कोपनहेगन - पॅरिस भटकंती -१
- Read more about कोपनहेगन - पॅरिस भटकंती -१
- 7789 views
युरोप! कधी आपण युरोपात जाऊ असं वाटलंही नव्हतं, मिपा, माबो अश्या साईट्सवर जाऊन आलेल्यांचे अनूभव ऐकणे ह्यापलिकडे कधी युरोपशी संबंधं आला नव्हता. बैलपोळ्याच्या दिवशी बैलासारखं काम करून आल्यावर रूमवर पडलो होतो. मोबाईल हातात धरला नी वाट्सअप पाहीलं “I have enrolled you for ***** advanced training in Denmark in November”
बाॅसचा मॅसेज होता. काय?? डेन्मार्क?? माझा विश्वास बसला नाही. पण बाॅसलोक अश्या चेष्टा करत नाहीत. मला विश्वासच बसेना. आपण डेन्मार्कला जाणार. ज्या युरोपच्या सुरस नी चमत्कारीक कथा फक्त ऐकायला मिळतात त्या प्रत्यक्ष पहायला मिळणार म्हणून भयानक आनंदं झाला.