Skip to main content

उगाच वणवा भडकलेला , गजरेवालीने त्यात टाकली माती

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 01/06/2018 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
मी इकडून आलो ती तिकडून आली मी बघताच थांबलो पण ती निघून गेली सुस्कारा सोडत वर बघितले हळूच इकडेतिकडे बघितले दुसरी मटकत येतच होती ती पण न बघताच निघून गेली कैक आल्या वाटेवरती अशाच गेल्या वाटेवरुनी अजून एक दुरुन येत होती चालता चालता लाजत होती काय होतंय ते काहीच कळेना उगाच छाती धडधडत होती गजरा सुंदर माळलेला चेहरा कोमल उजळलेला लटके झटके बघुनी सारे भाव मनातील पिसाळलेला जवळ येऊनि मला म्हणाली काका, घड्याळात वाजले किती ?

चांगली बातमी

लेखक साहना यांनी शुक्रवार, 01/06/2018 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
विविध प्रकारच्या वाईट बातमीचा धुराळा उडत असताना नेहमी प्रमाणे आमच्या मीडियाने एक चांगली बातमी लोकां पर्यंत पोचवलीच नाही. महिंद्रा ह्या भारतीय कंपनीच्या Airvan १० ह्या दहा लोकांना नेऊ शकणाऱ्या विमानाला DGCA आणि इतर वायुवाहन संबधी यंत्रणांनी हिरवा कंदील दाखवला. आता महिंद्रा येत्या सहा महिन्यात भारतात हि विमाने विकू शकेल. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मध्ये २०१७ सालीच त्यांना परमिशन मिळाली होती. इंजिन रोल्स रॉयस चे आहे. अजून पर्यंत विमानासाठी इंजिन बनवणे भारताला शक्य झालेले नाही. विमानाची किंमत सुमारे १० कोटी असेल. पण त्याच्या तुलनेत सेसना इत्यादी विदेशी विमानांची किंमत सुमारे १८ कोटी आहे.

राजी -' छा '-लिया

लेखक विअर्ड विक्स यांनी गुरुवार, 31/05/2018 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
हेर पट म्हटला कि आपल्यासमोर बॉण्ड पट वा टायगर पट डोळ्यासमोर उभे राहतात. मुख्यतः हेर पट हे नायक प्रधान चित्रपट असतात, या अंगाने राझी चे वेगळेपण उठून दिसते. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या " सेहमत कॉलिंग " या कथेवर आधारित आहे. या चित्रपटातील कथा १९७१ च्या युद्ध काळातील आहे. हिदायत खान ( रजत कपूर ) व बायको तेजी खान ( सोनी राझदान - आलियाची खरी आई ) ( तेजीच्या कपाळावर सिंदूर दाखवला आहे याचे कारण कळले नाही ) काश्मिरात वास्तव्य असते व पाकिस्तान काश्मिरात त्यांचे व्यापारानिमित्त येणेजाणे होत असते . हिदायत खान हे भारतासाठी डबल एजन्ट ( मराठी शब्द ?

स्वप्न

लेखक अभिजित कुमावत यांनी गुरुवार, 31/05/2018 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
जागेपणि बघतो ती वेगळी अणि झोपेत बघतो ती वेगळी. खरच स्वप्नांची दुनिया काही औरच. जागेपणि जी स्वप्न बघतो ती शक्यतो आपल्या भविष्याला धरून असतात. आणि दिवासभरच्या घडामोडी वर अवलंबून असतात अशी काही झोपेतली स्वप्न जी सन्दर्भ विरहित असतात. माणूस जन्माला येतो तेहि स्वप्नवतच आहेना. नऊ महीने आपली माता आपणास स्वताच्या गर्भात वाढवते. ती आणि आपले वडील त्या गर्भाला विचारात घेऊन स्वप्न बघतात. मूल झाल्यावर ते अस वगेल तस वगेल. पण तेच मूल मोठ झाल्यावर आपल्या स्वप्नात रंगून जात.आणि आपण आपल्या जन्मदात्यांना काहीतरी देण लागतो हे विसरून जात. जन्माला आल्यापासूनच जणू परीक्षा चालू होते.

एक दिवस तरी लहान "बाबू" बनून बघावे

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 31/05/2018 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
का म्हणून दिवसेंदिवस प्रौढच बनत जावे ? का म्हणून आपणच सारं खांद्यावर वाहावे ? थोडं मागं वळून बघा , कोरी पाटी नि पेन्सिलचा तुकडा दिसेल ती हातात घेऊन बसलेला एक छोटा बाबू दिसेल एक दिवस तरी लहान बाबू बनून बघावे दुद्धु दुद्धु म्हणून ओरडावे वाटेल तिथे फतकल मारून बसावे दिसेल त्याचे केस उपटावे आडवंतिडवं पडून त्रागा करावे बाबू जे जे करतो ते ते मनापासून करावे हमसून हमसून रडावे घरातल्यानी पण तोंडात बोट घालावे इतके साऱ्या घरभर लोळावे रांगत रांगत चड्डीवर फिरावे मम् मम्, यम यम करत मिचक्या मारावे एखादा कोपरा बघून हळूच मोकळे व्हावे का फक्त प्रौढवानी संडासातच करावे बाबू बनावे अन
काव्यरस

राजयोग - ७

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 31/05/2018 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
तिथून निघाल्यावर जयसिंह निर्जन रस्त्याने मंदिराकडे परत जाऊ लागला. तसं तिथून मंदिर फार दूर नाही पण आज जयसिंहला परत तिकडे जावंसं वाटत नव्हतं. किनाऱ्यावर एक मोठं झाड पाहून तो त्याखाली बसला. शरीराच्या थकव्यापेक्षा त्याच्या मनाला थकवा आला होता. आज पहिल्यांदाच त्याला अगदी एकटं एकटं वाटत होतं. विचारांचा ताण असह्य व्हायला लागला तेव्हा त्यानं आपला चेहरा हाताच्या ओंजळीने झाकून घेतला. त्याला वाटलं, आजचा एक प्रश्न तर मिटला पण इथून पुढे माझ्या मनातला संशय कोण दूर करणार? चूक काय, बरोबर काय कोण सांगणार?

काही आठवत रहात

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 31/05/2018 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एक व्हिडीओ पाहिला. आय पी एल चा किताब मिळताच चेन्नई चा संपूर्ण संघ उत्सवात गढ़ला असता चेन्नई चा कर्णधार धोनी आपल्या मुलीच्या झीवाच्या कोड कौतुकात मग्न होता. त्याला ट्रॉफी च काहीच देणं घेणं न्हवत होत ते आपल्या मुलीच कौतुक, तिच्या वरची माया. तो व्हिडीओ बघून मला आठवत राहील. मला आई घरी हवी असताना माझी आई शाळेत न लवकर घरी यायची ते. मी रात्री सायकल वरून पडल्यावर बेरात्री मला घेऊन डॉक्टर कड़े धावली होती ते. अंब्याची आपल्या वाटची फोड मला आंबे जास्त आवडत नाहीत म्हणून माझ्या ताटात टाकायाची ते.

दिलासा .....

लेखक फिझा यांनी गुरुवार, 31/05/2018 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
दिलासा ..... भरती असो कि ओहोटी सगळं काही वाहून न्यावं लागत कुणाला दिलासा देऊ ? त्या लाटांना, ज्या कधी थांबू शकत नाहीत कि त्या किनाऱ्याला, जो कधी चालू शकत नाही !

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ५

लेखक रा.म.पाटील यांनी बुधवार, 30/05/2018 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज ..!! (Decorate Your Love) : कथा - ५ लग्न.. ( प्रेमाची सप्तपदी..) सर्व उपस्थित लोकांच्या नजरा नव्या नवरीवर खिळल्या जेव्हा नवरीने हॉलमध्ये प्रवेश केला आणि त्याची नजर मात्र नवरीमागून येणाऱ्या एका करवलीवर.. हीच का ती त्याच्या आयुष्याच्या पिक्चरची हिरॉईन.. स्पीकरवर गाणे लागले होते.. 'तुम्हे जो मैने देखा, तुम्हे जो मैने जाना, जो होश था, वो तो गया..' त्याला हवे तसेच ते गाणे.. न तिची एन्ट्री..

अनोळखी वाट

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 30/05/2018 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
अनोळखी वाट घनदाट वनी मला नेते निब्बरल्या तनामना नितळ सावली देते हिरव्या रंगाच्या छटा पानोपानी अगणित सळसळ लहरते वार्‍यासंगे अविरत विजनात दूरवर घुमतसे घुघुत्कार पसरती अंधाराचे पडसाद रानभर पाखरांनो घरट्यात पिले हळूच जोजवा लखलख काजव्यांचा झाडाझाडावर दिवा
काव्यरस