गंमत म्हणून काही प्रसिद्ध व्यक्ती व त्यांची जन्मरास देत आहे. त्यांचे कर्तृत्व, स्वभाव यांचा व चंद्र राशीचा काही संबंध आहे का याचे स्वतःच विश्लेषण करून संबंध जोडता येईल.
कदाचित काही मिपाकरांची जन्मरास त्यांच्या प्रतिसादांवरून ओळखता येईल.
___________________
मेष - शरद पवार, रोनाल्ड रीगन, बिल क्लिंटन, पु. ल. देशपांडे, आशा भोसले, अमित शाह
वृषभ - अनिल कुंबळे, सेहवाग, गांगुली
कर्क - मनमोहनसिंग, लता मंगेशकर
कन्या - महेंद्रसिगं धोनी, नरेंद्र दाभोळकर
वृश्चिक - नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रंप
धनू - सचिन तेंडुलकर, राहुल गांधी, इंदिरा गांधी
मकर - संजय राऊत
कुंभ - देवेंद्र फडणवीस
मीन - राहुल द्रविड
________________________
वरील सर्वांची, ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार सूर्य रास खालीलप्रमाणे आहे.
मेष - सचिन तेंडुलकर
वृषभ - डोनाल्ड ट्रंप
मिथुन - सौरभ गांगुली, महेद्रसिंग धोनी, राहुल गांधी
कर्क - देवेंद्र फडणवीस
सिंह - बिल क्लिंटन, आशा भोसले
कन्या - लता मंगेशकर, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी
तूळ - नरेंद्र दाभोळकर, पु. ल. देशपांडे, सेहवाग, कुंबळे, अमित शाह
वश्चिक - शरद पवार, इंदिरा गांधी, संजय राऊत
धनू - राहुल द्रविड
मकर - रोनाल्ड रीगन
मिसळपाव
प्रतिक्रिया
ईंग्रजी कॅलेंडर प्रमाणे अशी माहीती मिळेल काय?
ईंग्रजी कॅलेंडर प्रमाणे अशी माहीती मिळेल काय?
लेख संपादित करून मूळ लेखात…
In reply to ईंग्रजी कॅलेंडर प्रमाणे अशी माहीती मिळेल काय? by सौन्दर्य
लेख संपादित करून मूळ लेखात उल्लेखलेल्या सर्वांची सूर्य रास दिली आहे.
नवनाथ बन ह्यांची रास कोणती…
नवनाथ बन ह्यांची रास कोणती आहे?
वृश्चिक - नरेंद्र मोदी,…
वृश्चिक - नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रंप >>>
अरेच्छा! म्हणूनच ट्रम्पतात्या त्यांच्या विरोधकांना विषारी डंख मारत असतात तर! बादवे तात्यांची ही शेवटची टर्म आहे, मार म्हणा किती डंख मारायचे ते.
माझी रास?
तीच ती इतरांच्या राशीला लागणारी 😈
माझी सूर्य रास आणि चंद्र रास…
माझी सूर्य रास आणि चंद्र रास एकच आहे.
वृषभ.:
म्हणजे तुमचा जन्म १५ मे-…
In reply to माझी सूर्य रास आणि चंद्र रास… by विजुभाऊ
म्हणजे तुमचा जन्म १५ मे- १५जून मधील आहे. या कालावधीत येणाऱ्या अमावस्येच्या आसपास आहे
चंद्र रास
तुमची रास कोणती याचा भारतीय परिप्रेक्षात अर्थ तुमची चंद्र रास कोणती असाच असतो.
माझी चंद्ररास नी सुर्यरास…
माझी चंद्ररास नी सुर्यरास कोणती? प्र वरून नाव आहे.
प्र पत्रिकेतील असेल तर कन्या…
In reply to माझी चंद्ररास नी सुर्यरास… by अमरेंद्र बाहुबली
प्र पत्रिकेतील असेल तर कन्या, पण जन्मवेळेनुसार नसेल तर त्याला अर्थ नाही.
आताच आईला विचारले घ वरून नाव…
In reply to प्र पत्रिकेतील असेल तर कन्या… by श्वेता व्यास
आताच आईला विचारले घ वरून नाव होते पत्रिकेत असे तिने सांगितले.
मिथुनच आहात मग तुम्ही…
In reply to आताच आईला विचारले घ वरून नाव… by अमरेंद्र बाहुबली
मिथुनच आहात मग तुम्ही चंद्ररास. सूर्यरास जन्मतारखेनुसार नेटवर सहज मिळेल.
पु. ल. देशपांडे मेष वाटत…
पु. ल. देशपांडे मेष वाटत नाहीत, कदाचित लग्न राशीचा जास्त प्रभाव असेल.
मलाही तसेच वाटते. सायंकाळी ६…
In reply to पु. ल. देशपांडे मेष वाटत… by श्वेता व्यास
मलाही तसेच वाटते. सायंकाळी ६:१५ नंतर जन्म असेल तर वृषभ चंद्ररास येते व लग्नरास मेष, वृषभ किंवा मिथुन येईल.
चर्चेत मला काही गम्य नाही पण…
चर्चेत मला काही गम्य नाही पण वाचत आहे.
यातील काही व्यक्तींच्या…
यातील काही व्यक्तींच्या जन्मरास व सूर्यरास ही जोडी रोचक आहे.
साधारणपणे कर्क, कन्या, तूळ, मीन या राशी सौम्य समजल्या जातात. मनमोहनसिंग व लता मंगेशकर या दोघांचीही जन्मरास कर्क व सूर्यरास कन्या. हे दोघेही सौम्य स्वभावाचे, वादविवादात न पडणारे, आक्रमकतेचा अभाव, आपल्या क्षेत्रात उच्च पातळीवर गेलेले आहेत. त्यांची वेशभूषा सुद्धा ठराविक असायची (लता मंगेशकर श्वेत साडी व मनमोहन सिंग आकाशी पगडी).
संजय राऊत हे एकदम भीतिदायक व्यक्तिमत्व. जन्मरास मकर (दीर्घोद्योगी, कष्टाळू व सातत्यता) आणि सूर्यरास वृश्चिक (आक्रमक, सूडबुद्धी, नांगी मारणे, निर्भय) ही दोन्ही राशींची वैशिष्ट्ये दिसतात.
साधारणपणे गुरू राशीस्वामी असलेले (धनू व मीन रास) उत्तम अनुयायी, सभ्य व संघ खेळाडू असतात, परंतु नेतृत्व कौशल्य तितकेसे नसते. राहुल द्रविड (जन्मरास मीन व सूर्यरास धनू) हा उत्तम संघभावना असलेला, वादांपासून दूर राहणारा उत्कृष्ट फलंदाज, परंतु कर्णधार म्हणून तो फारसा यशस्वी नव्हता. धनू जन्मरास असलेला सचिन सुद्धा उत्कृष्ट खेळाडू असूनही कर्णधार म्हणून तितकासा यशस्वी नव्हता.
डोनाल्ड ट्रंप (वृश्चिक जन्मरास व वृषभ सूर्यरास) हे राशींना अनुसरून सूडबुद्धी, परिणामांची पर्वा न करता थेट कृती करणारे आहेत. वृषभ रास परिणामांची पर्वा न करता थेट कृती करणारी असते. सेहवाग आणि गांगुली हे वृषभ जन्मरास असलेले धडाकेबाज फलंदाज म्हणून प्रसिद्ध होते.
शरद पवार (मेष जन्मरास व वृश्चिक सूर्यरास) यांच्यासाठी या दोन्ही राशी मंगळाच्या आहेत. सूडबुद्धी, नेतृत्वगुण हे प्रकर्षाने दिसतात.
सर्व जण आपापल्या राशीला शोभत…
In reply to यातील काही व्यक्तींच्या… by श्रीगुरुजी
सर्व जण आपापल्या राशीला शोभत आहेत, शरद पवार जरा जास्तच.