Skip to main content

चायनिज ड्रामा

लेखक चेतन यांनी सोमवार, 24/08/2026 12:42 या दिवशी प्रकाशित केले.

फेसबूकवर रील बघता बघता चायनीज ड्रामे बघण्यात आले. रजनीकांतच्या सिनेमाप्रमाणे इथेही लॉजिक, सायन्स आणि गुरुत्वाकर्षण या तिन्ही गोष्टींवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. 
खरं तर याच तीन-चार विषयांवर अख्खा चायनीज रील उद्योग जगतोय:

१. जेड गॅम्बलिंग / एक्स-रे व्हिजन 
या ड्राम्यांमध्ये नायक किंवा नायिका रस्त्यावरून चालता चालता कुठल्यातरी लोकल बाजारात जातात. तिथे एका कोपऱ्यात दगड विकायला ठेवलेले असतात. एखादा श्रीमंत, माजलेला खलनायक येतो आणि एका मोठ्या दगडावर करोडो रुपये लावतो. आपला मुख्य हिरो/हिरोईन त्या कचऱ्यातल्या १० रुपयांच्या दगडाकडे बघतात. हिरोकडे चक्क 'एक्स-रे व्हिजन' (X-Ray Vision) असते. त्यांच्या डोळ्यात एक चमक येते आणि तो दगड ते विकत घेतात. जेव्हा तो दगड कापला जातो, तेव्हा त्यातून जगातील सर्वात दुर्मिळ 'इम्पेरियल ग्रीन जेड' (Imperial Green Jade) निघतो. खलनायक थेट रस्त्यावर येतो आणि हिरो एका रात्रीत अब्जाधीश!

यात थोडंसं नवीन व्हेरिएशन हवं असेल तर त्याला या एक्स-रे व्हिजनने थेट भविष्यही दिसतं! शेअर मार्केटचे ग्राफ बघून डोळ्यांसमोर थेट उद्याचे स्टॉक मार्केटचे भाव, पेनी स्टॉकचे रिटर्न्स आणि लॉटरीचे नंबर एखाद्या डिजिटल स्क्रीनसारखे फिरायला लागतात. आपला हिरो आधीच बघून ठेवलेले स्वस्तातले शेअर्स घेऊन रातोरात वॉरेन बफे आणि इलॉन मस्कलाही मागे टाकतो. अजून व्हेरिएशन हवं असेल तर याच एक्स-रे व्हिजनने त्याला एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या शरीरातील आजारपण आणि लपलेले कॅन्सरचे ट्युमर कपड्यांमधूनही दिसतात.

२. भिकारी वाटणारा अब्जाधीश आणि अतिश्रीमंत नायक/नायिका 
चायनीज ड्राम्यांचा दुसरा सर्वात आवडता विषय म्हणजे 'गरीब असल्याचं नाटक करणारा अतिश्रीमंत वारसदार'. यात आपला हिरो जगातल्या सर्वात श्रीमंत कुटुंबाचा एकुलता एक वारसदार असतो. पण त्याला अचानक काय सुचतं देव जाणे, तो आपली सगळी संपत्ती लपवून एका मध्यमवर्गीय कुटुंबात 'काहीही न करणारा घरजावई' (Useless Son-in-law) म्हणून राहतो. त्याची सासू आणि मेहुणी त्याला रोज झाडूने मारतात, कपडे धुवायला लावतात आणि "तू आमच्या कुटुंबाला लागलेला कलंक आहेस" असे टोमणे मारतात.

कथेच्या क्लायमॅक्समध्ये सासू किंवा बायको त्याला घरातून हाकलून देते. हिरो रस्त्यावर येतो आणि अचानक रस्त्यावर एकाचवेळी १० ब्लॅक रोल्स रॉयस (Rolls Royce) गाड्यांची लाईन लागते. त्यातून काळे चष्मे घातलेले ५० बाउन्सर बाहेर येतात, रस्त्यावर ९० अंशात वाकतात आणि एका सुरात ओरडतात— "स्वागत आहे, मालक! तुमच्या आजोबांनी संपूर्ण देशाची संपत्ती तुमच्या नावावर केली आहे!" यात व्हेरिएशन हवं असेल तर नवरा आणि नवीन बायको दोन्ही गर्भश्रीमंत असतात (पण दोघांनाही एकमेकांची ओळख माहीत नसते). अजून व्हेरिएशन हवं असेल तर नायक चक्क अंडरवर्ल्डचा 'ड्रॅगन बॉस' असतो आणि सासूने अपमान केल्यावर तो रागाच्या भरात १०-२० बिलियन युआनला एखादी कंपनी भाजी घेतल्यासारखी विकत घेतो.

३. मेडिकल आणि कुंग-फूचा 'देवमाणूस' (The Ultimate Grandmaster) 
तिसरा आणि सर्वात भयानक प्रकार म्हणजे अॅक्युपंक्चर, चमत्कारी औषध (Elixir) आणि कुंग-फू! यात शहरातील सर्वात श्रीमंत आणि पॉवरफुल कुटुंबाचे आजोबा मरणशय्येवर असतात. टॉपचे डॉक्टर हात वर करतात आणि "आता यांना फक्त देवच वाचवू शकतो" असा डायलॉग मारतात. तेव्हा आपला तोच गरीब दिसणारा हिरो एन्ट्री मारतो. डॉक्टर त्याला हाकलून देतात, पण तो खिशातून शेळीच्या लेंडीसारखी दिसणारी एक 'चमत्कारी गोळी' (Elixir) काढतो, जी त्याने बहुधा घरच्या प्रेशर कुकरमध्ये बनवलेली असते!

त्यानंतर सुरु होतो खरा खेळ. हिरो कुंग-फू स्टाईलने म्हाताऱ्याच्या शरीरात १०-१२ सुया (Acupuncture) टोचतो. पुढच्याच सेकंदात म्हातारा जोरात खोकतो, एक वाटीभर काळं रक्त थुंकतो आणि फक्त जिवंतच होत नाही, तर थेट दहा वर्षांनी तरुण झाल्यासारखा उठून बसतो! यात व्हेरिएशन हवं असेल तर तो एका रात्रीत त्या चमत्कारी गोळीची पॉवर १००० पटींनी वाढवतो. अजून व्हेरिएशन हवं असेल तर नायक आपल्या पॉवरने म्हाताऱ्याच्या शरीरातील काळी जादू (Black magic) खेचून काढतो (आपले कोकणातले भगत लोक झक मारतील याच्यासमोर). मग आजोबा हिरोच्या पाया पडतात आणि सर्वांना समजते की हा साधा माणूस नसून 'सेलेस्टियल मास्टर' आहे. मग सगळे मग्रूर डॉक्टर आणि खलनायक त्याच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायला लागतात.

४. सिस्टीम आणि टास्क (The System / AI Cheat Code) आता यातील सर्वात नवीन प्रकार म्हणजे नायकाच्या डोक्यात एक 'सिस्टीम' (System) बसलेली असते. त्याला साधे साधे टास्क मिळतात. उदा. "सासूचा अपमान सहन करा." टास्क कम्प्लीट झालं की सिस्टीम सांगते - "बधाई हो! तुमच्या अकाउंटमध्ये १० अब्ज रुपये जमा झाले आहेत आणि तुम्हाला उडण्याची नवीन पॉवर मिळाली आहे!"

(चायनीज ड्राम्यांचा एक न चुकणारा भाग: 'फेस-स्लॅपिंग' (Face-Slapping) - या सर्व प्रकारांत जेव्हा हिरोचा खरा अवतार समोर येतो, तेव्हा तो खलनायकाला किंवा सासूला अशी सणसणीत थप्पड मारतो की ती व्यक्ती हवेत ३६० अंश फिरून दुसऱ्या खोलीत जाऊन पडते.)

तळटीपा (काही महत्त्वाचे निरीक्षण): 

१. डोकं न चालवता हे ड्रामे बघावेत. 

२. इंग्रजी सबटायटल्समध्ये नायक/नायिका यांच्यात He/She, Wife/Husband यांचा जसा वाटेल तसा वापर केलेला असतो. कधी नवरा गरोदर असल्याचं वाक्य सबटायटलमध्ये येतं, तर कधी बायकोला 'He' म्हटलं जातं. 

३. इथे 'सिस्टर' (Sister) म्हणून ओळख करून दिलेली मुलगी पुढे कधीही अचानक 'गर्लफ्रेंड' (Girlfriend) होऊ शकते. 

४. दोन-चार ड्रामे नुसते नायक आणि नायिका बदलून फ्रेम-टू-फ्रेम तेच असू शकतात. स्क्रीप्ट रायटर बहुतेक एकच असावा AI.

वैधानिक इशारा :

१. हे ड्रामे सलग २ तासांपेक्षा जास्त बघितल्यास तुमच्या बुद्ध्यांकात (IQ) लक्षणीय घट होऊ शकते. मेंदूत 'शॉर्ट सर्किट' होण्याचा धोका आहे. 

२. घरातल्या प्रेशर कुकरमध्ये कोणतीही चमत्कारी गोळी बनवण्याचा प्रयत्न करू नये, जास्तीत जास्त वरण करपेल. 

३. घरात कुणी आजारी पडल्यास त्याला कुंग-फू स्टाईलने शिवणकामाच्या सुया टोचू नयेत, पेशंट काळं रक्त थुंकण्याऐवजी थेट यमसदनी जाईल 

४. तुमच्या खिशात १० रुपये असताना रस्त्यावरचे माती लागलेले दगड विकत घेऊ नका, त्यातून 'इम्पेरियल ग्रीन जेड' नाही, तर फक्त मातीच निघेल.

५. हे ड्रामे बघतो म्हणुन घरचे तुम्हाला घरातून हाकलून दिल्यावर बाहेर रोल्स रॉयस गाड्यांची लाईन लागणार नाही, याची नोंद घ्यावी!.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 402
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

इथे 'सिस्टर' (Sister) म्हणून ओळख करून दिलेली मुलगी पुढे कधीही अचानक 'गर्लफ्रेंड' (Girlfriend) होऊ शकते

उईघुर असतील ते 😆😆 

बाकी चायनीज ड्रामा म्हणले की बालपण आठवते, होम टीव्ही नावाचे एक चॅनल होते, त्यावर 

- फ्लाइंग फॉक्स ऑफ द स्नोई माउंटन 

- लिजेंड ऑफ द काँडोर हिरोज 

- झू माउंटन सागा 

- द हंटर्स प्रे , आणि 

- द ब्लड स्टेन्ड इंट्रीग 

अशा चारपाच सिरीज लागत त्या पण अशाच धाटणीतल्या होत्या. झू माउंटन सागा विशेष प्रसिद्ध होती पोरांमध्ये.

In reply to by वृषभ खोंडे

हो  होम टिव्हीवर त्यावेळेला बहुतेक ॲड नव्हत्या. पण ते एक वेगळे ड्रामे होते. (हिमगिरी के वीर)

हे नेक्स्टलेवल आहेत 😅 

गाय ह्या विषयावर सुद्धा एक चित्रपट आला आहे. 

अत्यंत भिकार दर्जाचे अनिमेशन आहे म्हणून तो लोकप्रिय झाला आहे. 

हा हा हा. पण मला तर वाटलं की भारतात कुकु टीव्ही, पॉकेट एफएम आणि तत्सम अनेक प्लॅटफॉर्म्सवर ज्यांचे उदंड पीक आले आहे अशा कथांचे (म्हणजे एकाच कथेचे !!) हे वर्णन आहे. 

पूर्वी असायचा ना एक पोर्टेबल चायनीज व्हिडिओ गेम .. ९९९ गेम्स. एकाच छोट्या उपकरणात ९९९ व्हिडिओ गेम्स. ऊर्फ तीन मूळ गेम्स ३३३ वेळा रिपिट. 

बाकी याच विषयावर एक आख्खे पुस्तकांचे देखील जॉन्र अमेझॉन किंडल आणि पेपरबॅक पुस्तकांत आले आहे हे कोणी पाहिले का? बिलियनेर अरेन्जड मॅरेज (अगदी लेखात वर्णन केले तसे. तडजोड म्हणून खोटे लग्न, श्रीमंती लपवून सामान्य माणूस ऊर्फ भिकारी किंवा सफाई कामगार बनून थपडा खाणे. हे शहरातले किंवा देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती असतात पण त्यांचा फोटो किंवा व्हिडिओ कधीही मिडियात आलेलाच नसल्याने त्यांना कोणीच ओळखत नाही आणि थेट थप्पड लगावत सुटतात).

In reply to by गवि

आणि त्याच्या सोबत एक अजून प्रकार असतो "The Arrogant wife and her family slapped the poor husband and asked him to leave, only to see 8000 mercenaries at their gates bowing to her rice cooking husband saying we missed you master" मला वाटते दक्षिण भारतीय अतिरंजित चित्रपटांसारखे हे प्रकार पण दक्षिण चीन मधे होत असावेत.

In reply to by वृषभ खोंडे

दक्षिण भारतीय अतिरंजित चित्रपटांसारखे हे प्रकार पण दक्षिण चीन मधे होत असावेत.

Hello! अत्यंत अभिजात, अभिरुचीसंपन्न, आशयघन, हृदयस्पर्शी, भावविभोर, वेगवान, कलात्मक, प्रेरणादायी, समीक्षकप्रिय, लोकप्रिय अश्या आपल्या सौदिंडीयन सिनिमाशी त्या टप्पर चिनी मालाची तुलना कशी करता येईल? 🤔

- (सौत्त सिनिमा प्रेमिडु) कांदा लिंबू 

In reply to by कांदा लिंबू

साऊथ सिनेमे (मल्याळी) आवडल्याबद्दल सहसा लिब्रांडू अशी पदवी मिळते, बाकी 

जीने नहीं दुंगा 

सत्यनारायण का बदला 

पातळविजयम 

इत्यादी आवडत असतील तर मला कसे कळणार ?

(मृुरुगादोस मासाला सांबर डोसा) खोंडे

भारीच दिसताहेत हे चायनीज ड्रामे. बाकी हे पाहण्याची कधी इच्छा होईल असं वाटत नाही, आणि वैधानिक इशारा १  मुळे तर अजिबातच नाही 😅

मिपाखरांच्या अवलोकनार्थ व माहितीस्तव तसेच संदर्भ म्हणून उपलब्ध राहाव्यात यासाठी धागाकर्त्यांनी वरील चायनीज रीलांच्या काही लिंका इथे द्याव्यात. 

- (लिंकाळू) कांदा लिंबू