Welcome to misalpav.com

डासबोध

लेखक: रम्या | प्रसिद्ध:
गालावरी हसू, मुखावरी दाढी । राजकारणे गुढी, बांधू पाहे ।। दाढीचे वजन, दाढीचेच भजन । करू आम्ही नमन, दाढीचेच ।। दाढीचाच फोटो, दाढीचीच मूर्ती । सांगावी अपकीर्ती, नेहरूंची ।। पाजू आमुचे रक्त, आम्ही अंधभक्त । करू मशागत, दाढीचीच ।। कपिला गाय, करोनिया माय । गळ्यातच पाय, आमच्याच ।। ईडीचाच टेकू, घेऊनिया फेकू । विरोधकांचे दमन, करू पाहे ।। जे का ईडीसी घाबरले, त्यांसी म्हणे जो आपुले । समीप येता म्हणावे, शुद्ध जाहले ।। चोरावे धनुष्य, लांबवावे घड्याळ । हाती द्यावे टाळ, जनतेच्या ।। प्राणप्रतिष्ठेचा कावा, विरोधकांचा चावा । दाढीतल्या उवा, ठेचू पाहे ।। मस्तवाल खोंड, पाळोनिया गुंड । निर्भयांचे तोंड, फोडू


कोपनहेगन-पॅरीस भटकंती-५

लेखक: अमरेंद्र बाहुबली | प्रसिद्ध:
सकाळी मी आणि विकास दहा वाजता उठलो. थंडी होती त्यामुळे उठायची इच्छा होत नव्हती, खिडकीतून बाहेर पाहिलं आयफेल टावर दिसत नव्हता धुक्यात हरवला होता. आम्ही आंघोळी आटोपून अकरा वाजेपर्यंत तयार झालो. आयफेल टॉवर धुक्यातून अर्धा बाहेर आला होता. . आम्ही पाणी गरम करून रूम मध्ये रेडी टू मेक चहा बनवला, विकास ने आणलेले खाकरे खाल्ले. ऊरलेले पाच सहा खाकर्यांचे पॅकेट त्याने मला दिले. बॅग भरून खाली आलो. लिंडा नावाची गोरी रिसेप्शनिस्ट होती तिने लॉकरमध्ये सामान ठेवले आम्ही निघालो, मिपाकर चित्रगुप्त काकांचा व्हिडिओ कॉल आला त्यांच्याशी बोललो.


जरांगे निघाले.,,,,

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
वाढे माईक्स चा खणखणाट, पूढे कॅमेरांचा लखलखाट, गाड्यांच्या ताफ्याचा दणदणाट तोंडात शब्द कडक, जरांगे निघाले तडक... कडकलक्ष्मीचा जसा चमत्कार, शाब्दीक-चाबकांचा टणत्कार, मिडीयाला रेडी साक्षात्कार, आरक्षण-बुभूक्षूंचा नमस्कार ! मी तोडणार बामणी कावा, जातीयवादी झालास भावा, सिल्वर ओक चा का तू छावा, इलेक्शन अन तापला तवा ! तुला काय एम पी तिकीट हावा? थकले रे पोलीस, नको धरु ओलीस, विषय खूप खोलीस राजकारणी टोळीस जनतेस हा पोळीस निवडणूक होळीस. नको रे करु उपास, आपण करु तपास, नको बसू 'उग्र तपा' स, सांगू आपण 'शपा' स, आणा रे संत्रा रसा स.....


सांज

लेखक: कुमार जावडेकर | प्रसिद्ध:
अता आर्त हळवी हवा सांज असते स्मृती पाखरांचा थवा सांज असते जरी रात्र असते तुझी दाट छाया छटांचा तुझ्या कारवा सांज असते दिशा क्षितिज संदिग्ध करती पुन्हा अन् पुन्हा जीवनी नाखवा सांज असते जुने तेच ते रंग लेवून परके समारंभ अवघा नवा सांज असते न तू आज येथे न मी आज तेथे अता रोज ही मारवा सांज असते - कुमार जावडेकर