Welcome to misalpav.com

वन लायनर्स

लेखक: गणेशा | प्रसिद्ध:
कधी काळी लिहिलेले माझे वन लायनर्स येथे देत आहे. आज काळ थोडा टाईम मिळत आहे मिपा वरती वाचन आणि लिखानासाठी त्यामुळे छान वाटत आहे. कधी काळी एक कादंबरी लिहित होतो, परंतु ती कादंबरी अपुर्ण राहिली ती राहिली.. कादंबरी लिहिणे आपल्याला अशक्य असे वाटते आहे..तो आपला प्रांत नाही उगाच २-३ भाग लिहिले आणि मिपावर वर पण दिले होते . असो एखादे वाक्य आवडले तर जरुर सांगा वन लायनर्स : १. "समर्थन हे चुकीच्या गोष्टींना लागते, जे बरोबर असते ते शास्वत असते त्याला आधाराची गरज नसते." २.


सुन्न करणारी झाडाझडती

लेखक: आकाश खोत | प्रसिद्ध:
नुकतीच माझी विश्वास पाटीलांची "झाडाझडती" हि कादंबरी वाचून झाली. आणि मी शीर्षकात लिहिल्याप्रमाणे या कादंबरीने मला सुन्न करून सोडले. जांभळी नावाच्या एका गावात धरण होऊ घातलेलं असतं.


गाव, शहर आणि बरंच काही

लेखक: अभिशेखि | प्रसिद्ध:
नशीब फक्त माणसांनाच असतं असं नाही. ते जमिनीच्या तुकड्यालासुद्धा असतं . कुणाच्या नशिबी समुद्राची साथ असते तर कुणाच्या नशिबी पर्वतांची रांग. नुसतं नशीबच नाही, स्वभाव असतो प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला. चेहरा असतो, भूतकाळ असतो आणि वर्तमानसुद्धा. तो तुकडाही तसाच होता. त्याला आठवतं तेव्हापासून समुद्राची सोबत होती. परदेशी पाहुणे आणि परदेशी माल ह्यांची नवलाई त्याला कधीच नव्हती. त्याच्या किनाऱ्याला गलबत लागायची आणि मालाच्या किंमतीची खलबतं व्हायची. आजूबाजूच्या प्रदेशात सत्ता कुणाचीही असेना ह्याच्यावर राज्य व्यापारी लोकांचंच असायचं.


कॉफी, समुद्र, कोर्ट, आणि बरंच काही...

लेखक: समीरसूर | प्रसिद्ध:
गेल्या दीड-दोन महिन्यात जरा चंगळच केली. तशी नाटक-सिनेमाच्या बाबतीत आम्ही ती नेहमीच करत असतो पण गेल्या दीड-दोन महिन्यात जरा जास्तच केली. सिनेमा-नाटक माझं पहिलं प्रेम! कुठल्याही वेळेला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे किंवा नाट्यगृहात जाऊन नाटक बघणे हा माझा सगळ्यात आवडता छंद. प्रत्येक चित्रपट किंवा नाटकाच्या बाबतीत लेख लिहिणे शक्य नाही म्हणून काही नाटक-चित्रपटांविषयी थोडं लिहिण्याचा हा एक प्रयत्न. कॉफी आणि बरंच काही... एक छान, गोड प्रेमकथा. हळूवार फुलत जाणारी. आजच्या काळाला अनुसरून असणारी गोष्ट. वैभव आणि प्रार्थना हे एकाच पुणे-स्थित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत असतात.


छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल

लेखक: संपादक मंडळ | प्रसिद्ध:
छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल या स्पर्धेलाही छान प्रतिसाद मिळाला. छायाचित्रे जरा कमी आली पण सगळीच अतिशय सुंदर होती. पहिल्या क्रमांकावर आलेले छायाचित्र वगळता इतर सर्वांनाच फार थोड्या फरकाने गुण मिळालेत.


एक आठवण - उन्हाळ्याच्या तो दिवस

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
गेल्या १०-१२ वर्षांपासून दिल्लीत ही नागपूर सारखा उन्हाळा पडू लागला आहे. मे महिन्यातच तापमान ४५ अंशापर्यंत जाते. सोफ्यावर बसून विजय वर्तमान पत्र वाचत होता, लू लागून मरणार्यांच्या आंकड्यांवर त्याची नजर गेली. वाचता-वाचता, अतुलचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळला. पाच वर्षांपूर्वीचीच मे महिन्यात असाच उन्हाळा होता. आकाशात सर्वत्र पसरलेली राजस्थान मधून येणारी लाल धूळ आणि प्रचंड गरम वारे, दिवसाकाठी घर बाहेर निघणे दुष्कर होते. त्या दिवशी शनिवार होता, विजय काही कामानिमित्त, आर के पुरम येथे स्थित भिकाजीकामा पेलेस येथे गेला होता. काम संपवून, दीड एक वाजेच्या सुमारास बस घेण्यासाठी तो बस स्थानकावर आला.


झोपलेले नशिब

लेखक: खंडेराव | प्रसिद्ध:
आटपाटनगरात एक कोळी रहायचा. रोज सकाळी उठुन मासे पागायला जायचा. जे काय मासे मिळायचे ते बायकोच्या ताब्यात देउन दुपारी आराम करायचा, पोराशी खेळायचा. बायको काही मासे घरासाठी ठेवुन उरलेले विकायची, घरी येतांना टोपल्यात बाजार भरुन आणायची. अशीच काही वर्षे गेली. घरात अजुन एक बाळ आले. कोळ्याला वाटायला लागले, सभोवताल बदलतच नाहीये. तीच झोपडी, तेच जुने कपडे. रात्रीची झोप उडाली. एक दिवस स्वप्नात एक म्हतारा आला. स्वप्नात आला कि खरोखर आला हे काय कोळ्याला कळाले नाही. त्याने कोळ्याला सांगितले, की तुझे नशिब झोपलेले आहे. ते जोपर्यंत जागे होत नाही, काहीही बदलणार नाही.


काय दुखलंय...?

लेखक: संदीप डांगे | प्रसिद्ध:
एका प्रश्नाचे उत्तरः प्रसंग एकः बांद्र्याचे जे जे होस्टेल. रात्रीचे २ वाजलेत. अगदी पाप्याचे पितर असलेला एक मुलगा लघुशंकेला गेला असता चक्कर येऊन तिथेच पडला. बेशुद्ध झाला नाही. पण अंगात उठण्याचे त्राण बिल्कुल नाही. त्याला उचलून रेक्टरच्या गाडीत घालून जवळच्या एकमेव उपलब्ध असलेल्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटल मधे नेले. निवासी डॉकने छातीला स्टेथो लावून तपासले. काही प्रश्न विचारले. ताबडतोब रक्त/लघवी तपासणी, छातीचा एक्स-रे वैगेरे काढायला लावला. आम्ही जाम टेंशनमधे.


टाईमपास २ - बकवास फुल्ल टू

लेखक: समीरसूर | प्रसिद्ध:
जवळपास २० वर्षांपूर्वीची माझी शोकांतिका सांगतो. देवाच्या दयेने (मार्कांच्या बाबतीत आम्ही अगदीच कंगाल होतो) एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आम्हाला प्रवेश मिळाला. दिल खुश हो गया. महाविद्यालय सुरू होण्याची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तसे तसे आमचे निरागस मन कल्पनेच्या उंच उंच आकाशात एखाद्या मोरपीसासारखे तरंगू लागले. ऐन तारुण्याचे दिवस ते. आणि हिंदी सिनेमातल्या तारुण्यसुलभ प्रेमाविष्कारावर पोसलेले आमचे कोवळे मन ते! निष्पाप होते.


गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४४

लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
मागिल भाग.. मग देवळातून बाहेर आल्यावर बाकिच्या पुरोहितां बरोबर 'एकंदर दिवस कसा-गेला?' याची एक लहानशी ठरलेली चर्चा झडते..आणि घोड्याला टाच मारल्यासारखी गाड्यांना किका मारून..आमचं हे काहिसं आनंदी झालेलं देहाचं गाठोडं घराची वाट धरतं! ........ पुढे चालू... ============================= मग येतो श्रावणामधला ठरला मंगळवार .. हल्ली हे शिवंमंगलागौरी व्रत ,व्रत म्हणून कोणी करत असलं नसलं..तरी त्यात मिळणारी एंजॉयमेंट राहिलेली आणि काळानुसार अगदी वाढलेली सुद्धा असल्यानी, कमी अधिक प्रमाणात का होइ ना?