Welcome to misalpav.com

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

लेखक: संपादक मंडळ | प्रसिद्ध:
मंडळी, दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.


माझी दिवाळी

लेखक: संपादक मंडळ | प्रसिद्ध:
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.


दिवाळी अंक २०१३

लेखक: संपादक मंडळ | प्रसिद्ध:
नमस्कार मिपाकर हो, कळविण्यास आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकानंतर आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, माहितीपूर्ण लेखन, चुटकुले, विनोदी लेखन, अशा सर्व प्रकारचे लेखन दिनांक २३/१०/२०१३ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती. कारण व्यनिद्वारे आलेली फाईल अंकात समाविष्ट करणे जरा जिकिरीचे काम आहे.


मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३

लेखक: संपादक मंडळ | प्रसिद्ध:
नमस्कार मंडळी, गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा! अंत्यत श्रध्देने आणि मोठ्या भक्तीभावाने हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या बरोबरीने महाराष्ट्रात घरोघरही जवळपास १२ ते १५ लाख बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापुर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो, मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे, थर्माकॉलचे आकर्षक मखर असो वा गणेशाची सुंदर मुर्ती! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते.


पाउस, ती आणि मी- भाग २

लेखक: डॉन व्हिटो कॉर्लिऑन | प्रसिद्ध:
पाउस, ती आणि मी- भाग १ कानफटात खायची तयारी ठेउन मी गडाच्या ट्रेकला सुरुवात केली. आज माझं आयुष्य कायमचं बदलणार होतं. पावसानीही हजेरी लावली. तिच्या आवडत्या पावसामधे तिला मागणी घालायचा प्लान बहुतेक पुर्ण होणारचं होता. ----> मुलींचा सिक्स्थ सेन्स पक्का असतो का मी त्यादिवशी विचित्रासारखा वागत होतो हा प्रश्ण मला कधीचं सोडवता आलेला नाही. कारण जसजसा किल्ल्याच्या वरच्या जिन्याकडे सरकत होतो आम्ही तसतसं ती मला बोलता करायचा प्रयत्न करत होती. माझं हलकट मित्रमंडळ बाउन्सर वर बाउन्सर टाकत होतं.


बखरींची सांगाव्यांचे अन पुराणातली वांग्यांचे नवे पुराण

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
मी आत्ताच एका श्रीलंकन (?) लेखकाचा "दि काँट्रीब्युशन ऑफ श्री लंकन हिस्टॉरीकल ट्रॅडीशन टू द रिकन्स्ट्रक्शन ऑफ हिस्टरी ऑफ अँशिएण्ट इंडीया(पिडीएफ-पेपर)" ऑनलाईन वाचला. त्यातील टिकेची दखल घेण्याच्या निमीत्ताने, माझे हा नवपुराणाचा धागा बखरींची सांगी अन पुराणातली वांगी या पहिल्या पाना-धाग्या-वरून पुढे नेत आहे. मागच्या धागा चर्चेत वचन 'पुराणातील वांगी' नव्हे, तर 'पुराणातील वानगी' असे आहे हे काही जणांनी आवर्जून सांगितले.


भीतीच्या भिंती: ७. कोपरा

लेखक: आतिवास | प्रसिद्ध:
भाग , , , , , स्त्री-पुरुष समतेच्या प्रवासात ‘खास स्त्रियांसाठी असणा-या सोयी’ हा विरोधाभास नसतो, तर समतेच्या वाटचालीतला तो एक अपरिहार्य टप्पा असतो – हे भाषणातलं वा


कृष्णधवल छायाचित्रे......मिपा स्पर्धा-१० निकाल

लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:
मी हा निकाल कसा लावला याबद्दल प्रथम थोडेसे... मी कोणाचे फोटो आहेत हे न बघता एका फोल्डरमधे सेव्ह केले. ते फोल्डर नंतर Adobe Bridge मधे ओपेन केले व त्याचे १ ते पाच असे मानांकित केले. ज्याला पाच स्टार होते ते एकत्र केले व ते परत १-५ या स्केलवर मानांकित केले. त्यातून तीन फोटो निवडले ते क्रमांकानुसार खालील प्रमाणे. क्रमांक एक : सर्वसाक्षी क्र्मांक दोन : मोहनराव क्रमांक तीन : अभिदेश व स्पा (दरवाजा) काम अवघड होते. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे बर्‍याच जणांचे जे फोटो स्पर्धेसाठी टाकले नव्हते ते अधिक चांगले होते.