Welcome to misalpav.com
लेखक: रम्या | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मन नुसते बाभळीच्या काट्यावर टोचलेले भिरभीरे असते. कैच्याकै विचार मनात येतात व परीणाम काय होतील याचा विचार न करता ते अमलात येतात आणी आयुष्य भर आठवणींत रहातात. असाच एक दुष्ट विचार..... नववीत असेन,शाळेच्या गणपती विसर्जन मिरवणूक नदीवर पोहोचली. शाळेतल्या मुली काठावर असलेल्या वडाच्या झाडाखाली घोळक्यात उभ्या होत्या. मुलं आगोदरच नदीपात्रात डुंबत होती.वडाच्या झाडावर मोठ्ठे आग्यामोहोळ होते. कुणीतरी नतद्रष्ट मुलाने मोहोळ उठवले. नंतर जे काय झाले त्याची आठवण झाली की आजही आंगावर काटे उभे राहातात. तो वड आता खुपच वृद्ध झालाय. गावाकडे जाताना दिसतो.अपसुक लक्ष जाते आणी केलेली खोडी किती दुष्ट होती याची तो आठवण करून देतो.

छान लिहिली आहे कथा... संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. 'न चावणाऱ्या माश्या... ' या आणि इतर कित्येक वाक्यांना (हसू) फ़ुटलेच.

खतरनाक सगळ्या व्यक्तीरेखांसकट प्रसंगच डोळ्यासमोर उभा राहिला. काही ठिकाणी मिरासदारांची आठवण झाली.

धमाल विनोदी लिहिले आहे. खूप दिवसात वाचताना खळखळून हसू यावं असं काही वाचायला मिळालं. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत!

मस्त लेखन! खूप दिवसांनी मनसोक्त हसलो!! बाकी, लहानपणी बसलेल्या डंखाची आठवण झाली. एकाच डंखानं हालत खराब झालेली.. या प्रकाराची कल्पनाच करू शकतो फक्त! ;-)

अरे वा! माझं लिखाण बरेच जणांना आवडतंय असं दिसतंय. बस मध्ये प्रवास सुरु असताना सहज कथा लिहायला घेतली आणि चांगली उतरली असे दिसतेय. खरंतर कथा सत्य घटनेवर आधारित आहे (पण कल्पनेची भरपूर भर घालून लिहिली आहे) आमच्या सेक्युरिटीला त्याचा आत्मविश्वास नडला होता. असो सर्वाना प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!