जयपूर दिल्ली आग्रा ट्रिप - मदत माहिती हवी आहे
नमस्कार मंडळी,
जुलैच्या सुट्टीत जयपूर दिल्ली आग्रा फॅमिली ट्रिप चा प्लॅन आहे. रेल्वे ने दिल्ली ला जाणार.
जाणार:- नाशिक-दिल्ली आग्रा जयपूर दिल्ली - नाशिक
दिवस :- ४ ते ५ दिवस
फॅमिली:- ६ मोठे पॅरेण्टसह, लहान ४
सुका मेवा चपाती
मी करून पाहिलेली सुका मेवा चपाती
कृती-१
प्रथम एका भांडयात पाणी घेऊन ते ग्यास वर उकळी येउस्तर ठेवा , उकळी आल्याबरोबर ग्यास बंद करा व त्यात 6 बादाम, २ आक्रोड, 12 काजू आणि 12 पिस्ते टाका. यानंतर साधारण ५-७ मिनिटानंतर पाणी काढून टाका तसेच बदाम सोलून घ्या.
सोबतच दुस-या एका भांडयात पाणी घेऊन ते ग्यास वर उकळी येउस्तर ठेवा , उकळी आल्याबरोबर त्यात ५-६ काळया खारका टाका यानंतर साधारण ३० सेकंदा नंतर ग्यास बंद करा .
सोबतच दुस-या एका भांडयात पाणी घेऊन ते ग्यास वर उकळी येउस्तर ठेवा , उकळी आल्याबरोबर त्यात ५-६ काळया खारका टाका यानंतर साधारण ३० सेकंदा नंतर ग्यास बंद करा .ईस्ट इंडिया कंपनी
हल्ली एका वादातून काही नवीन गोष्टी लक्षांत आल्या. मिपा सदस्यासाठी इथे लिहीत आहे.
अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तान भागांत जी युद्धे चालवली आहेत त्याचा अंत अजून तरी दृष्टिक्षेपाला येत नाही. त्याशिवाय सीरिया आणि येमेन इथे अजूनही अमेरिकेचे सैन्य कार्यरत आहे. चारी ठिकाणी मिळून अब्जावधी डॉलर्स चा चुराडा दार वर्षी होत आहे. इराक युद्धांत अमेरिकेने सुमारे २ ट्रिलियन डॉलर्स उडवले आहेत आणि युद्धाचा एकूण खर्च (जखमी सैनिकांचे पेन्शन, बॉण्ड्स वरील इंटरेस्ट इत्यादी ) मिळून तो सुमारे ६ ट्रिलियन डॉलर होईल. काही दिवस आधी अमेरिकन सैन्याने ९६ मिसाईल्स सीरिया मध्ये वापरली ह्यांचा एकूण खर्च १०० मिलियन इतका होता.
नेदरलँड्सची सफर भाग -३
नेदरलँड्सची सफर भाग -३
मेहुण्याच्या (अक्षय) घरी वास्तव्य असल्याने बऱ्याच गोष्टी फार सुलभ झाल्या हि एक वस्तुस्थिती होती. त्याने आम्ही येणार म्हणून तेथे वापरायची दोन ovi chipkaart नावाची प्रीपेड कार्डे घेऊन ठेवली होती. यात जालावरून पैसे भरायचे आणि बस, ट्राम, मेट्रोमध्ये चढल्यावर आणि उतरताना तेथल्या यंत्रावर टेकवायचा कि आपोआप त्यातून पैसे वळते होतात.
एकंदर युरोपातील हवामान बेभरंवशी असते हे ऐकून माहित होते. त्यामुळे तेथे हवामानाचा अंदाज पाहूनच बाहेर पडत होतो.
संगीत एकच प्याला
हे वर्ष राम गणेश गडकर्याच्या संगीत एकच प्यालाच्या शताब्दीचे असून महाराष्ट्र शासन आणि जनता हे महान नाटक पूर्ण पणे विसरून गेली आहे. मिसळपाव वर वावर असलेल्या पत्रकारांना विनंती अशी की त्यांनी यात लक्ष घालून शासनाला याबाबत जागे करावे.
राजयोग - १०
कालीमातेच्या मूर्तीसमोर उभा राहून जयसिंह म्हणाला,
"तुला खरंच आपल्याच मुलांचं रक्त हवंय, आई? राजवंशातलं रक्त मिळाल्याशिवाय तुझी तहान भागणार नाही? लहानपणापासून मी तुला आई म्हणत आलो, तुझी सेवा केली. इतर कुणाकडे पाहावं सुद्धा वाटलं नाही. तुझी सेवा हेच माझ्या जीवनाचं उद्देश्य आहे असं समजत आलो. मी एक राजपूत आहे, या धमन्यांमध्ये क्षत्रिय कुळाचं रक्त वाहतंय. माझे आजोबा राजा होते, माझ्या मामांचा वंश अजूनही राज्य करतोय.. राजरक्त हवंय ना तुला, मग घे हे.." जयसिंहने अंगावरची चादर काढून फेकली. कमरेला बांधलेल्या म्यानातून चाकू काढला. वीज चमकावी तसं क्षणार्धात त्यानं चाकू आपल्या हृदयाच्या आरपार नेला. मृत्यूची धारदार जीभ त्याच्या छातीला छिद्र पाडत गेली. जयसिंह मूर्तीसमोर कोसळला. पाषाणाची मूर्ती तसूभरही हलली नाही.
दत्तोबा
रविवारची सकाळ. छान मुड लागला होता. बरेच दिवस पडून असलेला लेख आज पुर्ण करायला घेतला होता. इतक्यात सौभाग्यवतींने बटर लावलेली थालिपीठाची डिश समोर आणून ठेवली. थालिपीठ म्हणजे शिळ्या भाकरीचे थालिपीठ. (कधी तरी सविस्तर पाककृती सांगेन याची.) मन कसं प्रसन्न झालं. कारण एकतर हे थालिपीठ मला फार आवडतं आणि दुसरं म्हणजे सकाळच्या स्वयंपाकाला सुट्टी म्हणजे दुपार चविष्ट होणार हे ठरलेल. किबोर्डबरोबर चाळा करत मी विचारलं “तुला बरा सारखा सारखा कंटाळा येतो स्वयपाकाचा!” त्याचं काय आहे, ईतकी वर्ष संसार केल्यानंतर कुठे ईतकीशी समजायला लागलीय बायको.
एटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद
एटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद
५: अंबड- औरंगाबाद
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
योग- सायकल यात्रेचा चौथा दिवस, १४ मेची पहाट. आज अंबडवरून औरंगाबादला जायचं आहे.
मिसळपाव