Welcome to misalpav.com
लेखक: खादाड अमिता | प्रसिद्ध:


Comments

मुळात 'रोगनजोश' म्हंटल्यावर पदार्थावर 'रोगन' (तर्री) अपेक्षित आहे. 'रोगन' विरहीत 'रोगनजोश' होऊ शकत नाही. मुळात 'मटण रोगनजोश' ही एक काश्मिरी पाककृती आहे. त्याला आपल्या आवडीनुसार चिकन रोगनजोश बनविण्यास काहीच हरकत नाही. पण, 'रोगन' महत्त्वाचे. ह्या पाककृतीचा तो प्राणच म्हणावयास हरकत नाही. पाककृती चवीला चांगली असणार ह्यात वाद नाही. करून पाहिली जाईलच. पण एखादे दुसरे नांव शोधावे लागेल.

पेठकर काकांशी सहमत अवांतर >>>१ सुकी लाल मिरची (कांदा, लसुन आणि मिरची ची पेस्ट करून घ्यावी) कांदा कच्चाच घ्यावा की परतुन्/भाजुन घ्यावा?

गरम गरम नान, फुलके किंवा पूलाव सोबत फस्त करावे! फोटो पाहून तुमचा आदेश पाळण्याची अतीव इच्छा झाली आहे... फक्त ते कुठे ठेवलय ते सांगा. बाकी आम्ही बघून घेउ.

स्टेप बाय स्टेप, किमान महत्वाच्या स्टेप्सचे फोटो पाकृमधे नेहमी असावेत असं मला वाटतं. त्यामुळे पाककृती प्रत्यक्ष करताना वेळोवेळी आपण योग्य ट्रॅकवर आहोत ना याची खात्री करता येते. (रंग, कन्सिस्टन्सी, क्वांटिटी वगैरे अनेक बाबतीत.)

आत्तापर्यंत पाहिलेल्या रोगनजोशपेक्ष वेगळीच दिसतेय. पण यम्मी दिसतेय. मी एका ऑथेंटिक रेसिपीत रोगनजोशमध्ये चक्क कोकम घातलेले पाहिलेय. कोंकणातलं कोकम कश्मिरी वाझवानमध्ये पाहून विस्मय वाटले होते.