Welcome to misalpav.com
लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सुंदर छायाचित्रण, सखोल वर्णन आणी बरोबर तरूण पिढी तयार करता आहात हे प्रशंसनीय आहे. लेख आवडला हे वेगळे सांगणे नलगे.

खूपच भारी लिहिलंय. राजगड, तोरणा दोन्ही अजस्त्र किल्ले आहेत. राजगडावर तर जनता असते, सर्वसाधारणपणे लोक सुवेळा आणि बालेकिल्लाच पाहतात, संजीवनीकडे त्यामानाने कमी लोक जातात. ज्यांना महाराजांचं दुर्गशास्त्र बघायचं आहे त्यांनी संजीवनी पाहावी. अत्यंत अद्भुत रचना. त्या चिलखतात फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय. बाकी हा रेंज ट्रेक करणे सोपे काम नव्हे. मस्त एकदम.

सुंदर वर्णन आणि फोटो. कोलाज तर मस्तच. राजगड तोरणा एकत्र कधीच केले नाहीत. तुमचा लेख वाचून माहितगार माणूस बरोबर असल्याशिवाय जमणार नाही असे वाटतय.

लेख आवडला . आता एक पुरवणी येऊ द्या पुढील माहितीसाठी १. छायाचित्रे विविधरूपात कशी डकवायची २. टेक्स्ट टू स्पीच चा अनुभव ? चांगला वाईट ?

फार काही करावे लागत नाही. १. स्पीच टू टेक्स्ट- टेक्स्ट टू स्पीच तशा अनेक वेब्साईट आहेत, पण मी ह्या वेबसाईटचा वापर केला. ७०-७५ टक्के काम झाले , पण नंतर संकलन करताना चुकीच्या ठिकाणी पडलेली विराम चिन्हे, किवा काही ठिकाणी चुकीचे शब्द दुरुस्त करावे लागले. तरीही एकुण वेळ कमी लागला असे म्हणेन. तरीसुद्धा लिहिताना डोक्यात त्या आठवणी घोळवत लिहिल्यामुळे लेखाला जास्त जिवंतपणा येतो असे वाटते. बोलताना येणार्‍या विचारांचा वेग नीट जुळत नसल्याने ती क्वालिटी कमी होते. २. फोटो कोलाज- मोबाईलवर फोटो काढले होते. तिथेच लाईव्ह कोलाज नावाचे फोटो कोलाज अ‍ॅप डाउनलोडवले, त्यात पाहीजे त्या फोटोंचे डकवुन कोलाज करुन घेतले आणि ते सेव्ह केले. मग मूळ फोटोंऐवजी ते कोलाज केलेले फोटो गूगल फोटोज मध्ये पब्लिक अ‍ॅक्सेस असलेल्या अल्बम मध्ये अ‍ॅडवले. आणि त्या फोटोंची लिंक लेखात देत गेलो.

खूप सुंदर लिहीलं आहे. शाळेत असताना गड किल्ल्यावर खूप वेळा जाणं होत असे.आता शक्य होत नाही त्यामुळे अशी वर्णनं वाचली किखूप छान वाटतं.