Welcome to misalpav.com

रविवार आणि खून का बदला खून

लेखक: धर्मराजमुटके | प्रसिद्ध:
आज रविवार.. आज कामाचा कंटाळा........... आलाय, आज तु स्वयंपाक बनव ना ! अगं कंटाळा आलाय तर नको करु स्वयंपाक. आज आपण बाहेर जेवायला जाऊया. नक्को. रविवारी मंदिराबाहेर भिकार्‍यांची गर्दी असते त्यापेक्षा जास्त हॉटेलबाहेर टेबल रिकामं होण्याची वाट बघणार्‍यांची गर्दी असते. मग आपण पार्सल मागवूया का ? नक्को. पार्सल पण फार उशीरा येतं आणि ते पदार्थ पण थंड झालेले असतात. मग काय करायचं ? तुला जेवायचं असतं तेव्हा मी तुला हॉटेलचा पर्याय देते काय ? घरी जेवण बनवते ना ? मुझे खून का बदला खून से चाहिए | हट पगली, ऑख के बदले ऑख मांगोगी तो पुरी दुनिया अंधी हो जायेगी !


ठिगळ

लेखक: उपाशी बोका | प्रसिद्ध:
माझ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर मी तिच्या विवाहाचे प्रमाणपत्र आणायला सरकारी ऑफिसात गेलो होतो. समोर ५० च्या आसपास वयाचे गृहस्थ होते. नेहमीच्या अनुभवावरून मी चहापाण्याची चौकशी केली. तर ते मला म्हणाले, "आम्ही लग्नाच्या वेळी आणि मयताच्या वेळी पैसे घेत नाही." हे ऐकुन मी थक्कच झालो. पण तरी खात्री करण्यासाठी परत विचारले की अहो, फूल ना फुलाची पाकळी समजून काही पाहिजे तर सांगा, तर मला म्हणाले "नाही, काही नको. ते आमचं प्रिन्सिपल आहे." :) नंतर १५ मिनिटात त्यांनी माझे काम केले. अजून १ थोडासा वेगळा अनुभव. बऱ्याच वर्षांपूर्वी मी फ्लॅट विकला, तेव्हा रजिस्ट्रारच्या ऑफिसात गेलो होतो.


प्रथम नागरिकाचा दिमाखदार शपथविधी

लेखक: पराग१२२६३ | प्रसिद्ध:
Presidential Buggy नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.


जिलचे देवदूत

लेखक: पर्णिका | प्रसिद्ध:
एखादा वीकांत निवांत मिळावा, कामाच्या आठवड्याच्या व्यस्त दिनक्रमांपेक्षा सर्वार्थानेच निराळा यांसारखे सुख नाही. दोन-तीन महिन्यांतून एकदा असा योग जुळून येतोही. त्यावेळी मला मनसोक्त बागकाम करणे, विशलिस्टमधील बरेच दिवस खुणावणारे पुस्तक बे विंडोच्या आरामशीर बैठकीत बसून वाचणे, जवळपासच्या ठिकाणांना भेटी देणे, नाहीतर बरेच दिवस न केलेली ट्रेल करणे या आणि अशा बऱ्याच गोष्टी करायला आवडतात. मागच्या महिन्यांत अगदी ध्यानींमनीं नसतांना, " अरे! हा तर लंब वीकांत आहे." असा साक्षात्कार झाला. खरे तर आपण सर्वचजण सुट्ट्यांची नेहेमीच आतुरतेने वाट पाहत असतो, त्यानुसार नियोजनही करत असतो.


बहारो फूल बरसाओ - ४

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
तो दिसला...... माझे डोळे बहुधा एल ई डी बल्ब लागल्यासारखे चमकले असणार. नक्कीच. पण हे त्याच्या बरोबर कोण आहे. तो एका बाई सोबत बोलतोय. वयाने त्याच्या एकढीच असेल. त्या मुलीच्या कडेवर एक लहान मूल आहे. तो हात पुढे करतो. ते मूल त्याच्या कडे बघून हसंत त्याच्या कडे झेपावलंय. ते मूल आता त्याच्या कडेवर आहे. मागील दुवा http://misalpav.com/node/50403 मला काय करावं सुचत नाहिय्ये. गाढ झोपेत असताना तोंडावर कोणीतरी थंडगार पाण्याचा हबका मारावा तसा धक्का बसलाय. माझ्या हातून रीटर्न गिफ्ट खाली पडतात. आणि जिन्यावरून घरंगळतात. त्यात काय आहे माहीत नाही पण जे काही आहे ते काचेचं नसावे. मी प्रार्थना करतेय.


राष्ट्रपतींचे डबे

लेखक: पराग१२२६३ | प्रसिद्ध:
Presidential Saloon भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद सार्वभौम भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रपतींसाठी रेल्वेचा खास डबा असावा असा विचार पुढे आला नव्हता.


पुस्तक परिचय - काबुलीवाल्याची बंगाली बायको

लेखक: चिमी | प्रसिद्ध:
आता ऑफिस सुरु होणार म्हणून एकदा घरी जाऊन येऊ म्हणलं आणि गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाय खूप वाईट मुरगळला. आईच्या शब्दात “आल्या आल्या घेतलं का तंगडं मोडून?” तिची कामामुळे होणारी दगदग पाहून खूप वाईट वाटत होतं पण आता गप एका जागेवर बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. घरी गेल्यावर मोबाईलला हातपण लावायचा नाही असा ठरवलं होतं पण एका जागी बसून दुसरं करणार तरी काय? म्हणून मग किंडलवर “काबुलीवाल्याची बंगाली बायको” वाचायला सुरु केलं. सुश्मिता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या या मूळ बंगाली सत्यकथेचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी.


तू.....

लेखक: चक्कर_बंडा | प्रसिद्ध:
तू समोरून अलवार चालत यायचीस मी उगाचंच रानफुलं वेचत रेंगाळायचो पैंजणांची रुणझुण पुढे निघून जायची मागे खच पडायचा पाऊलभर स्वप्नांचा तू पावसात आडोसा पाहून थांबायचीस मी मुद्दामचं भिजत पुढे निघून जायचो काकणांची किणकिण कानाआड व्हायची मागे ढीग पडायचा सकवार निःश्वासांचा तू जराही वळून न पाहता निघून जायचीस मी नुसताच थिजून पाहत राहायचो शून्यात डोळ्यांच्या कडांवर मळभ दाटून यायचे मागे सडा पडायचा ओंजळभर आसवांचा मी धीटपणे कधी पाहू शकलोचं नाही तुला आताशा तुझा चेहराही नीटसा आठवत नाही नाकातील चमकी मात्र चमकत राहते अधे-मध्ये आणि नुसताच गंध येत राहतो कडवट रानफुलांचा #चक्कर_बंडा