Welcome to misalpav.com

प्रश्नाच्या उत्तरातल्या प्रश्नाचं उत्तर..

लेखक: प्राची अश्विनी | प्रसिद्ध:
एक सांगू? उत्तरात नं, अलगद एक प्रश्न ठेवून द्यावा.. बासुंदीच्या वाटीवर कसं हलकं केसर पेरतो ना तसा. मग संवादाला लाघवी स्वाद येतो, मोहक रंग चढतो, दिवसभर चेह-यावर कळत नकळतसं एक हसू खेळत रहातं! म्हणून तर! एक तरी प्रश्न उत्तरात असूच द्यावा ... कारण हम्म् शी हम्म् असं किती वेळ चालणार? स्माईली ला स्मायली असं किती वेळ खेळणार? मारून मुटकून कवितेच्या, सुविचारांच्या मोळ्या तरी कुणी किती बांधणार ? त्यापेक्षा उत्तरात अलगद एक प्रश्न असूच'च' द्यावा ... मग कारण मिळतं, अकारण दार खटखटवायचं. नाहीतर "बोलू की नको, आत्ता की मग?


बेतुक्याचे चर्हाट.....

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
एक वर्षापुर्वी वळलेले चर्हाट...... https://misalpav.com/node/51141 आता पुढे. K-जरी चंचल,चपळ मासोळी लावली जाळी, तरी न लागे गळी खेळतसे जळी, धीवरा संगे खेळतसे रडीचा डाव धीवरा न देतसे भाव आता करू काय उपाव धिवर म्हणे.... धीवरे घातले साकडे वाचून आकडे, प्रार्थना केली मिटला संदेह,सुटला आदेश वाढले बळ, हलले दळ सत्वर पातले धीवर यमुना जळी खेळ रंगला यमुनातीरी "रापण", करण्या फेकली जाळी ओढला किनारी K-जरी,लीलया शक्ती अपरंपार, धीवरा माजी न लागे पार जैसा ठाव जळापरी बेतुक्या म्हणे, -बेतुक्या राॅक्स.