पर्यटकांनी प्रचंड गजबजलेल्या महाबळेश्वराच्या कोणत्याही पाँईटवर उभारले कि आकाशावेरी गेलेल्या सह्याद्रीच्या रांगा मन मोहून टाकतात. याच रांगात अनेक गड किल्ले दिसत असतात. ईतिहासात अजरामर झालेल्या प्रतापगडाखेरीज, महाबळेश्वरावरुन दिसणार्या अन्य किल्ल्यांची ओळख मात्र सर्वसामान्य पर्यट्कांना नसते. पाचगणीच्या पारशी पाँईटवरुन रायरेश्वर, केंजळगड, पांडवगड दिसतात. मुंबई ( बॉम्बे ) पॉईंटवरुन मधुमकरंदगड दिसतो. ऑर्थरसीट पाँईटवरुन चंद्रगड, मंगळगड, हवा स्वच्छ असेल तर रायगड, लिंगाणा, वरंधा घाटातील कावळ्या किल्ला ईतके गड दिसतात हे किती जणाना माहिती आहे ? असाच आणखी एक दुर्लिक्षीत किल्ला म्हणजे, " कमळगड".