Welcome to misalpav.com
लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
मी सांगणार, तो लिहणार, मग मोजत बसणार ! नाही गं जमणार हे या लेखकांसारखे शशक लिहणे, हताश होत तो उद्गारला.. तुम्ही ना गडे आजकाल लवकरच धीर सोडताय, करा ना प्रयत्न अजून ! ती लाडीकपणे.. अस्स ! मी जे केले ते जमेल का तुझ्या मिपावरच्या एका तरी धुरंधराला ? पुरे झाला तुमचा फाजीलपणा ! तुमच्या त्या +१ च्या नादात मी पण फार वाहवत गेले. व्वा ! म्हणजे माझी एकट्याचीच चुक, आता थांबू मग ! अर्थात ! आणि त्या लेखकांना दुसरे बरेच काही सुचत असते म्हंटले, तुम्हाला दुसरे काहीच दिसत नाही ! तुला ना माझ्या शतकौचे कौतुकच राहिले नाही राणी! मिश्कीलपणे हसत व शंभराव्या मुलाचा गालगुच्चा घेत धृतराष्ट्र गांधारीमहालातून बाहेर पडला..
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

=)) >>>तुम्ही ना गडे आजकाल लवकरच धीर सोडताय, करा ना प्रयत्न अजून ! ती लाडीकपणे या वाक्यातच दुसरा, तिसरा, चौथा, वगैरे अर्थ मनात घोळुनच गेला होता. =)) -दिलीप बिरुटे (चावट) :)

तुम्ही ना गडे आजकाल लवकरच धीर सोडताय, करा ना प्रयत्न अजून ! ती लाडीकपणे या वाक्यातच दुसरा, तिसरा, चौथा, वगैरे अर्थ मनात घोळुनच गेला होता. =)) >> अगदी!!

वा, 'यदाकदाचित' मधला गुडघे चोळत व्हीलचेअरमधुन उठणारा लवचिक धृतराष्ट्र आणि भव्य डॅन्सर गान्धारी डोळ्यासमोर आले. नो प्लस वन.

हा हा, मस्त .. तुला ना माझ्या शतकौचे कौतुकच.. म्हणजे शत कौरव का ? शशक चे वेड बरेच जुने म्हणायचे ..

कोण आहे साहित्य संपादक?तात्या धन्य झाला असता. खी खि खी