मुंबईच्या मध्यवर्ती भागात असूनही थोड्याश्या अपरिचित असलेल्या दोन लेण्यांना गेल्या वर्षी भेट दिली होती.
आंबोली लेणी आणि कोंडिविते लेणी (जोगेश्वरी लेणी आणि महाकाली लेणी)
अशाच एका तिसऱ्या लेणीला गेल्या आठवड्यात भेट दिली ती म्हणजे दहिसर (प) येथे असलेली मंडपेश्वर लेणी. सहाव्या शतकात निर्माण झालेले हे एक बौद्ध लेणे.