Skip to main content

अभंग

केशर

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 06/08/2026 09:33 या दिवशी प्रकाशित केले.

मावळतीवर / केशर सांडते
तेव्हा झंकारते / आत काही

आत खोलवर / झंकारते तेव्हा
कोंडला पारवा / फडफडे

पारवा तोडतो / स्थळ-काळ पाश
घेतो अवकाश / पंखावर

पंखावर त्याच्या / झुले मुक्तछंद
अनाहत नाद / रोमरोमी

कल्लोळ उठती / रोमरोमी कैसे
केशर हे पिसे / लावतसे

झेपावे पारवा / मावळतीपार
सांडले केशर / काळवंडे

आपली कुर्बानी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 27/05/2026 14:27 या दिवशी प्रकाशित केले.

पूर्वी शिकारी शिकार करायला करात (हातात) असलेला बाण वापरत. त्यावरून करबाण, कुरबाण, कुर्बाण, कुर्बान, कुर्बानी असा शब्द बनत गेला आहे.

आपले पूर्वज किती पुढारलेले होते ते दिसते.

थोडक्यात कुर्बानी हा आपलाच प्रकार आहे.

प्राचीन अभंग बघा:-

"बाई बाई तुझ पे मेरी जान, 
मेरी जान तुझ पे कुर्बान
कुर्बानी कुर्बानी कुर्बानी
अल्ला को प्यारी है कुर्बानी"

सदर अभंगात, संतकवी इंदीवर यांनी बाईला नजरेच्या बाणापेक्षा, करबाण किती आवडत असत याचा दाखला दिला आहे.

कानडा राजा पंढरीचा ह्यातील कानडा ह्याचा अर्थ काय ?

लेखक साहना यांनी बुधवार, 16/09/2020 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
मला दोन वेगळे अर्थ सापडले कानडा - ज्याला आपण समजू शकत नाही. विकी असा अर्थ देते पण शब्दाची व्युत्पत्ती देत नाही. इंग्रजीत ह्याला अन-फेथॉमेबल असे म्हटले जाऊ शकते पण कानडा हा शब्द अभंग सोडून इतर कुठेही वाचनात आलेला नाही. कानडा - कन्नड प्रदेश. विठ्ठल हे दैवत कर्नाटक प्रांत आणि कृष्णदेवराय ह्यांच्या राज्याशी संबंध ठेवून असल्याने (?) विठ्ठलाला कन्नड प्रांताचा राजा असे संबोधित केले आहे. पण गदिमा सारखे आधुनिक कवी कशाला कन्नड प्रांत आपल्या अभंगात लिहितील ? कुणाला जास्त माहिती आहे का ?