Skip to main content

थंडी गॉन… घाम ऑन!!!

लेखक आदिजोशी यांनी मंगळवार, 23/01/2018 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
चातक जितक्या आतुरतेने पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघतो त्यापेक्षा आतुरतेने आम्ही त्या घामाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत होतो. मागचे काही दिवस मुंबईचं हवामान पार म्हणजे पारच बिघडलं होतं. थंडीच्या मोसमात मुंबईत चक्क थंडी? हा काय आचरटपणा आहे? मुंबईकरांना थंडी हवी असती तर आम्ही सिमल्याला नसतो गेलो? लोकल ट्रेन, टॅक्सी, बेस्टची बस, सी लिंक, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, धारावी, बॉलिवूड, वडा पाव ह्यांच्याप्रमाणेच 'घाम' ही मुंबईची ओळख आहे. घामट्टपणा ही मुंबईकरांची आवडती अवस्था आहे. मुंबईची हवा म्हणजे तर बोलायलाच नको. जाज्वल्य अभिमान एटसेट्रा नाही पण मुंबईत येतो तसा घाम जगात कुठेही येत नाही.

शनिवारवाडा कट्टा - २७ जानेवारी दुपारी ४ वाजता

लेखक श्रीरंग_जोशी यांनी मंगळवार, 23/01/2018 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वी २२ जून २०१४ रोजी मी प्रथमच मिपा कट्ट्याला उपस्थित राहिलो. त्या कट्ट्याच्या गोड आठवणी अजूनही ताज्या आहेत.

नवखेच सखे फसतात इथे

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/01/2018 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
वृत्त - तोटक अदमास पुन्हा चुकतात इथे वनवास नवे मिळतात इथे अवघे जगणे जगणे बनते मिथके सगळी जुळतात इथे रुसणे स्मरता हसणे स्फुरते अलवार सुखे कळतात इथे वळणे कळता सरती वलये नवखेच सखे फसतात इथे हलकेच पुन्हा जवळीक नवी सुमने कवळी फुलतात इथे विरहास नवे सहवास हवे हळवे क्षण ते स्मरतात इथे भुतकाळ जरा विसरू म्हणता इतिहास नवे रचतात इथे © विशाल वि. कुलकर्णी
काव्यरस

पद्मावत- आत्मा परमात्मा मिलनाची गाथा

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 23/01/2018 08:50 या दिवशी प्रकाशित केले.

प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण नाही. शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीला कठोर तपस्या करावी लागली अमीर खुसरो यांनी म्हंटले आहे: खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग, तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग. संसार रुपी रात्र जागून काढल्या शिवाय प्रेमाची प्राप्ती नाही. प्रेम हे अलौकिक आहे. प्रेम म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन. पद्मावतच्या कथा हि आत्म्याचे परमात्म्याशी मिलनाची कथा आहे.

नवीन भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे. मार्गदर्शन करावे.

लेखक shashu यांनी सोमवार, 22/01/2018 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे. मार्गदर्शन करावे. दैनंदिन घरगुती वापरासाठी भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे. बजेट : ३००००-४००००.

मनाचं प्लॉटिंग

लेखक फुंटी यांनी सोमवार, 22/01/2018 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मनात आहेत असंख्य Non Attached प्लॉटस गुंतत नाही मी सहसा कशात प्लॉटिंग करून ठेवलंय मी काटेरी तारेच्या कुंपणाने बंदीस्त लहान होतो तेव्हाही होतेच हे प्लॉट पण त्याला असायच काटेरी ठेवाच कुंपण त्यावर काटे असले तरी फुलही फुलायची अधूनमधून आता मात्र मनाचे प्लॉट रुक्ष व्यवहारांच्या काटेरी तारेने वेढलेले हल्ली कुंपणावर वाढवलेला वेल दिसायला सुंदर दिसतो मात्र त्याखालीअसतेच व्यवहारांचा पहारा कुणाशीही मोकळंढाकळ बोलावं असं नाही राहिलं अंगण प्रशस्त गेटमधून कुणी आलं बोलायला तरच बोलावं हेच झालंय आमचं हाय स्टॅंडर्ड

वलय (कादंबरी) - प्रकरण ५

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 22/01/2018 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ४ ची लिंक: http://www.misalpav.com/node/41834 ---- प्रकरण 5 थोड्या वेळानंतर रागिणीने बेडवर अंग टाकले. कपाळावर हात ठेवून ती छताकडे बघत बसली. स्क्रिप्ट वाचता वाचता बराच वेळ निघून गेला पण आता तिला पुन्हा तो फोन कॉल आठवू लागला. झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप काही केल्या येत नव्हती. डोळ्यात गुंगी साठत होती होती पण अनेकविध विचारांनी झोप येत नव्हती... ... तिचे कान काचांच्या फुटण्याच्या आवाजाने भरून गेले. रोहनचा भीषण अपघात तिला आठवला... तिचे जीवनातले पहिले प्रेम - रोहन राठी!

गीताई माऊली माझी...

लेखक विकास यांनी सोमवार, 22/01/2018 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
​आचार्य विनोबा भाव्यांनी त्यांच्या आईला गीता ऐकण्याची इच्छा होती पण संस्कृत येत नव्हते म्हणुन, श्रीमद्भगवद्गीतेचे "गीताई"च्या रुपाने मराठीकरण केले. ते करताना, मूळ श्लोक आणि त्यांचे छंद वगैरे जसेच्या तसे ठेवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला.

भित्यापाठी.......आणखीन भिती......

लेखक Jayant Naik यांनी रविवार, 21/01/2018 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
भित्यापाठी ...आणखीन भिती.... पोटभर खायला मिळाले कि किती समाधान असते हे भिक्याला आज बरेच दिवसांनी अनुभवाला आले. भिक्याला आज सगळे जग एकदम सुंदर आणि प्रसन्न वाटायला लागले. आज थोड्या वेळापूर्वीच एका उकिरड्यावर त्याला एक प्लास्टिकचा डबा सापडला होता. त्यात कुणीतरी चार पाच इडल्या टाकून दिल्या होत्या....थोडा वास येत होता पण भिक्याला खाता आल्या..त्याचे पोट एकदम भरून गेले. ..... या पोटाची योजना या देवाने काही बरोबर केलेली नाही असे भिक्याला नेहमी वाटायचे.दररोज एकदा तरी , ही पोटाची खळगी भरायला लागते हे काही बरोबर नाही....

फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १

लेखक रा.म.पाटील यांनी रविवार, 21/01/2018 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate Your Love..) कथा - १ संक्रांत.. (प्रेमाचे उत्तरायण..) आज तिचा आरशासमोर नेहमीपेक्षा जास्त वेळ जात होता. दररोज ती स्वतःसाठी सजत होती पण आजचा तिचा साजश्रुंगार दुसऱ्या कोणासाठी तरी.. ज्याला तिला आपला करायचं होतं, त्याच्यासाठी होता. आज ऑफिसमध्ये संक्रात स्पेशल सर्व महिला वर्ग साडी नेसून येणार होता. हीच संधी होती तिला त्याला आकर्षित करण्यासाठी..! त्यासाठी काल तिने तिचा पूर्ण रविवार खर्ची केला होता. हवी तशी साडी शोधता शोधता तीचे अविरत श्रम झाले होते.