Welcome to misalpav.com

१३ ही संख्या अशुभ का मानतात..? ती खरोखरच अशुभ आहे का?

लेखक: ग्रेटगणेश | प्रसिद्ध:
१३ ही संख्या अशुभ का मानतात..? ती खरोखरच अशुभ आहे का? पुढारलेला असो वा मागास, जगातील प्रत्येक समाजात काही न काही अंधश्रद्धा असतातच! अंधश्रद्धा काही प्रमाणात 'जगणं' सुसह्य करतात असंही म्हणता येईल. युरोप-अमेरीकेतील वैज्ञानीक दृष्ट्या पुढारलेला देश असो वा भारतासारखा आध्यात्मीक भगव्या प्रकृतीचा देश असो, अंधश्रद्धा ह्या असायच्याच..! याच अंधश्रद्धांपैकी एक म्हणजे '१३' या आकड्याला अशुभ मानणं..या आकड्याला अशुभ का मानतात याची उत्तरं त्या त्या संस्कृती देतातच पण आपल्या भारतातही त्याला समर्पक उत्तर सापडतं..!


‘माझी’ क्रिएटीव्हिटी

लेखक: सौन्दर्य | प्रसिद्ध:
काही दिवसांपूर्वी 'यु ट्युब'वर सफरचंदाचा हंस बनविण्याचा व्हिडियो पाहिला आणि ठरवले की आपण देखील सफरचंदाचा हंस बनवायचा. हिला (बायको) व त्याला (मुलगा) ती विडीयो क्लिप दाखवली आणि डीक्लेर केले की आज मी सफरचंदाचा हंस बनवणार. त्यावर आमची झालेली चर्चा आणि त्याचा परिणाम खाली देत आहे. पण त्या आधी त्या व्हीडीयोची लिंक देत आहे. मी – “अगं, सफरचंद कुठे ठेवलीत ?” ही – “किती वर्षे झाली आपल्या लग्नाला ? घरातच राहता ना ? आणि सफरचंदं कुठे ठेवतात ?


अ‍ॅलीना रोमरः मराठी विषयाची विद्यार्थिनी

लेखक: पाषाणभेद | प्रसिद्ध:
नमस्ते, माझे नाव अ‍ॅलीना रोमर आहे. मी नॉर्वेची नागरीक आहे. मी पुन्यात शिकते. मी पुने युनिवर्ससिटी मदे मराठी सब्जेक्टमदे बीए करते आहे. मला मराठी खुप खुप आवडते. मी रोज युनिवर्ससिटी मदे जाते. मला माझे कॉलेज खुप आवडते. मी माझ्या घरमालकांकडे पेईंगगेस्ट आहे. मी कोथरूडला राहते. मी दररोज पायी चालत कॉलेजला जाते. चालत जातांना मला नागरीक दिसतात. दुकानदार दिसतात. रिक्षा दिसतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यामुळे मला दररोज नविन गोष्टी समजतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यावेळी मला भारतातले नागरीक दिसतात.


स्वच्छंद - १

लेखक: सर्वसाक्षी | प्रसिद्ध:
शहरात राहात असूनही सुदैवाने सकाळ उजाडते ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने. बुलबुलची साद, दयाळचा सूर, इवल्याश्या सनबर्डसचा चिवचिवाट, तांबटाचा टिकटिकाट, देवकावळ्याचे घुमणे, किंगफिशरचा किर्किरात, चिमण्यांची चिवचिव आणि सर्वांवर टिपेला जाणारा पोपटांचा कलकलाट. तसे पोपट पूर्वीपासूनच आहेत पण गेल्या पाच एक वर्षात त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. निलगिरी, सुबाभुळ, शेकट, सोनमोहर अशा अनेक झाडांवर ही मंडळी वावरताना दिसतात. एकाने साद घालायची, तिघा चौघांनी प्रतिसाद द्यायचा, मग सर्वांनी कलकलाट करायचा आणि मग एकसमयाव्च्छेदेकरुन सर्वांनी थव्याने उडुन जायचे हा नित्यक्रम. पक्षी हा मुक्त व स्वच्छंद विहरतानाच छान दिसतो.


एका नाटकाचा दुर्दैवी अंत

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
जवळपास ३० एक वर्षांपूर्वीची गोष्ट. हौशी कलाकार मंडळीचे नाटक मंचावर सुरु होते. बैठीकीच्या खोलीचे दृश्य होते. मंचावर सोफासेट, सेंटर टेबल इत्यादी वस्तू होत्या. अभिनयात दंग असलेला नायकाचा पाय कुठल्या तरी वस्तुत अटकला आणि तो धाडकन सेंटर टेबल वर आपटला. कपाळावर चार टाके आले, अर्थातच नाटक अर्ध्यावरच संपले. मंडळी हौशी होती, तालिमी करताना मंचावर ठेवलेल्या वस्तूंचा विचार केला नव्हता. जर तो विचार केला असता, तर नाटक अर्ध्यावर संपले नसते. सिनेमात आपण पहिले आहे, दुष्ट खलनायक, नायकांच्या आप्तांना अधिकांश वेळी नायिकेला फासावर लटकवतो, नायिका तडफडू लागते.


भृगुसंहितेच्या शोधात... 2

लेखक: योगविवेक | प्रसिद्ध:
मित्र हो, या यात्रेतील महत्वाचा भाग होता की मेरठ, लखनौ, प्रतापगढ व साहरनपुरला भेट देऊन तेथील भृगुशास्त्रीकडील संहिता पत्रांची माहिती व जमल्यास गोडीगुलाबीने त्यांच्याकडील पट्ट्यांचे फोटो काढून पट्ट्यांचे करायला प्रवृत्त करणे. सहारनपुरच्या केंद्रात केदारनाथ प्रभाकर यांच्या मुलाने 'सध्या रामनवमीमुळे वडील भेटू शकणार नाहीत' म्हटल्यावर पालम विमानतळावरून सरळ आम्ही मेरठच्या डब्बा गाडीत बसायला आयएसबीटी वरून चढलो. ही गर्दी, घाम येणारी गर्मी, त्यात गावागावातून झुंडीच्या झुंडी आसपासच्या गावात लागलेल्या मेळ्यात जायला ट्रॅक्टरचे ट्रेलर भरभरून जाताना पाहून रामनवमीच्या गर्दीचा हिसका आम्हाला कळून आला.


बाबानची फजिती....

लेखक: सुदिप खेडगिकर | प्रसिद्ध:
स्थळः- जेवणचे टेबल, वेळः- सन्ध्याकाळ किन्वा रात्र..... बाबा म्ह्णतात, चिरन्जीव....कोणती बीअर घेता ???? मुलगा पार हवेत... क क कोणती बीअर... बाबा तुम्ही काय म्हण्ताय ते मला नाहि कळत...(मुल्गा बापाचि नजर चुकविण्याचा फुकट प्रयत्न कर्तो) बाबा खूप गम्भीर चेहरा... बेटा... मी तुझा बाय द वे नाही आउल द वे बाप आहे... खाणार कानाखाली सान्गणार सगळ.. इतक्यात आई येते... काय हो... काय सान्गणार आहे सोन्या आपला..??? (सोन्या......?????)--बाबा... तुझा सोन्या आता जरा जास्तच शहाणा झालाय.. बीअर घेतात चिरन्जीव आप्ले... आईच्या दोन आथ्या ताणल्या जातात...तरीही... नाही हो..


'लिव्ह लायसन्स'

लेखक: फुंटी | प्रसिद्ध:
आज सकाळी बाईक पार्क करत होतो.अविदादा अचानक गेला त्याची बाईक अजूनही पार्क केलेली आहे.पार्किंग वाला म्हणाला,' देखो आजकल गाडी पार्क करके जानेवाला शाम को वापस आयेगा उसका भरोसा नही रहा ...पार्किंग के लिये रोज वही जगह नही मिली तो लोग खामखा झगडा करके जाते है ' अस काही घडलं की अंतर्मुख होऊन विचार करण्याशिवाय पर्याय रहात नाही.मानवी जगण्याच्या मर्यादा स्पष्ट होतात.आपण कितीही म्हटलं तरी आपल्या आवाक्यात आपल जगण नसतंच..आपल्या विचारांच्या पलीकडे असलेली ही शक्ती आपल्या जगण्यावर अंमल करत असते.तोच देव असेल का?? अज्ञात अशा या शक्तीचा वावर आपल्या सभोवती असेल का ?