स्वप्नं विकणारा माणूस
- Read more about स्वप्नं विकणारा माणूस
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 2991 views
स्वप्नं बघण्याचं वेड प्रत्येकालाच असतं. माणसामधलं हे वेड त्याने हेरलं होतं आणि ठरवलं होतं, आपण स्वप्नं विकायची. छोटी , मोठी , लोभस , गोंडस , कधी अतर्क्य तर कधी आवाक्यातली अशी सगळी स्वप्नं विकायची. स्वप्नं पाहणं खरंतर सोप्पं असतं. कधी झोपेत तर कधी जागेपणी आपण स्वप्नं पाहिलेली असतातच. पण आपल्याला पडलेलं प्रत्येक स्वप्न आपल्या आवाक्यातल असेलच असं नाही. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार स्वप्नं दाखवणं आणि विकणं तसं जिकिरिचच काम, पण ते त्याला जमायचं.
लोकांची स्वप्नं म्हणजे त्याच्यासाठी रंगीबेरंगी फुगे होते. लाल ,गुलाबी , हिरवा , पिवळा अशा रंगांचे.