Welcome to misalpav.com

आठवणींचा पाऊस: रसग्रहण

लेखक: पाषाणभेद | प्रसिद्ध:
आठवणींचा पाऊस: रसग्रहण सततचा पाऊस मनावर मळभ साचवतो. मनातील आठव वर येऊ लागतात. एकटेपण असेल एक उदाससवाणी छाया भर पावसात आपल्या आजूबाजूला तयार होते. ना कसले काम करवत ना काही घडते. आपले कुणी जवळ नसल्याची खंत अधीकच जाणवते. रात्रभर पडणारा पाऊस अशा वेळी झोप घेऊ देत नाही. सतत आठवणींचे उमाळे फुटत असतात. उत्तररात्री कधीतरी डोळ्याला डोळा लागतो. अशा वेळी कवी म्हणतो: रात्रभर पडणारा पाऊस सकाळी नकोसा होतो कितीही हलका का असेना जेव्हा सतत बरसतो असा हा पाऊस कवीचा रात्रीचा सोबती असतो.


पृथ्वीचे शत्रू

लेखक: भागो | प्रसिद्ध:
‘No matter what we do, an asteroid is going to wipe us out. So we should party hard and wreck the place!’ – to which Homer replies: ‘Yeah, why should the asteroid have all the fun?’ पृथ्वीची सध्याची (साल २०२०) लोकसंख्या आहे ७९६ कोटी आहे. लोक बिंदास जीवन जगतायेत. बिंदास जीवन जगायला माझी काही हरकत नाही. मी कोण हरकत घेणार? कृपया गैरसमज नसावा. मला एवढेच म्हणायचे आहे कि आपला, आपल्या संस्कृतीचा, आपल्या या सुंदर धरतीचा विनाश अटळ आहे. तो कदाचित पुढील दहा वर्षात होऊ शकेल किंवा अजून लाखो वर्षात देखील होणार नाही. कोण आहे असा शत्रू जो आपल्या भोवती घिरट्या घालत आहे? कोविड? प्लेग? भूकंप? हवामान बदल? छ्या.


निसर्गरम्य आंजर्ले (Anjarle, Dapoli)

लेखक: चक्कर_बंडा | प्रसिद्ध:
नोव्हेंबर १५, १६, २०२१ सुरक्षित समुद्रकिनारे, हाकेच्या अंतरावर डोंगर-टेकड्यांवरची हिरवाई, पुरातन देवालये, मत्स्यव्यवसायाचं महत्त्वाचं केंद्र असणारं बंदर, डॉल्फिनची उपस्थिती, जलदुर्ग व किनारी दुर्ग एकाच ठिकाणी, काजूची मोठी बाजारपेठ, कृषी विद्यापीठ अशी अनेक वैशिष्ट्ये मिरवणारा दापोली आणि परिसर नेहमीचं पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असतो.


दिवाळी अंक २०२२ - चर्चा

लेखक: तुषार काळभोर | प्रसिद्ध:
नमस्कार! तर महत्वाचा विषय म्हणजे विषय काय असावा.??? तर कळवा आपली मतं. लौकरात लौकर आपण विषय ठरवू कामाला लागुया.... तारीख पे तारिख व्ह्यायला नको, म्हणुन... लक्ष्मी-पुजन शनिवार २४ ऑटोबर हे लक्षात घेवुन पुढच्या तारखा सुचवतो (एक अंदाज). काहि बदल करायचा असल्यास सुचवा ∴ अंक प्रकाशनः (ऑनलाईन) २२ ऑटोबर ∴ लेख देण्याची शेवटची तारीख - १० ऑटोबर ∴ जाहीर आवाहन करण्याची तारीख - ५ सप्टेंबर टीम्स यावर्षी मोर्चा बुवा सांभाळतील. दिवाळी अंकात सासंबरोबर दर वेळी काही स्वयंसेवक आपणहून सामील होतात.


आपण सगळेच अश्वत्थामे

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
लिहीण्याचा उद्देश जे उत्कटतेने वाटते ते लिहावे.चुक,बरोबर,चांगले वाईट हे वाचणाऱ्यांनी ठरवावे. युगांत(इरावती कर्वे),मृत्युंजय, युगंधर आणी आता अश्वत्थामा ही पुस्तके वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने वाटली,ती म्हणजे महाभारतातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कर्माची फळे भोगून मुक्त झाली. प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर व दुसर्‍यांच्या लेखी चुक होता,अश्वत्थामा सुद्धा. अश्वत्थाम्याचे चिरंजीवीत्वाचे वरदान ऐवढे शापित निघेल हा विचार कदाचित नियतीने सुद्धा केला नसावा. म्हणूनच अश्वत्थाम्या नंतर तीने (नियतीने) कुणालाच हे वरदान दिले नसावे. अश्वत्थामा शेवटचा चिरंजीव. अश्वत्थामा आपल्या कर्माची फळे भोगतोय.