Welcome to misalpav.com

पाउस, ती आणि मी- भाग १

लेखक: डॉन व्हिटो कॉर्लिऑन | प्रसिद्ध:
दोन दिवसांपुर्वीची गोष्ट, ऑफिसमधुन भिजत घरी आलेलो. घरी कोणी बॉसिंग करायला नसल्याने मस्तं पैकी कपडे बदलुन बीन बॅगवर आडवा तिडवा वेडा वाकडा पसरलेलो होतो. समोरच्या खिडकीमधुन मस्तं पाउस दिसत होता. कानावर हेडफोन आणि हातामधे कॉफीचा मग. विनअँप ला शफल ला टाकुन डोळे बंद करुन कॉफीचे सिप घेत होतो. थोड्या गाण्यांनंतर हे गाणं चालु झालं आणि नकळत अनेक खपल्या काढल्या गेल्या.


श्वास

लेखक: मनो | प्रसिद्ध:
ही वेळ कुणाच्याही आयुष्यात येऊ नये. त्याचं वय फक्त ८ वर्षाचं. मनसोक्त खेळायचं हुंदडायचं ते वय . पण आज तो एका गाडीत मागल्या सीटवर कसाबसा श्वास घेत आपल्या मृत्युशी झगडत होता. गाडी रोजच्या रात्रीच्या मालवाहक trucks च्या रांगेत अडकली होती आणि त्याचा बाप त्या चक्रव्यूहातून दवाखान्याचा रस्ता शोधत होता. त्याचा बाप हा एक अमेरिकन पत्रकार, new york times सारख्या प्रतिष्ठीत वृत्तसंस्थेचा भारतीय उपखंडातला वार्ताहर. बायको, ब्राम आणि एडन ही दोन मुले असे चौकोनी कुटुंब. दिल्लीत काम करायची संधी चालून आली तेंव्हा त्याने ती उत्साहाने आणि पूर्ण तयारीनिशी पत्करली.


नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग 1

लेखक: योगविवेक | प्रसिद्ध:

नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग 1

प्रा अद्वयानंद गळतगे

मिसऴपाव धारक हो, खालील लेख मला भावला. नाडीग्रंथांचे अवलोकन करायला जाणाऱ्यांच्या मनातील प्रश्नांचे उत्तर मला मिळाले ते सोबत एका नाडीपट्टीचा फोटो नमुन्यादाखल सादर. अनेकांना याविषयाची कल्पना नसेल. त्यांनी पुढील भागातून लिंक मिळवून वाचावी ही विनंती.
नाडी ग्रंथ प्रेमी विंग कमांडर शशिकांत ओक यांनी प्रस्तूत लेखकाला (प्राचार्यअद्वयानंद गळतगे यांना) प्रश्न विचारला होता. " आपल्या लिखाणात नवग्रह मानवावर प्रभाव टाकत नाहीत, ते एका फल ज्योतिष नामक व्यवस्थेचा भाग आहेत.


कोणी मिपाकर चीन मधे आहे का?

लेखक: मनिष | प्रसिद्ध:
कोणी मिपाकर चीन मधे आहे का? मला तातडीने थोडी माहिती हवी होती. कोणी असल्यास सांगा, मी व्यनि ने संपर्क करेन!


कडेलोट........

लेखक: एक एकटा एकटाच | प्रसिद्ध:
"हेलो....... हेड कॉन्सेटेबल जाधव बोलतोय चारकोप पोलीस स्टेशन" "......... " "कधी??????" "............." "तुम्ही कोण बोलताय?" "............." " ठीक आहे तिथेच थांबा, आम्ही पोहचेपर्यंत कुणालाही बॉडीला हात लावू देऊ नका. आणि हो तुम्हीसुद्धा लांब उभे रहा" "बिल्डिंगचे नाव काय???" "................" "ठीक आहे पोहचतो पंधरा मिनिटात" एव्हढ बोलून जाधवांनी धाडकन फोन आपटला. "भोXXच्यांना रात्री दिड वाजता सुसाईड करायची काय हुक्की येते. काय माहित?? चला चव्हाण गाडी काढा. सगळ्यांना सांगा तयार व्हायला.


|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - २

लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:
|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - १ || सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - २ हंऽऽ कुठेपर्यंत बरे आलो होतो आपण ? श्री जोशी यांना एक हकिकत ऐकण्यास मिळाली. ‘‘सुमारे वीस वर्षापूर्वी म्हणजे अंदाजे १९०० साली, काही मराठे उंट घेऊन या मैदानात उतरले. हे लोक दिवसा झोपा काढीत व रात्री तंबूत खणत असत. सात आठ दिवस ते खणत होते. एका दिवशी ते अचानक निघून गेले. सकाळी गुरे चारण्यासाठी जी गुराखी मुले त्या मैदानात गेली त्यांना तेथे अनेक खड्डे दिसले.


बेफिकीर…पण काही क्षणापुरताच

लेखक: ganeshpavale | प्रसिद्ध:
कागदावर रेखाटलेलं आयुष्य, ओरबडलेलं लेखन आणि कित्येक कागदांचा चुरा करून हिरमुसून सांडलेले अश्रू सारं काही तुझ्यासाठीच… तुझ्या सवयी, गोड आठवणी जपताना साऱ्या जखमां पुन्हा भळभळत ताज्या होतात, तीव्र वेदनेत त्या कळा नकोशा झाल्या की अभद्र ते सारे शिव्या शाप मीच मला देत कुढत बसतो. मनाची कवाडे केंव्हाच बंद केली पण त्यावरील तुझी दस्तक अजूनही तशीच. रोज तीळ तीळ तुटताना मगरमिठीत गवसल्याची जाणीव होते या भाबड्या जीवाला. नकोसा होतो हा देह, नकोसा वाटतो जीव. मी जातो ते फक्त तुझ्या निशाणीसाठी. तुझ्यासोबत जगलेले ते क्षण किती गोड होते. किती मदमस्त जीवन होतं.


निकाल (शतशब्दकथा )

लेखक: खेडूत | प्रसिद्ध:
आज धाव्वीचा निकाल लागला. श्यात्तर टक्के पडले. आबांनी पेडे वाटले . मला बरं वाटलं, निकालात नाव बरोबर छापलंय म्हणून ! ''स्मिता गजानन यादव'' दादाच्या पाठीवर मी झाली त्यवाबी आज्जीला पोरगाच पायजेल व्हता . पन मी झाली. माजीच चूक जनु ! आज्जी रडली. माज्यावरच चिडली. म्या तिला फशिवलं म्हनं . नाव ठ्येवलं फशीबाई ! समद्या पोरी हासायच्या शाळंत. * * * धाव्वी सुरु झाली, तशी गेली हेडसरांकडं ! म्हनलं, ''सर नाव बदलायचंय माजं - पन घरला सांगायचं नाय ! धाव्वीच्या निकालावर स्मिता नाव यायला पायजेल'' . मास्तर द्येवमानुस. त्येनला पटलं - बदलूया म्हणालं ! लगीच कुटंकुटं फोन क्येले आन अर्जावर सही घ्येतली.


हाक

लेखक: कहर | प्रसिद्ध:
"आजच नेमके साहेबाला काम आठवले" सदा स्वत:शीच बोलत होता. "एक तर आज अमावास्या, त्यातच तो रोजचा रोड पालिकेने सकाळी खोदून ठेवलेला म्हणजे त्या आडवाटेने कच्च्या रस्त्याने स्मशानावरुन फिरून जावे लागणार म्हणून लवकर निघावे म्हणले तर ११ वाजवले xxxने" साहेबाला शिव्या घालीत गडबडीत सायकल ताणत असलेल्या सदाची तंद्री पत्र्याच्या खडखडाटाने मोडली. पॅडल फिरेना म्हणून त्याने उतरून पाहिले. सायकलची चेन निसटलेली. आता सायकलच्या नावाने अजून दोन शिव्या तोंडातून बाहेर पडल्या. सदाने आजूबाजूला पाहिले. चिटपाखरुहि नव्हते. मागे पडलेला आणि पुढे असलेला दिव्याचा खांब दोन्ही मेणबत्ती एवढे दिसत होते.