राजयोग - १२
पहारेकऱ्यांनी निर्वासनासाठी तयार रघुपतीला विचारलं, "ठाकूर, कोणत्या दिशेला जाणार?"
रघुपती म्हणाला, "पश्चिम दिशेला.."
नऊ दिवस पश्चिम दिशेला प्रवास केल्यानंतर पहारेकरी रघुपतीला घेऊन ढाका शहराच्या जवळपास पोचले. रघुपतीला तिथे सोडून ते परतीच्या प्रवासाला लागले.
रघुपती मनातल्या मनात म्हणाला, "कलियुगात ब्राह्मणाचा शाप फळणार नाही. आता बुद्धीनेच काम करायला हवं. बघूया तरी गोविंदमाणिकय काय चीज आहे आणि मी काय चीज!"
त्रिपुराच्या सीमेलगत एका छोट्या कोपऱ्यात असलेल्या त्या मंदिरात मुघल साम्राज्याच्या बातम्या काही पोचत नसत.
मिसळपाव
*