Skip to main content

पासंग

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 21/08/2026 17:08 या दिवशी प्रकाशित केले.

अभंग भंगेल / ओवी ओठंगेल
लावणी लोपेल / लौकरच

उत्स्फूर्त निमेल / उत्कट आटेल
चाकोरी उरेल / लौकरच

काव्य, शिल्प, चित्र / एका प्रॉम्प्ट वर
होतसे हजर /अहर्निश

मानवी प्रज्ञेला / कृबुचा पासंग
युद्धाचा प्रसंग / सृजनाला

लेखनविषय:

वाचने 68
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

चौदा विद्या,चौसष्ट कला वसती माझ्या ठायी

सिहासनाधिश्वर मीच, साऱ्यां  निष्ठा माझ्या पायी

 

आवडली.