आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडींच्या नोंदींसाठी हा धागा तयार करत आहे. विवीध आंतरराष्ट्रीय करार आणि त्यांचे परिणाम त्यातले राजकारण शह काटशह यांचे विवेचन आणि चर्चा येथे करता येतील. रस असल्यास जिज्ञासूंनी जागतिकीकरणाची कहाणी हे भाग जरूर वाचावेत.
वर्गीकरण
वाचने
64490
प्रतिक्रिया
174
मिसळपाव
प्रतिक्रिया
मनापासून धन्यवाद.
In reply to भारताने जगातला सर्वात मोठा कोक ड्रम बनविला by सर टोबी
🙏
हे कसं जाणून घ्यायचं ते सांगाल का? म्हणजे माझं मला तपासून घेता येईल.ह्या विषयावर मी इतकेच बोलेन
सहमत
In reply to ह्या विषयावर मी इतकेच बोलेन by sunil kachure
प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी करार (RCEP) लागू
L&T आणि Hanwha K२१-१०५ रणगाड्यांचे उत्पादन करणार आहेत
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर
- वेगाने वाढणारी बाजारपेठ अर्थव्यवस्था म्हणून दोन्ही देशांमधील पूरकता आणि पुरवठा साखळी बळकट करणे
- कृषी सारख्या विविध क्षेत्रांमध्ये आर्थिक सहकार्य
- व्यापार आणि गुंतवणुकीचे पर्याय अधिक विस्तारण्यासाठी प्रयत्न
- पायाभूत सुविधा, आरोग्य, फार्मास्युटिकल्स आणि पर्यटन यात वाढ
- फिलीपाईन्समध्ये भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना परत येण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मदत
उभय देशांमधील व्यवसाय, पर्यटन आणि विद्यार्थी देवाणघेवाण वाढवण्यासाठी, भारत आणि फिलीपिन्समध्ये सरलीकृत व्हिसा प्रणालीच्या आवश्यकतेवर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. -- क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी ऑस्ट्रेलियात असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी मेलबर्नमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. ऑस्ट्रेलियन पीएम स्कॉट मॉरिसन, ऑस्ट्रेलियन परराष्ट्र मंत्री मारिस पायने आणि जपानमधील त्यांचे दोन समकक्ष, योशिमासा हयाशी आणि यूएस, अँटोनी ब्लिंकन यांच्यासह, डॉ जयशंकर चौथ्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले. बैठकीची इतर माहिती मिळाली नाही पण काही काळात धोरण स्वरूपात यातले भाग उजेडात येतील अशी अपेक्षा आहे.बांगलादेश-भूतान-भारत-नेपाळ (BBIN) मोटर वाहन करार
खुपच छान
In reply to बांगलादेश-भूतान-भारत-नेपाळ (BBIN) मोटर वाहन करार by निनाद
भारताचे पंतप्रधान श्री
- पंतप्रधान मॉरिसन यांना ऑस्ट्रेलिया इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फोरमचा शुभारंभ केला.
- बेंगळुरूमध्ये नवीन महावाणिज्य दूतावास होणार आहे.
- नवीन ऑस्ट्रेलिया-भारत इनोव्हेशन नेटवर्क स्थापन केले जाते आहे.
- आर्थिक सहकार्य करार (CECA) वाटाघाटी चालू ठेवण्यासाठी दोन्ही देश प्रतिबद्ध
- पर्यटन सहकार्यावरील ऑस्ट्रेलिया भारत सामंजस्य कराराचे नूतनीकरण
- ऑस्ट्रेलिया-इंडिया स्ट्रॅटेजिक रिसर्च फंड (AISRF) चा विस्तार
- व्यापक ऊर्जा सहकार्याला समर्थन
- सायबर प्रशासन, सायबर सुरक्षा, क्षमता निर्माण, सायबर गुन्हे, डिजिटल अर्थव्यवस्था आणि गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावरील सहकार्य
- बेंगळुरूमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर क्रिटिकल आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजी पॉलिसी स्थापन केली जाईल
- भारताच्या गगनयान अंतराळ कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा
पंतप्रधान मॉरिसन यांनी नवीन मैत्री शिष्यवृत्ती कार्यक्रम, मैत्री अनुदान आणि फेलोशिप कार्यक्रम आणि ऑस्ट्रेलिया-भारत मैत्री सांस्कृतिक भागीदारी व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया-भारत संबंध केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या शिवाय प्रसार भारती, आणि SBS, ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रसारणावरील सहकार्य करार पुर्ण झाला आहे. यामुले आता भारतातील अधिकृत बातम्या ऑस्ट्रेलियामध्ये दाखवल्या जातील अशी अपेक्षा आहे. या पुर्वी येथे बातम्यांच्या नावाखाली NDTV या माध्यमाचा प्रोपोगंडा(?) चालवला जात असे. मुख्य म्हणजे भारतातील लोकांना ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतर करतांना शैक्षणिक पात्रता ओळख आता अजून सुलभ केली जाणार आहे. अधिकाधिक भारतीयांनी नोकरी साठी याचा लाभ घेतला पाहिजे असे वाटते. अधिक माहिती येथे पहा https://immi.homeaffairs.gov.au/visas/permanent-resident भारतीय कायमस्वरूपी व्हिसासाठी अर्ज करून आणि मंजूर झाल्यावर ऑस्ट्रेलियाचे कायमचे रहिवासी होऊ शकतात.नेपाळ भारत करार
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा तुर्कमेनिस्तान दौरा
- इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (INSTC) आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि ट्रान्झिट कॉरिडॉरवरील अश्गाबात कराराचे महत्त्व अधोरेखित.
- इराणमध्ये भारताने बांधलेल्या चाबहार बंदराचा उपयोग भारत आणि मध्य आशियामधील व्यापार सुधारण्यासाठी
- तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत (TAPI) पाइपलाइनच्या सुरक्षेशी संबंधित समस्या तसेच तांत्रिक आणि तज्ञ स्तरावरील बैठकांना वेग
- दोन्ही देशांनी आपत्ती व्यवस्थापनासारख्या सहकार्याची नवीन क्षेत्रे
- भारतीय कंपन्यांच्या तांत्रिक आणि तांत्रिक क्षमतांचा उपयोग तुर्कमेनिस्तानच्या पेट्रोकेमिकल क्षेत्राच्या पुढील विकासासाठी
अफगाणिस्तान, अंमली पदार्थांची तस्करी या मुद्द्यांवरही चर्चा या दर्म्यान झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी एकुणच भारताबाहेर असणारी प्रत्येक भेट भारतासाठी सत्कारणी लावल्याचे दिसून येते आहे. भारताने एकुणच यादेशा सोबत आपले संबंध चांगलेच विकसित करण्याचे प्रयत्न चालवले आहेत असे दिसते. तसेच तुर्कमेनिस्तानचे परराष्ट्र मंत्री २०१७ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते, तर २०१६ मध्ये मोदी तुर्कमेनिस्तानला गेले होते. तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत (TAPI) पाइपलाइन झाली तर भारताला अव्याहत तेल पुरवठा होईल. यासाठी सध्या अफगाणिस्तान-पाकिस्तान येथील अशांतता हा प्रमुख अडसर आहे.ब्रिटन आणि भारत संरक्षण सहकार्य करार
क्वाड
- हवामान बदल देखरेख
- आपत्ती प्रतिसाद आणि तयारी
- महासागर आणि सागरी संसाधनांचा शाश्वत वापर
- इतर
असे चार मुद्दे आहेत. यातले इतर म्हणजे काय हे स्पष्ट नाही आणि ते बहुदा लष्करी सहकार्य असावे असा माझा कयास आहे. पुढील बैठकीसाठी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया यजमान असणार आहे.महत्त्वाच्या पण उपेक्षित घडामोडी
पॅसिफिक आयलँड फोरम
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयात करणार
पंतप्रधानांनी मागच्या वर्षी
भारत आणि दक्षिण अमेरिका वाढते सहकार्य!
निजरमध्ये बंड
एकामागून एक दणकट करार!
मग शेअर मार्केट झोपूनच का आहे
In reply to एकामागून एक दणकट करार! by निनाद
नक्कीच!
In reply to मग शेअर मार्केट झोपूनच का आहे by अमरेंद्र बाहुबली
ऑप सिंदूर
In reply to नक्कीच! by निनाद
ऑप सिंदूर- आपण पाकिस्तानला सांगून त्यांच्या विमान धावपट्टीवर हल्ले केले, (जी लगेच ४ दिवसात तयार झाली) - ड्रोन हल्ल्याना आपण रॉकेट सोडून उत्तर देत होतो. - एकही विमान पडले नाही असे देशाला खोटे सांगण्यात आले. - ट्रंपने सिझफायरच करण्याची आज्ञा सोडली, आपण केले पण तिकडून पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार सुरूच होता, आपली अवस्था केविलवाणी होती. असो.तरी नशीब आपण पहिल्या
In reply to ऑप सिंदूर by अमरेंद्र बाहुबली
कुठे तुम्ही भुजबळांच्या
In reply to नक्कीच! by निनाद
https://www.misalpav.com
In reply to मग शेअर मार्केट झोपूनच का आहे by अमरेंद्र बाहुबली
भारत इटली ऐतिहासिक करार
भारत आणि इटली यांच्यातील ऐतिहासिक कराराची फारशी चर्चा झाली आही.
दोन्ही देशांनी आपल्या मैत्रीला 'विशेष धोरणात्मक भागीदारी' या सर्वोच्च पातळीवर नेले असून, लष्करी साहित्य उत्पादनासाठी एक संरक्षण औद्योगिक आराखडा जाहीर केला आहे. हा करार केवळ दोन देशांमधील राजकीय देवाणघेवाण नसून, याचे भारत, इटली आणि संपूर्ण जगाच्या अर्थकारणावर आणि सुरक्षेवर मोठे दूरगामी परिणाम होणार आहेत असे वाटते.
या ऐतिहासिक करारामुळे भारतावर अनेक परिणाम होतील. या नव्या आराखड्यामुळे भारत केवळ परदेशी लष्करी साहित्याचा खरेदीदार न राहता इटलीसोबत मिळून अत्याधुनिक शस्त्रे, हेलिकॉप्टर्स आणि नौदलाची जहाजे भारतातच तयार करणार आहे. यामुळे मेक इन इंडिया अजून गती मिळेल.
भारताची वाढती डिजिटल ताकद आणि ईटलीचे उत्पादन कौशल्य एकत्र येत आहेत. इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून अत्याधुनिक चिप्स आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी लागणारी दुर्मिळ खनिजे मिळवण्याचे प्रगत तंत्रज्ञान इटली भारताला देणार आहे.
या कराराचा इटलीवर परिणाम होणार आहे. इटालीने काही काळापूर्वी चीनच्या वादग्रस्त बी आर आय मध्यून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशासोबत भागीदारी करून इटलीला चीनच्या आर्थिक प्रभावाला टक्कर देणारा एक सुरक्षित मार्ग मिळाला आहे.
इटालीने भारतासोबतचा द्विपक्षीय व्यापार येत्या काळात अनेक अब्ज युरों पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारताची अफाट बाजारपेठ आणि इथले कुशल तरुण अभियंते इटलीच्या उद्योगांना वेग देतील असे वाटते आहे. म्हणजे भारतीय लोकांना ईतली मध्ये काम मिळण्याचीही शक्यता आहे.
मिडल ईस्ट भागातील वाढत्या तणावाच्या काळात आपल्या ऊर्जा वाहिन्या आणि सागरी व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी इटलीला भारतीय नौदलाचे मोठे सहकार्य मिळणार आहे. यामुळे चाचेगीरी वर प्रतिबंध होईल असे वाटते.
याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि राजकारणावर परिणाम होतील का? तर नक्की होतील.
हा करार आशिया, मध्य पूर्व आणि युरोप खंडाला थेट जोडणाऱ्या महाकाय आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी मेन काम करेल. आधुनिक रेल्वे आणि सागरी मार्गांचे हे जाळे जागतिक व्यापाराचा वेग वाढवेल आणि वाहतुकीचा खर्च कमी करेल. आणि हा खरा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी गेम ठरेल!
आशिया प्रशांत क्षेत्र आणि भूमध्य समुद्र आता परस्परांशी जोडले गेले आहेत. हा करार जागतिक व्यापारावरील चीनची एकाधिकारशाही मोडून काढण्यास आणि आंतरराष्ट्रीय बाजारात समतोल साधण्यास मदत करेल असे ही वाट्स्ते.
दहशतवाद, सायबर हल्ले आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे यांसारख्या मोठ्या संकटांना तोंड देण्यासाठी जगातील दोन प्रमुख लोकशाहींनी एकत्र येणे, हे आंतरराष्ट्रीय शांततेसाठी आणि स्थिरतेसाठी एक उत्तम पाऊल आहे.
भारत आणि इटली दरम्यान झालेला हा करार केवळ कागदावरच्या स्वाक्षऱ्यांपुरता मर्यादित नाही. हा आशिया आणि युरोपला जोडणारा, भारताला संरक्षणात आत्मनिर्भर करणारा आणि जागतिक व्यापाराला नवा, सुरक्षित मार्ग देणारा एक मैलाचा दगड ठरणार आहे. दोन्ही देशांची ही नवी मैत्री येणाऱ्या काळात जागतिक राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद ठेवते.
राजकारण बाजूला ठेऊअन याकडे पाहतांना तुम्हाला काय वाटते?
अजून एक मजबूत भला मोठा प्रकल्प करार - पण पुर्णपणे दुर्लक्षित!
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेलबर्नमध्ये बैठक झाली होती. या दोन्ही देशांनी ऊर्जा, संरक्षण, दुर्मिळ खनिजे आणि व्यापाराशी संबंधित मोठे करार केले आहेत त्याचा जरा गोषवारा घेऊ या.
युरेनियम पुरवठा करार : दोन्ही देशांनी युरेनियम पुरवठ्याबाबतचा महत्त्वाचा प्रशासकीय करार पूर्ण केला. यामुळे भारताला ऊर्जा निर्मितीसाठी ऑस्ट्रेलियाकडून युरेनियम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताला वाढत्या लोकसंख्येसाठी आणि उद्योगांसाठी स्वच्छ ऊर्जेची गरज आहे. ऑस्ट्रेलियाकडे जगातील सर्वात मोठा युरेनियम साठा आहे. भारताला अणू ऊर्जेसाठी खात्रीशीर इंधन मिळेल. यामुळे कोळशावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषण नियंत्रण सोपे होईल. ऑस्ट्रेलिया अणूर्जेच्या विरोधात स्व्त: ही उर्जा वापरत नाही. पण तरीही ऑस्ट्रेलियाच्या खाण क्षेत्राला मोठी बाजारपेठ मिळेल. युरेनियम निर्यातीतून ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था मजबूत होईल.
जिओसायन्स ऑस्ट्रेलिया आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांच्यात नवा करार झाला. यामुळे दुर्मिळ खनिजांच्या संशोधनाला गती मिळेल.
अजून एक मजबूत भला मोठा प्रकल्प - हा तर पुर्णपणे दुर्लक्षित राहिला आहे!
वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील पर्डामनच्या युरिया प्रकल्पाला पुन्हा विशेष दर्जा देण्यात आला आहे. याची फारशी चर्चा झाली नाही पण याचे महत्त्व आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील पर्डामन युरीया प्रकल्पाला 'प्रमुख प्रकल्प दर्जा' दिल्याने भारत आणि ऑस्ट्रेलियामधील खत पुरवठा आणि व्यापार + शेती अजून मजबूत होईल. वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील कारथा Karratha येथे पर्डामनचा मोठा युरीया प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाद्वारे नैसर्गिक वायूचे युरीया खतात रूपांतर केले जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया मिळून या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या युरीयाची गरज पूर्ण करतील. पर्डामन प्रोजेक्टचे चेअरमन विकास रंभाळ (भारतीय वंशाचे उद्योगपती) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय तंत्रज्ञानाचा या प्रकल्पात मोठा वाटा आहे. भारत या प्रकल्पासाठी कुशल कामगार, तांत्रिक मदत म्हणजे भारत या प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारी जागतिक दर्जाची यंत्रसामग्री आणि उत्पादन तंत्रज्ञान पुरवत आहे. भारत सरकारने पर्डामन प्रकल्पासोबत दीर्घकालीन व्यावसायिक करार केले आहेत. या करारानुसार, ऑस्ट्रेलियातील स्थानिक गरज भागवून जो अतिरिक्त युरीया उरेल, तो भारत घेणार आहे. यामुळे या ऑस्ट्रेलियन प्रकल्पाला सुरुवातीपासूनच भारत हा हक्काचा ग्राहक आहे.
प्रकल्पाचे जे मोठे कारखाने आणि मॉड्यूल्स आहेत, त्यांची मुख्य रचना आणि फॅब्रिकेशन थेट भारतात केले जाते आहे. भारतातून हे तयार झालेले अजस्त्र मॉड्यूल्स जहाजांद्वारे वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील कराथा येथील प्रकल्पाच्या ठिकाणी पाठवले जातात आणि तिथे त्यांची जोडणी केली जाते.
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या कुशल कामगारांची मोठी टंचाई आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कुशल मनुष्यबळ ही भारताकडून पुरवले जात आहे. भारताच्या 'राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ' NSDC International ने पर्डामन समूहासोबत थेट भागीदारी केली आहे. या अंतर्गत, भारतातील कुशल तरुणांना प्रशिक्षित करून विशेष व्हिसाद्वारे - Special Worker Visas - ऑस्ट्रेलियातील या प्रकल्पावर काम करण्यासाठी पाठवले जाते आहे. भारतीय तरुणांनी याचा जरूर लाभ घेतला पहिजे.
म्हणजे पहा भारत प्रगत तंत्र ऑस्ट्रेलिया सारख्या देशाला निर्यात करतो, त्याचा वापर करून एक प्रकल्प बनवायला मनुष्यबळ पुरवतो - म्हणजे भारतीय लोकांना नोकऱ्या मिळतात, त्यांना आंतरराष्ट्रिय अनुभव मिळतो, त्याच प्रकल्पातून येणारे उत्पादन भारतीय शेतकऱ्याला शेतीच्या उत्पादनात मदत करते.
एका करारामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांना खत आणि ऊर्जा पुरवठ्यात मदत करतील. म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. पण दुर्दैवाने याकडे कुणाचे लक्ष गेले नाही.
मोदी सरकारने एका दगडात किती म्हणजे किती पक्षी साधले आहेत हे पाहून अचंबा वाटतो!!
पर्डामन प्रकल्पासाठी प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाचा Employer Sponsored Visa (उदा. TSS 482 किंवा SESR 494 व्हिसा) वापरला जातो.
हा तात्पुरत्या स्वरूपाचा (Temporary Skill Shortage) व्हिसा असतो, ज्याद्वारे कामगारांना २ ते ४ वर्षांपर्यंत ऑस्ट्रेलियात राहून काम करता येते.
कायमस्वरूपी नागरिकत्व (PR): काही वर्षांच्या यशस्वी कामानंतर यातील पात्र कामगारांना ऑस्ट्रेलियाच्या कायमस्वरूपी नागरिकत्वासाठी (Permanent Residency) अर्ज करण्याचा मार्ग मोकळा होतो.
सिलेक्षन कसे होते?
भारताचे 'राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ' (NSDC International) पर्डामन कंपनीच्या गरजेनुसार भारतातील पात्र इंजिनिअर्स आणि तंत्रज्ञांची निवड करते. NSDC International च्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निवड प्रक्रिया होते.
nsdcinternational.com किंवा skillindia.gov.in
ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी उमेदवारांकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे:
Mechanical, Electrical, Instrumentation, Chemical Engineering, Welding, Pipe Fitting, आणि Heavy Machinery Operations या क्षेत्रातील कुशल लोकांची गरज असते. तुमच्याकडे किमान २-३ वर्षांचा अनुभव आणि आयटीआय (ITI), डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे.
आणि किमान २ ते ३ वर्षांचा कामाचा अनुभव.
इंग्रजी भाषेची परीक्षा: अर्ज करण्यापूर्वी किंवा प्रक्रियेदरम्यान IELTS किंवा PTE परीक्षा देण्याची तयारी ठेवा, कारण ऑस्ट्रेलियन व्हिसासाठी ही अनिवार्य अट आहे.
वरील जॉब विषयक आणि इतर माहिती मी पडताळून घेतलेली नाही. आपापल्या जबाबदारीवर माहिती पडताळून काढावी!
उत्तम माहिती मिळतेय. लिहित…
In reply to अजून एक मजबूत भला मोठा प्रकल्प करार - पण पुर्णपणे दुर्लक्षित! by निनाद
उत्तम माहिती मिळतेय. लिहित रहा.
ऑस्ट्रेलिया अणूर्जेच्या विरोधात स्व्त: ही उर्जा वापरत नाही.
In reply to अजून एक मजबूत भला मोठा प्रकल्प करार - पण पुर्णपणे दुर्लक्षित! by निनाद
सर असे का असावे ? ऑस्ट्रेलिया स्वतःच का आण्विक ऊर्जा वापरत नसेल ? अणुऊर्जा खरेच स्वच्छ असते का ? स्पिलोवर, कॉन्टमेनेशन इत्यादी गोष्टींचा रिस्क फॅक्टर किती असेल ? इतके महागडे अणुऊर्जा प्रकल्प लावण्यापेक्षा नॉन फॉसिल renewable energy पक्षी सोलर, विंड, बायोमास इत्यादी हार्नेस केल्यास काय नुकसान असेल ?
इंडिया टुडेच्या ह्या लेखानुसार/ भारताने आपली सौर ऊर्जा उत्पादन क्षमता राक्षसी वाढवली आहे पण त्याचे वितरण अन् विपणन तितकी गती मॅनेज करू शकत नसल्यामुळे जगातील सगळ्यात समृद्ध सौर ऊर्जा पोटेन्शियल असणाऱ्या पैकी आपल्या देशात ती ऊर्जा अक्षरशः वेस्ट होते आहे जनरेट होऊन सुद्धा. आता न्युक्लिअर पॉवर सारख्या खर्चिक प्रकल्पांचा विचार करता फक्त वीज निर्मिती हा विषय नाही तर स्पेंट फ्युएल, न्युक्लिअर वेस्ट हा सुद्धा एक मोठाच विषय असतो. परत त्यात आंतरराष्ट्रीय वॉच डॉग त्यांचे compliance इत्यादी आले, त्यापेक्षा जर सरकारने सोलर मधे होणारे हे ग्रीड लॉस, दुपारी जनरेट होणारी सरप्लस वीज संध्याकाळ आणि रात्रीसाठी स्टोअर करण्यासाठी युद्धपातळीवर काम ग्रीड एफिसिएन्सी वाढवणे इतके सगळे एकत्र केले तरी न्युक्लिअर पेक्षा कमी खर्चात लीन अँड चीप एनर्जीची सोय होऊ शकेल असे वाटते.
डेटा सेन्टर्स च्या…
In reply to ऑस्ट्रेलिया अणूर्जेच्या विरोधात स्व्त: ही उर्जा वापरत नाही. by वृषभ खोंडे
डेटा सेन्टर्स च्या बांधकामाच्या संदर्भांत माझे काही काम सुरु असल्याने मी तुम्हाला प्राथमिक ठोस माहिती देऊ शकते. आण्विक ऊर्जा हि सुरक्षित आणि अत्यंत क्लीन आहे. त्याला असलेला विरोध हा प्रामुख्याने राजकीय स्वरूपाचा आहे. पण ते सोडून द्या.
ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन्ही देशांत काही मूलभूत फरक आहेत. ऑस्ट्रेलिया मध्ये शेल गॅस चे प्रचंड साठे आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया प्रचंड प्रमाणात गॅस निर्मिती करू शकतो. त्यामुळे आण्विक ऊर्जा प्रकल्पांची गरज हल्लीपर्यंत कमी होती. त्यामुळे राजकीय नेत्यांना नाटक करून त्यांच्यावर बंदी घालणे शक्य होते.
आता चित्र पूर्णतः पालटले आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये $१५० बिलियन डॉलर्स ची नवीन डेटा सेंटर्स येणार आहेत. ह्यासाठी प्रचंड ऊर्जा लागणार आहे. ऑस्ट्रेलियन कंपन्यांनी त्यामुळे आण्विक प्रकल्पांत लक्ष घालायला सुरुवात केली आहे. फ्रेंच कंपन्यांचा ह्यांत मोठा सहभाग असणार आहे. ह्यासाठी हालचाली सुरु असल्या तरी ऑस्ट्रेलिया मधील विविध राजकीय पक्षांना ते नको आहे. पण हा राजकीय विरोध कोलमडेल अशी अपेक्षा कंपनी अधिकारी खाजगीत तरी व्यक्त करत आहेत. २०५० पर्यंत अनेक आण्विक प्रकल्प निर्माण करावेत असे प्लॅन्स राजकीय पक्षांकडून आता येत आहेत.
ह्या शिवाय फ्रांस ने आण्विक उर्जेवर जो भर दिला होता त्यामुळे युक्रेन युद्धानंतर फ्रांस ला फायदा झाला. ते पाहून इतर अनेक देश आण्विक ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहेत. ह्या सर्वांमुळे आता आण्विक प्रकल्प निर्माण करणे, सुरक्षित पणे चालू ठेवणे आणि नंतर स्केल करणे सोपे होणार आहे.
येत्या २४ महिन्यांत तुम्हाला गुगल, मायक्रोसॉफ्ट, ओपन येइ इत्यादी कंपन्या येन केन प्रकारे आण्विक प्रकल्पना विकत घेतील असे दिसून येईल. गुगल आणि MS ने देशांतील अनेक बंद पडलेले आण्विक प्रकल्प सुरु करण्यास सुरुवात केली आहे. MSFT ने ग्रीन माईल चे unit १ सुरु केले आहे तर गुगल ने Duane Arnold Energy Center आयोवा सुरु केले आहे. ह्याशिवाय असंख्य इतर आण्विक संबंधित प्रकल्पनात त्यानी गुंतवणूक केली आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये युरेनियम चे मोठे साठे आहेत. रशिया च्या तुलनेत ऑस्ट्रेलिया राजकीय दृष्टया जास्त स्टेबल आहे आणि आमच्या जवळ आहेत. फ्रांस, अमेरिका ह्या इतर दोन महत्वाच्या आण्विक शक्तींशी त्याचे चांगले संबंध आहेत त्यामुळे आण्विक ऊर्जेसाठी भारतासाठी महत्वाचा आहे.
आण्विक प्रकल्पांची सगळ्यांत चांगली गोष्ट म्हणजे एकदा प्रकल्प सुरु केला हि ह्याला स्केल करणे सोपे आहे. म्हणजे तुम्हाला ऊर्जा दुप्पट करायची असेल तर तुम्ही सहजपणे करू शकता. तुम्हाला सौर ऊर्जा दुप्पट करायची असेल तर दुप्पट जागा पाहिजे. दुप्पट तारा पाहिजेत, दुप्पट सुरक्षा पाहिजे. आण्विक प्रकल्पनात तुम्ही आधीच काही जागा राखीव ठेवली तर नंतर आणखीन एक युनिट तुम्ही जोडू शकता. ह्याला भरपूर खर्च लागतो पण अनेक गोष्टी शेर केल्याने सौर किंवा पवन ऊर्जेपेक्षा स्केलिंग सोपे होते. SMR Small Modular Reactor हि ह्या क्षेत्रांतील गेम चेंजिग आयडिया आहे. ह्यांत तुम्ही रिऍक्टर अगदी छोट्या स्वरूपांत बनवता. एक SMR साधारण ३००MW ऊर्जा निर्माण करू शकतो. अमेरिकन नेव्ही ह्यांत आघाडीवर आहे आणि येत्या काही वर्षांत SMR तुम्हाला व्यावसायिक तत्वावर चालवलेले आढळून येतील.
AI मुळे दरडोई ऊर्जा वापर प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. प्रचंड प्रमाणत म्हणजे येत्या १० वर्षांत साधारण २x अमेरिकेत, भारतांत लोक आधीच गरीब असल्याने राहणीमानाचा स्तर उंचावला कि प्रमाण आणखीन वाढेल. म्हणजे साधारण ५x. भारताला आण्विक प्रकल्पांत all in जाण्याशिवाय पर्याय नाही.
टीप : गुगल आणि काही भारतीय कंपन्यांनी मिळून भारतीय पॉवर ग्रीड खूप प्रमाणात अपग्रेड केली आहे. आता तुम्ही छत्तीसगढ मध्ये ऊर्जा निर्मिती करून त्याला आज गुजरात मध्ये आणि उद्या तामिळनाडू मध्ये विकू शकता. दिवसा मुबंईत आणि रात्री मद्रास मध्ये विकू शकता.
सौर ऊर्जा : मोठया स्केल वर हे निव्वळ स्कॅम आहे. पण त्यावर आणखीन कधी.
सरकार अणुऊर्जेच्या विरोधात
In reply to ऑस्ट्रेलिया अणूर्जेच्या विरोधात स्व्त: ही उर्जा वापरत नाही. by वृषभ खोंडे
ऑस्ट्रेलियात अणुऊर्जेचा मुद्दा नेहमीच अत्यंत संवेदनशील राहिला आहे लेबर पक्ष विरुद्ध लिबरल-नॅशनल कोलिशन असे आहे. सध्याचे अँथनी अल्बानीज सरकार अणुऊर्जेच्या विरोधात असून सौर वगैरे ऊर्जेवर भर देत आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षातील पीटर डटन यांनी ऑस्ट्रेलियात लहान अणुभट्ट्या उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
'Not In My Backyard' NIMBY प्रभाव अणुभट्ट्या कुठे उभारायच्या? स्थानिक जनता आणि पर्यावरणवादी गट याला जोरदार विरोध करत आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांसाठी हे निवडणूक जिंकण्या-हरण्याचे मोठे साधन बनले आहे. म्हणून येथे अणूर्जा नाही...
हे घडवणारे कलाकार कोण होते?
हे होते धर्मेंद्र प्रधान!
असो!
नक्की कुणाचा यात स्वार्थ दडलेला होता की त्यांचे जाणे आवश्यक झाले होते, हे कधी कळेल की नाही हे माहित नाही...
श्री. विवेक पटाईत साहेबांच्या दाव्यावर काही विवेचन
काही ठळक बाबी -
१. सरकारने वाढवलेल्या सीट्स - (सरकारी) ३२,००० + ३४,००० (खासगी) = (एकूण) ६६,००० जागा. आधीच्या जागा + महाविद्यालये धरून एकूण १.३६ लाख सीट, ८२३ कॉलेजेस मार्फत.
२. मॅनेजमेंट कोटा शुल्क - (२०१४) - सरासरी ६.५ लाख रुपये प्रतिवर्ष. (२०२४) सरासरी २०.२५ लाख प्रतिवर्ष
३. प्रायव्हेट कॉलेज मधील नॉर्मल शुल्क - (२०१४) - सरासरी २.५ लाख प्रतिवर्ष, (२०२४)- सरासरी २० लाख रुपये प्रतिवर्ष !!!!!!!
आता आपण पाहूया बाहेर देशात एम.बी.बी.एस. करायला जाणारी मुले, २०२४ मधे (आपल्या दाव्यानुसार भरपूर सीट वाढल्यानंतर) ४०,००० मुले ! कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स (सी.आय.एस./ भूतपूर्व सोविएत रशियन राज्य) + चायना (?) + बांगलादेश (चक्क बांगलादेश मध्ये एमबीबीएस करायला) जात आहेत !
म्हणजे सरकारने सरासरी ६६,००० जागा वाढवून सुद्धा आणि प्रवेश परीक्षेतील हवशे गवशे नवशे सोडता ४०,००० पात्र उमेदवार दरवर्षी भारताच्या बाहेर एमबीबीएस करायला जातात ह्यावरून काय लक्षात येते ?
१. सरकारने सीट पुरेशा वाढविलेल्या नाहीत
२. भारतातील प्रायव्हेट कॉलेजच्या फी भरण्यापेक्षा परदेशात राहून एमबीबीएस करणे कमी खर्चिक म्हणायला हवे, इतके की पोरांना बांगलादेशला....... !
३. सीट वाढवल्या चांगलेच केले पण शुल्क मर्यादेचे काय ? ती कधी लागू होणार ? ह्यात सगळे राजकीय गणित मिसळलेले आहे, बहुसंख्य खासगी वैद्यकीय महाविद्यालये ही पुढाऱ्यांची आहेत ! आता फक्त एक उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील एखाद शिक्षणमहर्षी सत्तेत पण येणार अन् सरकारी शुल्क निर्धारण समितीच्या निर्णयानुसार फी पण कमी करणार ? असे झाले असल्यास कृपया निदर्शनास आणून द्यावे पण सहसा असे होत नसते. ह्यांची उत्तरे शोधल्यास खूप उत्तरे सापडतील ! आणि त्यासाठी मी शिक्षण महर्षी राजकारणी लोकांना दोष द्यायचा नाहीये.
सरकार/ तंत्र/ प्रशासन राजकीय सोयीने चालते इतपत ठीक आहे, पण किती ? किमान "बघा दहा वर्षात सीट दुप्पट" केल्याचे दावे फसवे आहेत इतके तरी मान्य करावे !
कारण सीट परवडणे हा पण एक मुद्दा आहेच. नुसत्या सीट वाढवून काहीच होत नाही त्यानुसार त्यांची उपलब्धता आणि वापर पण जनताभिमुख करावा लागतो. आणि ह्याचे नुकसान कोणाला ? तुम्हाला आम्हाला
कोट्यवधी लावून एमबीबीएस झालेली पोरे गुंतवलेला पैसा काढणार नाहीत ? का त्यांना स्वतःची इस्पितळे बांधण्याची इच्छा नसेल ? मग डायग्नोस्टिक सेंटर्स सोबत सेटिंग करून कट प्रॅक्टिस बोकाळली नाही तर नवल नाही ! (अगदी काल परवाच भाजपचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा ह्यांनी हाच विषय त्यांच्या सदनातील भाषणात लावून धरला होताच न ?), पैसा कमवायला अवैध गर्भपात केंद्र, स्त्री भ्रूण हत्या, एथिकल प्रश्न असणारी surrogacy सेंटर्स इत्यादी पण बोकाळणार न ?