Welcome to misalpav.com

फरार...

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
सीएम हेमंत सोरन, बातमी is on run !! काय चक्क सीएम फरार? पोलीस शोधती दारोदार विनोदी आहे सापशिडी भाजपा ने धाडली ED करोडोंचा जमीन घोटाळा आता पळा अन् अटक टाळा काय हा अध्याय झारखंड बघा नवे भ्रष्टाचार-कांड भाजपाचे अब की बार आपरेशन 'चारसो पार' !!


भरजरी

लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
भासे भरजरी | चिंधी जिंदगीची जेव्हा कवितेची । हाक येते ।। हाक नि:शब्द ही। पंचप्राणांवर घालते फुंकर । हलकीशी ।। हलकेच काही । आक्रीत घडते बेडी निखळते । त्रिमितीची।। तिठा त्रिमितीचा । चिंधी ओलांडते अकस्मात होते । भरजरी ।।


(अ)निती-श चे अभंग

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
नवव्यांदा बोहल्यावर। लोकशाहीची भेळ। सारा संख्येचा खेळ। मुख्यमंत्री।। विरोधकांना फोडा। भाजपा टाकी गळ। असो विरोधी गरळ। मोठा मासा।। नवल करीती लोक। कधी शिवतो सूट? शपथ घे ऊठसूट। दर्जी म्हणे। पाहोन ह्याचा रंगबदल। लाजला तो सरडा। लाल हिरवा करडा। सोय जशी।। महाराष्ट्री उध्वस्त 'यू-टर्न'। आहे खातो मनी मांडे। ताकाला जाऊनही भांडे। लपवतो।। कसली मूल्ये तत्वे? झोक्यांचा सम्राट। पुन्हा मांडी खाट। भाजपाशी ।। गुलजार हसे नितीश । लाजायचे काय काम। म्हणे तो पलटूराम। अखंडसत्तावती।।