Welcome to misalpav.com

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

लेखक: पाषाणभेद | प्रसिद्ध:
मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२ मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे भेट व सह्याद्री फार्म हा कारखाना पाहणी. ठरल्याप्रमाणे मिपाकट्टा अर्थात पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ रोजी संपन्न झाला. मिपाकर पिंगू व वहिनी नव्या मुंबईतून नाशिकला आले. मयुरेश पालकर आधीच आले होते. त्यांची गाडी खराब झाल्याने ते उशीरा जॉईन होणार होते. मी, माझी पत्नी व माझी मुलगी तसेच पिंगू व वहिनी मोहाडी येथे दुपारी१२ च्या सुमारास पोहोचलो. आजूबाजूला अतिशय रम्य व हिरवागार परिसर आहे.


येऊर ते चिरमादेवी ते हावरेसिटी, ठाणे. पावसाळी भटकंती. (2022_08_19)

लेखक: कंजूस | प्रसिद्ध:
येऊर ते चिरमादेवी ते हावरेसिटी, ठाणे. पावसाळी भटकंती. (2022_08_19) ---------- सावधान: लेखाची सुरुवात सूचनेने करावी लागते आहे कारण ही भटकंती थोडी धोकादायक असू शकते. ठाणे पश्चिमेला संजय गांधी उद्यानाची पूर्व सीमा आहे. हे एक प्रतिबंधित क्षेत्र असून यात बिबट्यांचा वावर आहे. बिबट्या तसा संध्याकाळ ते सकाळ फिरतो. दुपारी आपल्या जबाबदारीवर जाऊ शकतो.


मामा भानझे डोंगर,ठाणे .पावसाळी भटकंती २०२२_०८_१८

लेखक: कंजूस | प्रसिद्ध:
सावधान: लेखाची सुरुवात सूचनेने करावी लागते आहे कारण ही भटकंती थोडी धोकादायक असू शकते. ठाणे पश्चिमेला संजय गांधी उद्यानाची पूर्व सीमा आहे. हे एक प्रतिबंधित क्षेत्र असून यात बिबट्याचा वावर आहे. बिबट्या तसा संध्याकाळ ते सकाळ वावरतो. दुपारी जाऊ शकतो. ज्या मामाभानजे डोंगर भागात जाणार आहे तिथे दरगाह असल्याने माणसांचा दिवसा खूप वावर,येजा असते. तसा धोका नाही. करोना प्रतिबंध कमी होऊन वावर हल्लीच सैल झाल्याने आणि पाऊस चांगला झाल्याने इकडे १८ ओगस्टला गेलो होतो. मी गेलेलो मार्ग दिला आहे पण इतर कार,विमान, साधनांचाही उपयोग करू शकता.


माझी ट्रेन माझी प्रेयसी (२)

लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:
भाग १ इथे. नमस्कार रूळगाडी मित्रांनो ! आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे.


नर बळी

लेखक: देवू | प्रसिद्ध:
ह्या वाक्यातील क्रियापद कोण सांगू शकेल? अख्ख्या वर्गाने हात वर केले , फक्त मी सोडून. उत्तर येत नसले तरी सर्वांबरोबर आपणही हात वर केल्यास आपल्याला विचारण्याची शक्यता कमी होत असल्याने बरेच जण तसे करायचे. मी हात वर न केल्याने मला बाई नक्कीच उत्तर देण्यासाठी विचारतील ह्याची खात्री होती. त्याला कारणही तसेच होते. मी कुठलेही मराठी व्याकरण न शिकता बालवाडीची मुलाखत मराठीत देऊन प्रवेश मिळवला होता.


कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

लेखक: टर्मीनेटर | प्रसिद्ध:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६ आधिचा भाग: कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५ "कोवळी सूर्यकिरणे अंगावर घेत, आल्हाददायक हवा खात थोडावेळ घालवल्यावर लॉंचसाठीची गर्दी कमी झाल्याचे पाहून आम्ही तिथून निघालो आणि काही मिनिटांत किनाऱ्यावर पोचलो. ठरलेल्या वेळी बहीणही तिथे आली आणि वीस-पंचवीस मिनिटांचा प्रवास करून आम्ही तिच्या करमळीच्या घरी पोचलो. तिने तयार करून ठेवलेला इडली सांबार भरपेट खाऊन रात्रभराच्या जागरणामुळे झोप अनावर झाल्याने सरळ झोपून गेलो... " ----- दुपारी दोन वाजता बहिणीने जेवणासाठी उठवले.


बिग बुल

लेखक: लॉरी टांगटूंगकर | प्रसिद्ध:
वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, मार्जिन कॉल ते स्कॅम १९९२. जवळपास प्रत्येक सिनेमा आणि टीव्ही सिरिजने शेअर बाजाराला सट्टा बाजार स्वरूपात दाखवलं आहे. हा सट्टा खेळून नुकसान करून ठेवल्याचे एक तरी उदाहरण प्रत्येक घरात असते. या सर्व प्रकारात, बहुतांश ठिकाणी राकेश झुनझुनवाला नाव माहीती असलं तरी कामाबद्दल फार कमी माहीती असते. नाव माहीती असल्याचं कारण म्हणजे बनलेला पैसा. कामाबद्दलची माहीती तशी कमी प्रकाशझोतात असते. बाजारातले काम आणि त्याचे महत्व मेन स्ट्रीम मध्ये फार कमी वेळा दिसते.


हर घर तिरंगा, घर घर तिरंगा

लेखक: सौन्दर्य | प्रसिद्ध:
नुकत्याच पार पडलेल्या ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ ह्या उपक्रमाला भारतीय जनतेने दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहिला व मन आनंदाने व अभिमानाने भरून आले. ज्या पिढीने १९४७ ते २०२२, हा पंचाहत्तर वर्षांचा कालावधी प्रत्यक्ष पाहिला, अनुभवाला व उपभोगीला ती पिढी भाग्यवानच म्हणायची, त्याच प्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली आमची पिढी देखील तितकीच नशीबवान म्हणायची. ज्या तिरंग्याने आम्हाला हा बहुमान दिला त्याचे आभार मानावेत तेव्हढे कमीच आहेत. आता हा उपक्रम समाप्त झाल्यावर ह्या झेंड्यांचे काय करायचे हा प्रश्न मला तसेच माझ्या अनेक मित्र मैत्रिणींच्या मनात उद्भवणे स्वाभाविकच आहे.


अमरनाथ यात्रा--१

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
अमरनाथ यात्रा-बेचाळीस वर्षापुर्वीची आणी आताची. https://www.misalpav.com/node/50542/backlinks १. सन ऐंशीमधे अनुभवलेल्या अमरनाथ यात्रेतील अडचणी, सुखसोई व यात्रेकरूस आज उपलब्ध असलेल्या सोईंचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. २. क्लिक ३ कॅमेरात कैद केलेली छायाचित्रे काळाच्या ओघात लुप्त झाली, यंदा गेलेल्या यात्रेकरूने काही छायाचित्रे पाठवली आहेत व काहीअंतरजाला वरून घेऊन जुन्या आठवणींना उजळा द्यायचा प्रयत्न आहे. यात्रेकरूचे आणी आन्तर्जालाचे आभार. मागील भागातून... ठिक सहा वाजता कॅम्प सोडला व सिंध नदीच्या काठाने पायी प्रवास सुरू केला. पुढे.......