मैत्र..
अगदी अचानक काहीच न कळवता आपण मित्राच्या घरी धडकावं.
त्याने दरवाजा उघडताच त्याला बाजूला सारून आत शिरावं.
चपला पर्स फेकून खिडकीजवळच्या मऊ गुबगुबीत माऊसारख्या खुर्चीवर धप्पकन बसावं.
आपलं अगडबंब वाढलेलं वजन, परीटघडीच्या ड्रेसला पडणा-या चुन्या, खांद्यावरून डोकावत असलेला किंवा नसलेला चुकार पट्टा कसला कसला विचार मनात येऊ देऊ नये तेव्हा.
"तुझीच आठवण काढली होती मी आज बघ डेविलिणबाई" म्हणत हसत त्यानं ग्लुकोज बिस्किटं आणि पाण्याचा ग्लास पुढे करावा.
खरंतर मनात खुश होत पण वरवर "चल् काहीही खोटं" म्हणत त्याला उडवून लावावं.
अगं हो, तुझ्या आवडीची शेवळाची भाजी केलेली हिने तेव्हा तुझी आठवण आलेली.
मिसळपाव