Welcome to misalpav.com

ज्योत

लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
रिकाम-टेकडी मोठी तिच्या माथ्यावर माझा वायफळमळा-त्याच्या बांधावर मृगजळ साठवितो रोज थोडे थोडे पिऊनी ते दौडतात कल्पनांचे घोडे एकशृंगी घोडे त्यांचे पसरूनी पंख उडतात - टाळण्यास समीक्षकी डंख कल्पिताचे वास्तवाशी जुळवी जो नाते ज्योत त्याची विझण्याच्या आधी मोठी होते


कोपनहेगन - पॅरिस भटकंती -२

लेखक: अमरेंद्र बाहुबली | प्रसिद्ध:
अर्बन हाऊस . कोपहेगन मधले ‘अर्बन हाऊस’ हे एक मस्त डॉर्मिटरी - टाईप हॉटेल होतं. काॅमन किचन, खाली छोटा बार, खेळायला टेबल टेनिस, फूटबाॅल वगैरे होतं. इथे मुख्यतः काॅलेजच्या सुट्टीवर आलेले मुलं मुली होते. इथे नवीन समजलं की टॅप वॉटर, म्हणजे बेसीनला येणारं पाणीच लोक पिण्यासाठी वापरतात. वापरायचं वेगळं आणि प्यायचं वेगळं असा काही प्रकार नव्हता. आम्हाला खोली उशीरा मिळणार होती म्हणून आम्ही तिथेच वाट पाहत बसलो.