*‘तो’ परत येईल...*
हॉलीवुडच्या नायिकेचा आशावाद
नवरा कसाहि असला तरी त्याच्याच सोबत आपलं संपूर्ण आयुष्य काढण्याची भाषा करणारी बायको, फक्त भारतीय चित्रपटांमधेच नव्हे, तर हॉलीवुडच्या चित्रपटांमधे सुद्धा नायिकांनी रंगवली आहे. नवरा बाहेरच्या बाईच्या नादी लागला तरी त्याची सेवा करून त्याला वठणीवर आणण्याची भाषा देखील प्रसंगी नायिका करतांना दिसतात. नवरा किती ही वाईट असला तरी आपल्या चित्रपटांचा शेवट मात्र गोड होतो.
मराठी दिन २०१८: धुयानी होयी नी धुयवड (अहिराणी)
धुयानी होयी नि धुयवड
लोकेसहो!
धुयवड खेयनात ना! आम्हन्या धुयामां बी होयीना येगळाच रंग चढस.
मन्हा बाबा सांगे..त्यासन्हा टाईमले धुयवडनी मोठी धमाल व्हये.
आते आम्ही ६वी गल्ली ना लोके तुम्हले माहीती नैत. धुळामां हरेक गल्ली म्हन्जे इशेष शे. म्हंजे पाहा, हाई माशाना काटा र्हास ना तसा धुयाना मझार पारोया रोड जास. त्याले लागून काटकोनमा पह्यली गल्ली, २री गल्ली(तेली गल्ली) ४थी, ५वी, ६वी, ७वी गल्ली शेतस. ६वी गल्ली म्हण्जे दादा लोकेस्नी गल्ली समजेत. सहावी गल्लीना एक साईडले माधवपुरा. बठठा.... काय म्हंतस त्याले संवेदनशील भाग बरं!! गल्लींन एक टोकले सुभाषनगर. म्हणजे जुन धुळे. जुन धुयामा खुनी मस्जिद.
कणेरीमठ येथील सिद्धगिरी ग्राम संग्रहालय - ग्रामीण जीवनाची अनुभूती
मी सध्या नोकरीच्या निमित्ताने मुंबईकर झाले असले तरी मूळची कोल्हापूरकर आहे. नुकत्याच फेब्रुवारी महिन्यातील लागून आलेल्या सुट्यांचे सार्थक करण्याकरीता सासरी सडोलीला (ता.करवीर) गेले होते. त्यामध्ये एक दिवस सहकुटुंब कणेरीमठ येथील संग्रहालय पाहण्याचा बेत आखला. कणेरीमठ कोल्हापूरपासून जुना पुणे- बेंगलोर हायवेवर उजवीकडे 12-13 कि.मि. वर आहे. कणेरीमठला जायला बस सुविधा आहेत. आम्ही खाजगी गाडीने कोल्हापूरवरुन अर्ध्या तासात पोहोचलो. येथे प्राचीन काळातील भारतीय संस्कृतीचे दर्शन पुतळ्यांद्वारे उभारले गेले आहे. प्रवेश फी 150 रु.
सातोरी
सप्त-समुद्रांमधे मिसळती असंख्य सरिता मधुर जला
मार्गावरती समर्पणाच्या करिती पृथ्वीला सुफला
सप्त-रंग हे इन्द्रधनूचे क्षणभर दिसती-अन विरती
मेघांवरती रविकिरणांचे इन्द्रजाल अद्भूत किती
पुनरावर्तन सात दिसांचे जरी मानवा योग्य दिसे
अनादि काल-प्रवाह वाहे अंत तयाला कुठे असे?
अपूर्व विभ्रम सप्त-सुरांचे राग होउनी अवतरती
कोंदणात तालांच्या त्यांची अमूल्य रत्ने झगमगती
निर्धाराने परिश्रम करता असाध्य जगती काही नुरे
कल्पनेतले सप्त-स्वर्ग मग भूवरी येतिल खरेखुरे
मिसळपाव