हुश्श.. जिंकलो एकदाचे.! सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले म्हणायचं. जे आजवर विश्व क्रिकेट मध्ये कोणत्याच संघाला जमलेलं नव्हतं.
तश्या अनेक गोष्टी आहेत ज्या भारतीय क्रिकेट आणि वर्ल्ड क्रिकेट मधे पहिल्यांदाच घडत आहेत. पहिली म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे टी-20 वर्ल्डकप defend करणारा भारत पहिला संघ बनला. दुसरं, टी–20 WC होस्ट करणारी टीम पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकली. तीन, २०२३ ची ओडीआय WC फायनल तसेच साऊथ आफ्रिकेसोबत हरल्यामुळे पानौती ठरवल्या गेलेल्या अहमदाबादच्या मोटेरा म्हणजेच नरेंद्र मोदी मैदानावर आपण पहिल्यांदा महत्वाचा सामना जिंकलो. टी-20 विश्वचषक ट्रॉफी आपण एकूण तिसऱ्यांदा जिंकली, जे आजपर्यंत कोणत्याच संघाला जमलेल नाही (वेस्ट इंडीज आणि इंग्लंडच्या संघाने प्रत्येकी २ वेळा हा चषक जिंकला आहे).
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट खिताबाचा मानकरी ठरलेल्या संजू सॅमसनने शेवटच्या तीन सामन्यांत लागोपाठ तुफानी हाफ सेंच्युरीज ठोकून चमकदार कामगिरी केली त्याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यात तो निम्मा वर्ल्डकप खेळलाच नाहीये. विश्वचषकाआधी त्याच्या १५ जणांच्या Squad मधील जागेवर सुद्धा काहींनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते, कारण विश्वचषकाआधी खेळलेल्या ११ सामन्यांत त्याच्या नावावर फक्त १ अर्धशतक होते. खुद्द कप्तान सूर्यकुमार यादवने साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यागोदर पत्रकार परिषदेत संघात एकापेक्षा एक तगडे फलंदाज असताना सॅमसनसाठी स्पेस नाही करू शकत अशी हसत हसत प्रतिक्रिया दिली होती. एवढ सगळ असताना क्वार्टर फायनल समजल्या गेलेल्या सामन्यात दडपणाखाली ९७ नॉट आऊट , सेमी फायनल आणि फायनल मधे ८९ धावा करणं सोपं नव्हतं. त्यासाठी कठोर संघर्ष आणि परिश्रम आलेच.
आता सर्वच क्रेडिट सॅमसनला देऊन चालणार नाही, कारण २०२४ प्रमाणेच हा विजय सुद्धा सांघिक विजय होता. बुमराह, अर्शदीप सिंह, ईशान किशन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल सारखे खेळाडू मोक्याच्या क्षणी वारंवार चमकले. तसेच सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती यांची भक्कम साथ यामुळे हा विश्वकप विजय सुकर झाला.
जसप्रीत बुमराह आता भारतातीलच नव्हे तर जागतिक क्रिकेट मधील सर्वात घातक गोलंदाज बनला आहे यात शंकाच नाही. आणि गेल्या काही वर्षात त्याने हे वारंवार सिद्ध केलय. पूर्वी तुमच्या संघात जर वकार युनिस, वसिम अक्रम,ग्लेन मॅग्राथ, शेन वॉर्न, ॲम्ब्रोस, डेल स्टेन सारखे गोलंदाज असतील तर समोरच्या संघातील फलंदाज दबकून असायचे. जसप्रीत बुमराहचा सुद्धा तोच दबदबा निर्माण होताना दिसतोय. त्याच्या ओव्हर्स विकेट न गमावता कशा खेळून काढायच्या हेच एक लक्ष फलंदाजांच्या डोळ्यांसमोर असते. मोक्याच्या क्षणी अचूक यॉर्कर किंवा स्लोअर बॉल टाकून महत्वाची विकेट घेत सामना फिरवण्याचे त्याचे कसब फारच थोड्या भारतीय गोलंदाजांकडे होते. या विश्वकप स्पर्धेत इतर गोलंदाजांचा avergare इकॉनॉमी रेट 8.7 runs/over होता तर एकट्या बुमराहचा तो 6.21 इतका होता. यावरून भारताच्या विश्वविजयातील बुमराहच्या योगदानाचे महत्व लक्षात आले असेल.
बुमराह व सॅमसन शिवाय अक्षर पटेलची middle overs मधील tight गोलंदाजी, हार्दिक पंड्या–तिलक वर्माची महत्वाच्या क्षणी आक्रमक फलंदाजी, ईशान किशनची सलामीला येऊन धडाकेबाज फलंदाजी (फायनल आधी त्याच्या बहिणीचे एका अपघातात निधन झाले तरीही तो दुःख बाजूला सारून फायनल खेळला आणि अर्धशतक देखील ठोकले.) सूर्यकुमार यादवची USA विरुद्धच्या सामन्यातील फलंदाजी, मधल्या षटकांतील उपयुक्त खेळ्या (cameo) आणि त्याचं कोच गौतम गंभीर सोबतचं coordination आणि कॅप्टन्सी यांचा या विजयात मोलाचा वाटा आहे.
या सगळ्यांत एका खेळाडूला क्रेडिट द्यायचं आपण नेहमी विसरतो तो म्हणजे शिवम दुबे. शिवम दुबेने संघाला गरज असताना clutch innings खेळत जवळजवळ प्रत्येक सामन्यात संघाचा टोटल स्कोअर भक्कम करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याने या स्पर्धेत 39.06 च्या average व 169.06 च्या स्ट्राईक रेटने 235 धावा बनवल्या आहेत. 2024 च्या विश्वचषक विजयात देखील त्याचे योगदान मोलाचे राहिले होते.
बाकी कोच झाल्यापासून सतत चर्चेत असलेला व अनेकदा क्रिकेट फॅन्स व समीक्षकांच्या टीकेला समोरा जावं लागलेल्या गौतम गंभीरला सुद्धा तितकेच श्रेय द्यावे लागेल. भक्कम संघबांधणी, धाडसी निर्णय, खेळाडूंना सततचे प्रोत्साहन, संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरून सुद्धा अभिषेक शर्मा सारख्या खेळाडूंना बॅक करणे यामुळे गंभीरची भूमिका सुद्धा महत्वाची ठरते. त्याच्याबद्दल एक stat चर्चेत येतोय ते म्हणजे त्याने खेळलेल्या, mentor किंवा कोच असलेल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या स्पर्धेत त्याचा संघ विजयी झालाय. बघा ना.. २००७, २०११ आणि २०२६ चे विश्वचषक, २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप, २०१२ आणि २०१४ मध्ये तो कर्णधार असताना कोलकताने जिंकलेल्या आयपीएल ट्रॉफीज, तसेच २०२१ मध्ये कोलकताने जेव्हा तिसऱ्यांदा आयपीएल जिंकली तेव्हा तो कोलकाताचा mentor होता. आहे की नाय इंटरेस्टिंग.!
टी-20 विश्वचषक तिसऱ्यांदा खिशात घातल्यानंतर भारतीय संघ आता पुढील वर्षी आफ्रिकेत होणारा ODI विश्वचषक सुद्धा तिसऱ्यांदा जिंकण्यासाठी उत्सुक असेल. त्याबद्दल पुढील लेखात चर्चा करुयात. तोपर्यंत माझा हा लेख कसा वाटला त्याबद्दल नक्की कळवा. बाय.. बाय. .!
Comments
आहा
आपणच अरेंज करायचे, आपणच
चेंडूफळीची हा खाजगी आणि
ज्यांना क्रिकेट आवडत नाही, ते
खरं म्हणजे क्रिकेट हा इतकाही
ते आहे पण धागे निघालेत तर
ते आहेच, पण हा बीसीसीआय चा
भारत देशाचा अधिकृत क्रिकेट
पूर्वीच्या काळी मनोरंजनाची
पूर्वीच्या काळी मनोरंजनाची
भारत देशाचा अधिकृत क्रिकेट
कसं असतं की ज्यांना क्रिकेट
कसं असतं की ज्यांना क्रिकेट
तीच लोकं क्रिकेटसंबंधी
तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात.कारण आपल्याला क्रिकेट आवडते म्हणून, इतरानाही आवडावेच असा मंदहट्ट क्रिकेट पाहणाऱ्यांचा असतो, मग ते प्रत्येक ठिकाणी व्हॉट्सअप असो, की समोरासमोर चर्चा प्रत्येक ठिकाणी संबंध नसताना क्रिकेटचा विषय काढून पिडतात, मोबाईल मधे लाईव स्कोर दिसत असतो तरी स्कोर विचारुन त्रास देतात, बीसीसीआय चा संघ जिंकला की रस्ते अडवून दारू पिऊन धिंगणा घालतात! अश्याना चाप बसवा ह्यासाठीच कळफलक बडवावे लागते, त्या निमित्ताने क्रिकेटविकृतीबद्दल बोलणेही होते.मी काय म्हणतो धाग्याच्या
क्रिकेटाचा धागा आहे म्हणूनच
मी म्हटलं ना की क्रिकेट धागा
मी काय म्हणतो धाग्याच्या
मी काय म्हणतो धाग्याच्या
ते समजत असतं तर आत्याबाईला
कसं असतं की ज्यांना क्रिकेट
क्रिकेट खूप जास्त झालंय हे
बाकी लेखन छान आहे. लिहीत रहा.
अंतिम सामना खूपच एकतर्फी झाला
आर्थिक दृष्टीने, T20 सामने क्रिकेट बोर्डाला परवडतात.....
चांगले खेळले.
मी कधी क्रिकेट पाहत नाही पण
सकाळी एक प्रतिसाद लिहिल्याचा
सकाळी एक प्रतिसाद लिहिल्याचा
अगदी अगदी....