झेंगट नको म्हणून. * * * एका माणसाची मात्र पुरती गोची झाली. त्याच्याकडे साखरेच्या दोन गोण्या होत्या, किराणा मालाचे दुकान लुटताना त्याचा हाती तेव्हढेच लागले. रात्रीच्या अंधारात एक गोणी त्याने शेजारच्या विहिरीत कशीबशी ढकलली, पण दुसरी ढकलतांना तोल गेला आणि तोही विहिरीत ! आवाज ऐकून लोक गोळा झाले. दोरखंड टाकून दोन उत्साही वीर विहिरीत उतरले, त्याला बाहेर काढले.

पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान

लेखक मार्गी यांनी सोमवार, 13/08/2018 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर ३० नोव्हेंबर २०१७ ची सकाळ. आज सद्गडहून निघायचं आहे. गामधून समोर काल बघितलेलं ध्वज मंदीर दिसतं! हे ह्या परिसरातलं सर्वोच्च स्थान आहे. तिथे काल मोबाईलला नेपाळी नेटवर्क मिळालं होतं.

खनिजांचा खजिना : लेखमाला प्रारंभ

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 13/08/2018 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच माझी गेले दोन महिने चाललेली जीवनसत्वांची लेखमाला संपली ( https://www.misalpav.com/node/42796). वाचकांना ती उपयुक्त वाटल्याचे व आवडल्याचे प्रतिसादांतून दिसले. त्यातून मिळालेल्या प्रोत्साहनातून आता नव्या लेखमालेस हात घालत आहे. ती आहे जीवनसत्वांचे भाऊबंद असणाऱ्या खनिजांची. खनिजे ही मानवी आरोग्यासाठी आवश्यक अशी पोषणद्रव्ये आहेत. निसर्गात ती विविध खाणींमध्ये असतात. निसर्गदत्त अनेक खानिजांपैकी सुमारे १६ मानवी शरीरास आवश्यक आहेत.

आरोग्यशास्त्रातले युद्धशास्त्र २

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 13/08/2018 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावरचा पहिला धागा : आरोग्यशास्त्रातले युद्धशास्त्र *************************************************************************************** मानवी इतिहास युद्धांनी भरलेला आहे. मात्र त्या इतिहासात फक्त मानवांनी मानवांशी केलेल्या युद्धांचाच समावेश असतो. परंतू, मानवाला रोज इतर जीवांबरोबरही लढा द्यावा लागतो... सर्वसाधारणपणे, त्याला युद्ध न म्हणता "रोगाशी सामना" असे म्हटले जाते. पण, तरीही हे युद्धही काही कमी महत्त्वाचे नाही. किंबहुना, व्यक्तिगत स्तरावर ते जीवनमरणाचा प्रसंग असू शकते...

भारांच्या जगात... ४

लेखक अजिंक्य विश्वास यांनी सोमवार, 13/08/2018 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
भारांच्या जगात... ४ उडती छबकडी- भा. रा. भागवत उडती छबकडी- भा. रा. भागवत उडती छबकडी हा भारांचा विज्ञान(वेड)कथा संग्रह! ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ह्या नुसत्याच विज्ञानकथा नसून वेडकथा देखील आहेत. एक एक कल्पना नुसती धुमाकूळ घालणारी आहे आणि विज्ञानाला धरून देखील आहे. त्या काळी प्रचलित असलेल्या विज्ञान संकल्पना हाती धरून एक सुंदर पार्श्वभूमी निर्माण करण्यात भारांचा हातखंडा होता.

फुटबॉल फायनल आणि जानरावची बायको

लेखक मित्रहो यांनी रविवार, 12/08/2018 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुमाले तो माया पुणेवाला सोबती पवन्या आठवते, तो नाही मले नागपूरले ते का करुन रायली बा पिक्चर पाहाले घेउन गेलता तोच. त्यान मले सांगतल फुटबॉलचा वर्ल्ड कप हाय, मॅचगिच पायजो. मले सारेत असल्यापासूनच फुटबालचा शौक होता. लाथा माराले कोणाले नाही आवडत जी. भेटला बॉल का मारा लाथा. साऱ्या दुनियेचा राग बॉलवरच काढाचा. मास्तरन वर्गाभायेर काढल मारा लाथा, पाउस नाही आला मारा लाथा, कापसाले भाव नाही भेटला मारा लाथा, तूर अळीन खाल्ली मारा लाथा. अशा लाथा माराच्या गेमचा वर्ल्डकप पायलाच पायजे. पण का माणूस ठरवते आन पाउस पाणी फेरते अस झाल.

मिलन

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 11/08/2018 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीच्या स्पंदनांची भावना मी वदतो.... रत्नहार बिंदूंचा.... तव कोमल कंठी शोभतो! लाजुनि तू शलाकेपरी... क्षणार्धात लोपसी... त्या क्षणिक रूपाच्या मोहात; निळावंति मी गुंतलो.... सागर-नभापरि मी तृषार्त... तू बरसती नभरेखा... मिलन आपुले क्षितिजावर... त्या क्षणास मी आतुरलो....
काव्यरस

व्यावसायिक यशाला मदत करणारे मोफत आंतरजालशिक्षण

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 11/08/2018 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही व्यवसायात आणि नोकरीत यशस्वी होण्यासाठी त्यासंबंधीच्या विषयाचे ज्ञान असायला हवे हे सांगायला नकोच. मात्र, त्या ज्ञानाबरोबरच, आंतरजालाचा उपयोग करण्याचे ज्ञानही असले तर तर यशाचा मार्ग जास्त सुकर होतो, याबद्दलही संभ्रम नसावा. पारंपरिक पद्धतीने शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्था आहेतच. पण, संगणकशास्राच्या प्रगतीच्या वेगाच्या तुलनेने त्यांच्यामध्ये असलेले संगणकीय अभ्यासक्रमांत होणारे बदल खूपच कमी वेगाने होतात. त्यामुळे, त्यांच्यातून बाहेर पडणार्‍या पदवी/पदविकाधारकांना बर्‍याचदा, उत्पादक घटक बनण्यासाठी, व्यावहारिक उपयोगासाठी लागणारे संगणकीय शिक्षण स्वतः प्रयत्न करून मिळवावे लागते.

निमंत्रण----"श्यामरंग...त्या त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!"

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 10/08/2018 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
सस्नेह नमस्कार! आम्ही सादर करत असलेल्या "श्यामरंग.....त्या, त्यांचे प्रश्न.. आणि कृष्ण" या नाट्य- संगीत-नृत्याविष्काराच्या प्रयोगासाठी आग्रहाचं निमंत्रण! शुक्रवार दिनांक ३१ ऑगस्ट २०१८. रात्रौ ८.३०ते ११ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, वसंत विहार, ठाणे येथे अंतर्नाद, ठाणे निर्मित, अपूर्व प्राॅडक्शन प्रस्तुत श्यामरंग सादर होतोय. कृष्ण आणि त्याच्या आयुष्यातील स्त्रियांच्या नात्यातील काही अनवट पैलूंवर, प्रश्नांवर, त्यातील रंगांवर आधारित ही कलाकृती आहे. अभ्यासपूर्ण निवेदन, नाट्य, संपूर्णपणे नवीन संगीत, त्यावर आधारित नृत्य असा एकूण थाट आहे. नाट्यक्षेत्राशी काहीही संबंध नसतानाही एक धाडस करतोय.