गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३८
- Read more about गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३८
- 13 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 6224 views
मागिल भाग..
जिन्याच्या पायर्या चढू लागलो..
पुढे चालू...
==================================
अर्थातच हा जिना मी प्रथमदर्शनी जरी एका इमारतीचा चढत असलो,तरी मनामधे जी चढण सुरु झाली होती, ती एका व्यवसायिक वटवृक्षाची होती..याचा मला तेंव्हा अंदाजंही आलेला नव्हता. काय आहे ना? की कुठल्याही नोकरीधंद्यात प्रथम प्रथम माणासाला सशाची कातडी प्राप्त झालेली असते. प्रत्येक नविन गोष्ट करताना तो घाबरतो,चाचपडतो..हे करु की नको? चुकेल की बरोबर येइल? हे असच-असतं का? असले ढीगभर प्रश्न त्याला पडतात.
१९६६ साली वैजयन्तीमालाची प्रमुख भूमिका असलेला 'आम्रपाली' हा चित्रपट. शंकर जयकिशनचे संगीत, एम.आर.आचरेकरांचे कलादिग्दर्शन, भानू अथय्या यांनी केलेली वशभूषा, गोपीकृष्ण यांचे नृत्य दिग्दर्शन, वैजयंतीमालाचे सौंदर्य आणि या सर्वांतून साकारलेली एकाहून एक सरस नृत्य-गीते, यामुळे तो त्याकाळी चांगलाच गाजला होता.
...