Skip to main content

डायरी

लेखक चेतन०२०१२ यांनी शुक्रवार, 02/03/2018 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे कस काय शक्य आहे? मला अजूनही विश्वास बसत नाहीये. पण मग मी आत्ता १५ मिनिटांपूर्वी पाहिलं ते काय होत? But today it’s been 10 years. म्हणून काय झाल, याचा अर्थ असा नक्कीच होत नाही की मी जे पाहिलं ते खोट आहे. माझ्याच डोक्यात चाललेली ही कालवाकालव माझाच अंत पाहते आहे. खर सांगू मला काहीच कळत नाहीये की मी खुश व्हायला हव की अचंबित. अरे After bloody 10 years I just saw her with my own two eyes. मला शहानिशा करन भागच होत की मी आत्ता जे पाहिलं ते खर होत की फक्त माझ्या मनाचे खेळ होते. मी आत्ता हा इथे उभा होतो. काय करत होतो बर ??? हा बिल भरत होतो. कसलं बर?? आईला ह्या पोरीने वेड लावलाय.

तू पहाट ओली

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 02/03/2018 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
तू पहाट ओलीसांज कोवळी येते का गंध अाठवांचा घेऊन उमटीत जाते मनी वेडी हळवी स्वप्नसुरांची धून पदर हा रातीचा ढळता सांडे उरात चंद्र नभीचा ओठानीच कसा चूंबावा प्राण विरता रातराणीचा झरे अशी गात्रागात्रातूनी तू थरथरती पहाट ओली विरून क्षितिजाच्या रेषा आभाळ चुंबते धरा गाली परशुराम सोंडगे,पाटोदा sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com prshuramsondge.blogsopt.com
काव्यरस

तंदुरुस्त का नादुरुस्त ? : भाग १

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 02/03/2018 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या) प्रास्ताविक माझी या आधीची आरोग्य-लेखमाला चालू असताना मित्रवर्य ‘अनिंद्य’ यांनी या विषयावर लिहिण्याची सूचना केली. मग मी त्यावर विचार केला. आधी वाटले, की ते म्हणताहेत तर लिहून काढू एक लेख लगेच. पण, जसा मी वाचन करीत या विषयाच्या अंतरंगात शिरलो तेव्हा वस्तुस्थिती लक्षात आली. या विषयाची व्याप्ती नक्कीच मोठी आहे. त्याला जाणूनबुजून एका लेखात कोंबून बसवणे हे त्यावर अन्याय केल्यासारखे होईल. तेव्हा या विषयाचा सखोल अभ्यास करून त्याचा समग्र वृत्तांतच वाचकांसमोर मांडवा असे ठरवले व त्यातूनच या लेखमालेचा जन्म होत आहे.

गारवा - विडंबन

लेखक OBAMA80 यांनी शुक्रवार, 02/03/2018 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या प्रोफेशनल आयुष्याची सुरूवात ज्या डोंबिवलीमध्ये राहून झाली तेथून सकाळची जलद लोकल पकडणे हे एक मोठ दिव्यच. त्या दिव्य अनुभवावरूनच खालील विडंबनाची कल्पना सुचली. मूळ कवी सौमित्र व गायक मिलींद इंगळे यांची माफी मागून सादर करतो....गारवा चे विडंबन. मूळ कविता - गद्य भाग- ऊन जरा जास्त आहे दर वर्षी वाटतं भर उन्हात पाउस घेउन......
काव्यरस

अन्नदाता सुखी भव भाग ८ (अपूर्ण): तोतयांच्या शोधांत

लेखक शेखरमोघे यांनी शुक्रवार, 02/03/2018 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे "अन्नदाता सुखी भव" चे भाग भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 भाग ६: http://www.misalpav.com/node/33829 आणि

मराठी दिन २०१८: मुलखावेगळी ‘पैज’ (ॲन्टन चेकोव यांची अनुवादित कथा - प्रमाण मराठी)

लेखक शशिधर केळकर यांनी शुक्रवार, 02/03/2018 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
मुलखावेगळी ‘पैज’ मूळ कथा - ॲन्टन चेकोव (१८६०-१९०४) १ रात्र टळून चालली होती. तो म्हातारा बँकर आपल्या वाचनालयाच्या खोलीत या टोकापासून त्या टोकापर्यंत येरझारा घालत होता, पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका रात्री त्याने दिलेल्या पार्टीच्या आठवणी मनात जाग्या करीत होता. त्या पार्टीला आलेल्यांत विद्वान मंडळी कमी नव्हती. विविध विषयांवर चर्चा रंगली होती. त्यातही विशेषतः ‘फाशीची शिक्षा असावी की नसावी’ याबाबत भरपूर चर्चा झाली. आलेल्या पाहुण्यांमधे कोणी उच्चविद्याविभूषित होते, काही पत्रकार होते, आणि बहुतेकांचा कल फाशीची शिक्षा नसावी याकडे होता.

मराठी दिन २०१८: चला मालनाक! (मालवणी)

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 02/03/2018 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
चला मालनाक सुस्वागतम. आपल्या मालनाक आपले स्वागत आसां. हुमयसून राष्ट्रीय महामार्ग १७ ने मालनाक येऊचा झालां की पयलो पळस्पा फाट्याक उजवीकडे बळूचा. मगे वडखळ नाक्याऽऽर डाव्यां वळाण घेतलां की आपलो कोकणचो रस्तो लागतां; होच आपलो राष्ट्रीय महामार्ग १७. महाड, खेडचो भरणो नाको, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा, लांजा, राजापूर, तळेरे, नांदगांव, कणकवली करान आपण कसालाक इलों की उजवो फाटो सरळ मालनाक. तसो कणकवल्येवरसून आचरामार्गे पण एक रस्तो आसां. पण अंतर पाचधा किमी. कमी असलां तरी रस्तो आवळ (अरुंद) आणि खड्ड्यान भरल्यालो. मगे कसालावरसून येणारो हायवे रस्तोच बरो.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 01/03/2018 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २ भाग १ संस्कृत सुभाषितांच्या क्षेत्रात निश्चित उगम सांगता येईल असे थोडेच आहे. बहुतेक नीतिपर, व्यवहारज्ञान सांगणारे आणि बोलणार्‍यांच्या मुखामध्ये प्रत्यही असणारे असे श्लोक कोणातरी (आता अज्ञात) कवीची रचना असते. एकदा ती सर्वमान्य झाली की ती सुभाषितांच्या एका संग्रहातून दुसर्‍यात अशी फिरू लागते. ह्यातल्या बहुतेक संग्रहांचे पौर्वापर्य ठरविणे दुस्तर असते आणि मूळचा कोण आणि नक्कल कोणती हेहि ठरवता येत नाही. एक वचन लोकप्रिय झाले की ते वापरून दुसरा कोणी कवि त्याच्याभोवती नवा श्लोक निर्माण करतो.

मुलांची हरवत चाललेली आई

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 01/03/2018 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
अगं असशील गं तू लोकांसाठी नावारूपाला आलेली बाई पण माझी तू फक्त आई आहेस मी लहान असताना तू किती प्रेम करायचीस हवं नको ते सारं बघायचीस मी कर्तासवरता झालो नि तू दूर दूर गेलीस इतकी कि आज तुला माझी हाकही ऐकू येत नाही मी ओरडतो, घशाला कोरड पडते बेचैन होतो , आतून बाहेरून फक्त एकच आवाज असतो " आई, आई नि फक्त आई " तू प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत गेलीस एकावर एक पुरस्कार मिळवत गेलीस प्रत्येक पुरस्कारासाठी वेळ देत गेलीस पण मी तुला मनापासून दिलेले पुरस्कार विसरलीस देवाची बरोबरी फक्त तूच करू शकतेस तो आहे कि नाही?
काव्यरस

भाषा अहिराणी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/03/2018 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे उत्तर महाराष्ट्रातील खानदेशात बोलली जाणारी प्रमुख भाषा ही अहिराणी भाषा आहे. पूर्वी घरात, मित्रांत, नातेवाईकांत, बाजारात, दुकानात, दैनंदिन व्यवहारात, शेती व्यवहारात सर्वत्र अहिराणी भाषा बोलली जायची. घरात पूर्णपणे अहिराणीत संभाषण होत असे. कारण खानदेशातली अहिराणी ही लोकभाषा आहे. म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील खानदेशची प्रमाणभाषा अहिराणी आहे. त्या काळातला प्राथमिक शाळेतला शिक्षक असो की माध्यमिक शाळेतला. शाळेतून शिक्षक बाहेर पडले की ते घरी-दारी अहिराणी भाषा बोलायचे. शाळेत विद्यार्थ्यांनाही आपसात अहिराणी बोलायला अलिखित परवानगी होती.