Welcome to misalpav.com

अवताराची गोष्ट....

लेखक: जेपी | प्रसिद्ध:
पिढीजात चालत आलेली गावची देशमुखी सांभाळणारा संपतराव तसा भला माणुस..सगळ्या गावचा कारभार पहात होता.. त्याच्या बद्दल कुणी वाईट-वक्कट बोलायच नाही..संपतराव सगळ्याच्या मदतीला धावायचा. तरी त्याला स्वतःला पोर नसल्याच दुखः होत.लग्नाला पाच वर्ष होऊन गेलती..सगळे देव,तिर्थ्,डॉक्टर पालथे घालुन झाले.. देशमुखाला आपला वारसा कोण चालवणार याची काळजी लागुन राहीली.. देवान बहुतेक त्याच आईकल..उशीरा का होईना घरात पाळणा हलला..देशमुखाला आभाळ ठेंगण झाल.. योगायोगान त्या वेळेस गावात भागवत सप्ताह चालु होता..देशमुखाने..भागवतकार पुराणीक बुवांना घरी बोलवल.. बुवा आले..देशमुखाने आदरभावाने त्यांचा पाहुणचार केला..पोराला त्यांच्


आमचेही कांदेपोहे – कि दारू चकणा ? एक सत्य अनुभव अंतिम भाग ३ – सुखांत ...

लेखक: हेमन्त वाघे | प्रसिद्ध:
मागील दोन्ही भाग इकडे वाचा. भाग १ http://www.misalpav.com/node/30677 भाग २ http://www.misalpav.com/node/30702 “ वोडका???” .............” रम ???!!!” ............. “दारु ???????/!!” ती भयानक किंचाळली ! काही सेकंद सगळे सुन्न न्न न्न न्न ......................... ( हा स्पेशल इफेक्ट ......) मग तो कॅप्टन मराठीत म्हणाला “ mam ते cocktail आहे ना त्यात आम्ही गेस्ट च्या पसंतीचे ड्रिंक देतो .म्हणून तुमचा choice विचारला. “ तो विलक्षण शांत पणे म्हणाला. मला त्याचे कौतुक वाटले. “ ड्रिंक ..... दारू ............ नाही हो मी अजिबात पीत नाही ...” मुलगी अजून थरथरत होती .


पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत

लेखक: गंगाधर मुटे | प्रसिद्ध:
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत
अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

महात्मा जोतिबा साहित्य नगरी (वर्धा) :


माझे पहिले रक्तदान (?)

लेखक: सौन्दर्य | प्रसिद्ध:
शाळा ओलांडून कॉलेजमध्ये पाय ठेवला आणि जणू पंखच फुटले. शाळेतील शिस्त, तो कंपल्सरी करावा लागणारा गृहपाठ, तो युनिफॉर्म,कश्श्या कश्श्याचं मुळी बंधनच उरले नाही. त्यात आसपास विहरत असलेली फुलपाखरे बघून, “धरतीपर अगर कही स्वर्ग है, तो वो यहीं है, यहीं है, यहीं है” म्हणावेसे वाटू लागले होते. त्यातच एक, पु.लं.च्या ‘म्हैस’मध्ये वर्णन केल्यासारखी एक ‘सुबक ठेंगणी’ मनात भरायला लागली होती. आम्ही तिचे नामकरण ‘साठे’ केले होते, म्हणजे ‘साजेशी ठेंगणी’चा शॉर्टफॉर्म. ती आमच्याच वर्गात होती त्यामुळे तिच्या निमित्ताने का होईना वर्गात बसायला लागलो होतो. ती हुशार होतीच आणि त्याच बरोबर कॉलेजमध्ये फार अॅक्टिव्ह होती.


पुण्यनगरी !

लेखक: चिनार | प्रसिद्ध:
पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून चांदणी चौकात जायचे होते. एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा." समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?" ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने" आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ? काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या.


एक संवाद - १

लेखक: खटपट्या | प्रसिद्ध:
एक नामांकीत सॉफ्टवेअर कंपनी. संगणकावर चॅटींग सोफ्टवेअरवर चालू असलेला संवाद - तो - हाय ती - हेलो तो - कधी आलीस ? ती - आत्ताच आलीय. १५ मिनिटे झालीत. ट्राफिक जास्त होते आज. तो - ओके, चहा झाला का? ती - नाही जातेय आता. तो - मीपण जातोय चहासाठी, कँटीन मध्ये येतेयस का? ती - नाही मी जागेवरच चहा घेऊन येतेय. तो - ठीक आहे. डब्यात काय आणलं आहेस ? ती - कालचा उरलेला भात होता त्याला नवऱ्याने फोडणी दिली, तोच घेऊन आलेय. तो - ओके. लकी आहेस. ती - का ? तुला नाही का करून दिले काही बायकोने? तो - तीचे जाउदे गं…. तुला माहीत आहे ना.


दीक्षितांचा दणका

लेखक: पिंपातला उंदीर | प्रसिद्ध:
भ्रष्ट ,अन्यायी आणि कुणालाही आपल्या पाशवी शक्तीने चिरडून टाकण्याची क्षमता असणारी सिस्टम आणि या सिस्टम विरुद्ध उभा ठाकलेला एक सर्वसामान्य माणूस. हा लढा अर्थातच खूप विषम आहे . पण सगळ्यात भारी गोष्ट ही की कधी कधी या युद्धात सर्वसामान्य माणूस पण जिंकू शकतो . प्रचलित सर्वशक्तिमान व्यवस्थेने कितीही आसुरी बळाचा वापर केला तरी . या लढ्यात रोजच्या अवघड जगण्याला पिचलेली आणि कुठल्याही कामासाठी चिरीमिरी द्यावी लागणारी जनता नेहमी व्यवस्थे विरुद्ध उभा ठाकलेल्या माणसाच्या मागे उभी राहते हा जागतिक नियम .


गृहिणी......आदरांजली-२

लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:
आदरांजली-२ इस्मत चुगताई : (१९११-१९९१) त्यांच्या काळातील बंडखोर व रुढींवर, ढोंगीपणावर विनोदाच्या अंगाने आसूड ओढणारे लेखन ही यांची खासियत. त्यासाठी त्यांनी बरीच किंमत मोजली पण चातुर्याने त्या त्यातून सहिसलामत पार झाल्या. त्या काळात असे लेखन करणे किती अवघड असेल याची आपण कल्पना करु शकतो.... का आजच्या काळात ते त्याहून कठीण आहे ......? या कथेत पुरुषी अहंकार, एका स्त्रीकडे माणूस म्हणून न बघता स्त्री म्हणूनच बघण्याचा समाजाचा हट्ट, चांगल्या घरची व वाईट घरची हा भेदभाव, नैसर्गिक भावना, बंधने, माणसाच्या मनात चाललेले खेळ..... इ.वर इस्मतआपाने चांगला प्रकाश टाकला आहे.