Welcome to misalpav.com

कॉफी...

लेखक: प्राची अश्विनी | प्रसिद्ध:
पांढरा स्वच्छ टॉवेल गुंडाळून शॉवर मधून बाहेर येत तू मला कॉफी विचारतोस. तुझ्या आजुबाजुला शॅम्पूचा वास घमघमत असतो, माझ्या तनामनावर तृप्तीची गोड साय धरलेली असते. ती मोडून कॉफी पिणं जीवावर येतं. शिवाय तशीही कॉफी काही माझी फार आवडती असंही नसतं. पण तरीही, मी मान हलवत होss म्हणते. कारण तुला ती करताना पहाणं कॉफीहूनही फ्रेश असतं. तू बोलता बोलता पाणी उकळायला ठेवतोस. मग "मग" घेतोस. मी लगेच " मला तुझ्यातलीच शेवटची थोडी" म्हणून तुझी लगबग थोडी कमी करते. तू शांतपणे कॉफीचे दोन सॅचे त्यात रिकामे करतोस.


बाँड आणि बांध

लेखक: कुमार जावडेकर | प्रसिद्ध:
विडंबन - 'बाँड' बाँड हा वटण्यास थोडा समय आहे आणि त्याला देणगीचे वलय आहे बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी बातम्या मज वाचण्याची सवय आहे सांग आता मी खरे बोलू कुणाशी झूठ येथे बोलण्याला अभय आहे 'देश हा बदलून टाकू' ते म्हणाले बोललो त्यांना 'कुठे हा विषय आहे?' शासनाची का तमा मी बाळगावी? आज झाले आत्मनिर्भर हृदय आहे - 'सुमार' जावडेकर माझीच मूळ गझल - 'बांध' बांध हा फुटण्यास थोडा समय आहे आणि मागे जीवनाचा प्रलय आहे बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी चेहरे मज वाचण्याची सवय आहे सांग आता मी खरे बोलू कुणाशी झूठ येथे बोलण्याला अभय आहे 'शहर हे बदलून टाकू' ते म्हणाले बोललो त्यांना 'जुना हा विषय आहे' वादळाची का


नवी ईमारतीतील अडगळ निवारण

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
दोन प्राध्यापक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात. पहिल्या प्राध्यापकाने दुसर्‍या प्राध्यापकास कानात कुजबुजत विचारले नव्या ईमारतीच्या अवारातील जुने वड, पिंपळ, पारीजात, .......


भटकंती कोंकण किनारपट्टीची (निमित्त-महिला दिन): भाग २

लेखक: गोरगावलेकर | प्रसिद्ध:
भाग-१ येथे वाचा कशेळीहून गणपतीपुळेला निघालो. सागरी किनाऱ्याच्या रस्त्याने प्रवास करत वाटेत जमेल तेव्हडी ठिकाणे पाहणार होतो. कशेळीजवळ कातळशिल्प आहेत ती बघायची होती. शिल्प मुख्य रस्त्यापासून थोडी दूर आहेत. थोडे अंतर पायी चालावे लागते. चालायची तयारी होती पण कोणी वाटाड्या मिळाला नाही म्हणून विचार रद्द केला. कशेळी हे कनकादित्य मंदिरासाठी प्रसिद्ध असले तरी येथे अजून एक सुंदर मंदिर आहे ते म्हणजे श्री लक्ष्मीनारायण मंदिर. थोड्याच वेळात येथे पोहचलो.