Skip to main content

दोसतार - १२

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 19/06/2018 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/42737
शाळेची घंटा हे प्रकटन संपायचीच जणू वाट पहात असावी. तास संपला. शाळा सुटली. आठवड्यापुरती का होईना पुस्तकांची काळजी मिटली होते. अर्थात आम्हाला कोणालाच ही काळजी पडली नव्हती. हा भाग वेगळा....
वर्गात पुस्तके नसतील तितके दिवस शिक्षक काही शिकवणार नव्हते. निदान इंग्रजी मराठी आणि इतिहासाचे शिक्षक तरी. गणीताच्या सराना पुस्तक नसले तरी चालायचे. त्यांची बहुतेक सगळी पुस्तके पाठ होती.

कितीसा पुरोगामी आहेस ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/06/2018 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच

लेखणी का कीबोर्ड ? (पूर्वार्ध)

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 19/06/2018 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
पंधराव्या शतकात लागलेला छपाईयंत्राचा शोध हा खरोखर क्रांतिकारक होता. त्यापूर्वी उपलब्ध ज्ञान हे केवळ हस्तलिखित स्वरुपात साठवता येत असे. त्यामुळे त्याच्या समाजप्रसाराला खूप मर्यादा होत्या. छपाईचे तंत्र जसे विकसित झाले, तसे अधिकाधिक माहिती व ज्ञान बहुसंख्यांपर्यंत पोचू लागले. त्यातूनच समाजात लेखनपरंपरा विस्तारली. शिक्षणाच्या प्रसारातून अनेकजण लेखन करू लागले. त्याला छपाईची जोड मिळाल्याने छापील मजकुराची निर्मिती होऊ लागली. अशा प्रकारे ज्ञानप्रसार वेगाने आणि दूरवर होऊ लागला. निरनिराळ्या प्रकारची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी विविध छापील माध्यमे निर्माण झाली.

कुलदिपक भाग ४

लेखक विप्लव यांनी मंगळवार, 19/06/2018 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
मेघा आणि शर्मिष्ठाचा आतेभाऊ एकमेकांकडे टक लावून पहात असतात अगदि भान हरपून, इतकं की त्यांना भोवतालच्या जगाचा विसर पडतो. "अरे काय पाहतोयस असा वेड्यासारखा?" शर्मिष्ठेच्या प्रश्नाने दोघेही भानावर आले. " अग काही नाही . पण तू कितीवेळ करतीयेस? केव्हाचा थांबलोय मी? जायचयं ना आपल्याला आज पुण्याला? तुझं नटनं मुरडणं झालं असेल तर निघायच का ?" आपण पकडले गेलो म्हणून तो मनातून ओशाळला होता, पण त्याचा तसूभरही लवलेश चेहर्यावर जाणवू न देता उलट शर्मिष्ठेवर प्रश्नांची सरबत्ती चालू केली. ह्या सगळ्यात मेघावर चोरून कटाक्ष टाकायला मात्र विसरला नाही हं. आणि मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत असतात.

निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 18/06/2018 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे. निर्लेप ब्रँडची भांडी हा विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अडुसष्ट सालच्या सुमारास सरकारने स्टेनलेस स्टील आयात करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे आताचे निर्लेपचे मालक श्री राम भोगले यांच्या वडिलांनी प्लास्टिकचे ( टेफ्लॉन ) कोटिंग असणारी भांडी बाजारात आणली. हा प्रयोग आपल्या देशात पहिलाच आणि अद्भुतच होता ! निर्लेप यंदा आपल्या उद्योगाचा सुवर्णमहोत्सव साजरे करतो आहे.

राजयोग - १३

लेखक रातराणी यांनी सोमवार, 18/06/2018 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
विजयगढचा किल्ला एका महाकाय डोंगरावर आहे. जंगल किल्ल्याच्या जवळपास जाऊन संपतं. अजस्त्र कातळातला, निळ्या आकाशाला खिजवत उभा असलेला तो किल्ला रघुपतीला जंगलातून बाहेर पडल्या पडल्या समोर दिसला. जंगल झाडावेलींनी पूर्णपणे झाकलेलं तर किल्ला चारीबाजूंनी अभेद्य दगडांनी वेढलेला होता. जंगल सावध तर किल्ला जागरूक. जंगल वाघाप्रमाणे पाय जवळ घेऊन दिमाखात बसलेलं तर किल्ला सिंहाप्रमाणे आयाळ फुलवून मान तिरकी करून उभा! जंगल जमिनीला कान लावून प्रत्येक बारीकसारीक आवाज टिपतंय तर किल्ला जणू नजर रोखून क्षितीजाच्या पार पहातोय. रघुपतीला पाहताच टेहेळणी बुरुजावरचे पहारेकरी सावध झाले. शंख वाजू लागले.

ऑडासिटी कट, पेस्ट, फेड, एक्स्पोर्ट इ. [ऑडिओ-व्हिडीओ एडिटिंग / दृक-श्राव्य संपादन] [भाग २]

लेखक चहाबिस्कीट यांनी सोमवार, 18/06/2018 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाची पीडीएफ लिंक इथे आहे भाग १ https://www.misalpav.com/node/42802 भाग २ https://www.misalpav.com/node/42838

नमस्कार,

पहिल्या भागाची लिंक. मागच्या भागात आपण पाहिलं की आपला आवाज रेकॉर्ड कसा करायचा आणि रेकॉर्डिंग ऑडासिटी मध्ये कशी बघायची.

कच्छी दाबेली

लेखक मानसी१ यांनी रविवार, 17/06/2018 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळी हवा झाली आणि काही तरी चटपटीत खायची इच्छा झाली. घरी मस्त दाबेली चा बेत केला. साहित्य पाव, मसाला दाणे, बारीक शेव उकडलेले बटाटे। 4-5 चिंच खजूर चटणी पुदिना कोथिंबीर चटणी बारीक चिरलेला कांदा डाळिंब दाणे बटर गरम मसाला, पावभाजी मसाला, चाट मसाला, तीखट, मीठ क्रुती कढईत तूप गरम करून त्यात 3 पळ्या गोड चटणी घाला. त्यात कुचकरलेले बटाटे, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा पावभाजी मसाला, 1/2 चमचा चाट मसाला , चवीनुसार मीठ आणि तिखट घाला. सर्व नीट मिसळून घ्या. सारण तयार एक पाव घेऊन मधून चीरा. दोन साइडने. पूर्ण आडवा कापायचा नाही. एका बाजूला गोड चटणी, एका बाजूला तिखट चटणी.

तेज (Discussion on characteristics, properties and classification of fire/energy)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 17/06/2018 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रशस्तपादभाष्याच्या ४थ्या धड्यातील तेज किंवा अग्रि पदार्थांच गुणधर्म, प्रकार, वागण्याच्या तऱ्हा व उपयोग या संबंधीची माहिती या धड‌यात आहे. हे श्लोक ३ऱ्या - ४थ्या शतकातले असून तेव्हाची भारतीयांमध्ये वापरात असलेली तेज-अग्नि-प्रकाश अभ्यासाची पद्धत दर्शवतात. काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे. असो). ४.३: ३८तेजस्त्वाभिसम्बन्धात्तेजः । Fire is that which belongs to the class ‘fire’. तेज या गटात अग्नि इत्यादि सर्व अग्निसमान वस्तूंचा समावेश होतो. रूपस्पर्शसङ्ख्यापरिमाणपृथक्त्वसम्योगविभागपरत्वापरत्वद्रवत्वसंस्कारवत् । It is endowed with – colour, temperature, number, unit of measure, separateness, conjunction, disjunction, distance, proximity, fluidity and the ability to apply force. तेजाला रंग, तापमान, संख्या, परिमाण, वेगळेपणा, जोडलेपणा(येउन जुळणे), विभक्तपणा(लांब जाणे), अंतर, जवळीक(सान्निध्यात राहणे), वहनक्षमता आणि बळ लावण्याची क्षमता या सर्व आहेत. ४.३: ३९पूर्ववदेषाम्सिद्धिः । The fact of these properties belonging to the class ‘fire’ is to be shown, as before, to be indicated in the sutras. हे गुणधर्म आधील प्रमाणेच वैशेषिक सूत्रांमध्येही सांगितलेले आहेत.