अरे हो मला एक प्रश्न विचारायचा होता - मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम केला तर चालतो का?
म्हणजे कोणत्याही वयाच्या स्त्री ला.
काही धोके आहेत त्यात का नाही?
फारच जनरल किंवा ब्रॉड असा प्रतिसाद..
योगा सोडून कुठलाही व्यायाम चालतो या विधानाला काही आधार आहे का?
म्हणजे साधी योगासने चालत नाहीत पण कार्डिओ व्यायाम जसे ऐरोबिक्स किंवा जिममध्ये केलेले व्यायाम किंवा पोहणे, टेकडी चढणे, दोरीवरच्या उड्या, पिलॅट्स असले काय वाट्टेल ते व्यायाम चालतील पण योगा नाही?
मला मिळालेल्या फीडबॅक नुसार साधी योगासने या काळात जास्त श्रमकारक व्यायामांपेक्षा जास्त चांगली..
तुम्हाला कोणी सांगितलं? जो व्यायाम झेपेल तो करु शकता. अॅरोबिक्स, स्विमींग - टँपॉन असेल तरच, साधी योगासनंसुद्धा. पोटावर खुप ताण येणार नाही असा व्यायाम करु शकता. थोडक्यात जे झेपेल तेच करा...उगाच अमकी हे करते म्हणुन मी पण करेन असं नाही.
आणि आधाराचं म्हणाल तं तुमच्यासारखं फीडबॅक घेऊण लिवलं नैये ... स्वताचा अनुभव सांगितलाय ..
काये मी कॉलेजला असताना योगाच्या क्लास ला जायची तेव्हा तिथल्या टीचर स्पष्टपणे सांगायच्या
ज्यांना मासिक पाळी सुरु आहे त्यांनी योगा करु नका ... त्यामुळे मी कुठलाच प्रकार त्या दरम्यान करायची नाहि
आणि नंतरहि कधीच केला नाहि ...
इकडे तर योगाचे बरेच प्रकार शिकवले जातात ... अगदी नावहि कळत नाहित पण मस्त असतात ... महिन्यातले चार दिवस
सोडुन नियमित केल्यास मानसिक शारिरिक बराच फरक जानवतो ....
मासिक पाळी दरम्यान मी स्वतहा योगा सोडुन अॅरोबिक्स , स्टेप एम , झुम्बा ,जिम करते ..
बाकिच्यांचं बाकिच्याना माहित ... मी स्वताहाचा अनुभव सांगितला ...
मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम करू नये याला कोणताही शास्त्राधार नाही. मी लष्करात असताना माझ्या वर्गातील २५ डॉक्टर मुली सुद्धा लष्करी प्रशिक्षण घेत होत्या. तेंव्हा आम्हाला BPET (battle physical efficiency test) म्हणजे १२ मिनिटात ३.२ किमी धावणे हि पण चाचणी होती आणि अशा चाचण्यामध्ये त्या मुली पाळीच्या काळातही धावत असत. जर इतकी श्रमपूर्ण कामे तुम्ही जर करू शकता तर बाकी कोणताही व्यायाम करण्यास प्रतिबंध नसावा.
एखादीला फारच कंबर दुखी किंवा तत्सम त्रास असेल तर गोष्ट वेगळी.
अमेरिकन वायुदलात याच कारणासाठी लढाऊ वैमानिक म्हणून स्त्रियांना प्रवेश नव्हता कि महिन्यात ४ दिवस त्या उपलब्ध होणार नाहीत . परंतु १९९२ साली( बहुधा) तो पहिल्यांदा प्रवेश दिला गेला आणि त्या स्त्रियांनी आपणही तितक्याच दर्जाच्या वैमानिक होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवले. जर आपण ६G (गुरुत्वाकर्षणाच्या सहा पट बळाने) किंवा जास्त बलाने विमान उलटे पालटे चालवू शकता तर योगासने करण्यासाठी कोणताही प्रत्यवाय नसावा असे वाटते.
एच आर टी चे साइड इफेक्ट्स खुप असतात ना ?? ऐकुन आहे फक्त.
हार्मोन्स चेन्जेस चा त्रास ज्याना वयाच्या १५/१६ वर्षापासुन होतो त्यांच्यासाठी
एच आर टी ट्रीटमेन्ट त्रासदायक होउ शकते का ?? सूट होते का ??
काहि साधे उपाय ??
नैराश्य( depression) आहे कि लक्ष वेधून घेण्यासाठी( attention seeking) केले जाते ते सहज सांगणे कठीण जाते
लक्ष वेधून घेणं हे लक्षण असून मूळ मानसिक रोग वेगळाच असण्याचीही शक्यता नाही का? मानसिक रोग असेल त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहेच.
प्रगत देशांमधे प्रसूतीसंदर्भात क्लासेस भावी माता-पिता दोघांसाठीही असतात. अशा प्रकारच्या लेखनाची, संवादाची गरजही स्त्रिया आणि स्त्रियांशी संपर्कात येणार्या पुरुषांसाठीही तेवढीच महत्त्वाची आहे.
टंकनदुरूस्ती: लेखात तुम्ही hot flashes याऐवजी hot flushes असा शब्द वापरलेला आहेत. (ही अतिरिक्त उष्णता फ्लश झाली तर अडचणच सुटते; निर्माण होत नाही.)
नैराश्य( depression)यात केमिकल लोच्या असतो आणि तो औषधानेच सुधारावा लागतो.पण लक्ष वेधून घेण्( attention seeking)याची गोष्ट वेगळी आहे. यात त्या स्त्रीला (आणि नवरयाला) समुपदेशनाने उपचार करता येतात
लक्ष वेधून घेणे(attention seeking) हे नैराश्याचे लक्षण नव्हे.(ते हिस्टेरिया चे लक्षण असू शकते)
लक्ष वेधून घेणे(attention seeking) हे नैराश्याचे लक्षण नव्हे.(ते हिस्टेरिया चे लक्षण असू शकते)>>
"histrionic personality disorder
a disorder characterized by dramatic, reactive, and intensely exaggerated behavior, which is typically self-centered. It results in severe disturbance in interpersonal relationships that can lead to psychosomatic disorders, depression, alcoholism, and drug dependency. Symptoms include emotional excitability,..." म्हणजे आपण मॉडेल केलं तर histrionic behavior आणि नैराश्य यांचा पाथ कोएफिशियंट सिग्निफिकंट येईल नाही का?
असो, आणि अदितीने मानसिक आजार म्हटलंय नाही का? फक्त डिप्रेशन नव्हे.
चीड चीड कोणी स्वतःहून करीत नाही तर चिडचिड हि होते. जेंव्हा एखादी परिस्थिती आपल्या हातात नसते आणि तो बदलण्याचे आपल्याला सामर्थ्य नसते तेंव्हा माणसाची/ बाईची चिडचिड होते
परिस्थिती आपल्या हाताबाहेर असते आणि ती बदलण्याचे सामर्थ्य आपल्याकडे नसते तेंव्हा शांत मनाने परिस्थिती स्विकारणेच फायद्याचे असते. शिवाय परिस्थिति बदलण्याचे सामर्थ्य आपल्याकडे नसले तरी त्याची तीव्रता कमी करण्याचे उपाय अस्तित्वात असतील तर ते उपाय योजण्यात यावेत, असे मला वाटते.
१ ) पुरुषांना पण असे(रजोनिवृत्ती सारखे) होते हे थोड्याप्रमाणात सत्य आहे पण पुरुषांची संप्रेरके साठीच काय सत्तरीपर्यंत कार्यरत असतात त्यामुळे त्या वयालाही पुरुषाला मूल होऊ शकते. पण स्त्रीच्या बाबतीत हि शक्यता एकदम संपत असते. या गोष्टीचाही पुष्कळ स्त्रियांवर खोलवर मानसिक परिणाम होत असतो. आता आपल्याला मुल होऊ शकणार नाही. हि निसर्गाने दिलेली आपल्यासारखा चालता बोलता जीव निर्माण करण्याची अफाट शक्ती आता संपली असे निराशावादी विचार मनात येतात.
हल्ली १ किंवा २ मुले असण्याच्या जमान्यात, फार तरूण वयातच, ह्या पुढे मुले होऊ नयेत म्हणून, स्त्री-पुरुष स्वेच्छेनेच वेगवेगळे उपाय योजतात. म्हणजे प्रत्यक्ष रजोनिवृत्तीच्या कितीतरी वर्षे आधीच, आता आपल्याला मुल नकोच ह्याची, स्त्रीच्या मनाची तयारी झालेली असते. जीला अजिबात कधी मुल झाले नाही तिला वाईट वाटणे समजू शकतो. बाकी ज्यांना योग्य त्या वयात संतती प्राप्त झाली आहे त्यांना जरा हळहळ वाटेल पण मनावर खोल परिणाम वगैरे होण्याची शक्यता वाटत नाही.
२)ज्या वयात स्त्रीची रजोनिवृत्ती येते त्याच काळात पुरुषाचे पोट सुटणे, टक्कल पडणे, चष्मा येणे इ. घडत असते. त्यालाही हे सर्व जाणून वाईट वाटत असते पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतो. याच वयात स्त्रियांनाही चष्मा(चाळीशीचा) लागलेला असतो वजन वाढलेले असते,चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. पण यात अधिक म्हणून रजोनिवृत्ती येते.
तसेच पुरूषांच्या बाबतीतही, हल्ली कॉमन होत चाललेला मधुमेह जडतो. मधुमेहानेही पुरुषांच्या लैंगिक सुखात, गरजेत आणि क्षमतेत बाधा येते. तर मधुमेह नसलेल्या पुरुषातही शैथिल्य येतेच. उगीच व्हायाग्रा वगैरेची विक्री होत असते का?
अशीच परिस्थिती पुरुषाची त्या वयात होते जर त्याची नोकरी गेली धंद्यात खोट आली किंवा आर्थिक स्थिती नाजूक झाली तर. कारण जसे सुंदर दिसणे हा स्त्री स्वभावाचा भाग असतो तसे आपल्या पायावर आर्थिक डोलारा सांभाळणे हे पुरुषाच्या स्वभावाचा भाग असतो. या काळात जर आर्थिक स्थिती नाजूक झाली तर पुरुषाचे भावविश्व असेच कोलमडते.
ही तर पराकोटीची परिस्थिती झाली. पण तशी खोट वगैरे नाही आली आणि नोकरीही व्यवस्थित चालू असेल तरी, मुलांच्या उच्च शिक्षणाचा वाढता खर्च, वाटती महागाई, (वयोमानानुसार)वाढता हॉस्पिटलचा, औषधपाण्याचा खर्च, इ.इ. मुळे, उद्या आपले उत्पन्न बंद झाले की घरखर्च कसा उचलायचा, आजचे राहणीमान टिकवायचे कसे? ह्या विवंचनेतून अनेक निवृत्त ज्येष्ठ नागरीक शरीर साथ देत नसले तरी कांही तरी उत्पन्नाचे साधन शोधून धडपडताना दिसतात. त्यांचे भावविश्वही कोलमडलेलेच असते.
१.- कामेच्छा desire २.उद्दीपन arousal ३.-स्नेहन lubrication ४.- दाह pain ५.- अत्त्युच्च आनंद -orgasm यात उद्दीपन स्नेहन आणि दाह या तीन गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांचे कामजीवन अस्ताव्यस्त होते. यात कामेच्छा कमी झाली नाही तरी उद्दीपन कमी होते स्नेहन कमी होते त्यामुळे कोरडेपणा जाणवतो यामुळे योनीमध्ये दाह होतो त्यामुळे स्त्रीला अत्त्युच्च आनंदापर्यंत पोहोचणे कठीण होते.
ह्याच अवस्थेतून मधुमेही आणि इतर वयोवृद्ध पुरुषही जात असतात. माझा म्हणण्याचा अर्थ इतकाच की दोघांनाही आज ना उद्या ह्या गोष्टींना सामोरे जावे लागते. दोघांनीही एकमेकांशी बोलून, तज्ञांना सल्ला घेउन उपाय योजना कराव्यात किंवा आहे ती परिस्थिती 'निसर्गनियम' म्हणून स्विकारावी. प्रेम ही उत्कट भावना मनांत असावी, आपल्या साथिदाराला ती वरचेवर दिसून येईल असे वर्तन ठेवावे. शरीरसंबंधातून सुख शोधण्याचा अट्टाहास धरू नये, विशेषतः पुरुषांनी.
या अशा द्विधा वागण्यामुळे पुरुष अतिशय गोंधळात पडतो. बायको जवळ आल्यामुळे तो उद्दीपित होतो पण संबंध नाकारल्यामुळे तो दुखावला जातो. पुढच्या वेळी अशी अवहेलना होऊ नये म्हणून तो बायकोशी भावनिक जवळीक टाळतो.
भावनिक नाही शारीरीक. कधी कधी पुरुष कोषात जातो. संवाद तुटतो आणि म्हणूनच वातावरण अधिक तणावपूर्ण होते. इथे पुरुषाने पुढाकार घेऊन संवाद साधावा आणि कोषात जाऊन कोणाचेही भले होणार नाहीए हे जाणून अशी अवस्था टाळावी.
स्त्रियांनी जर आपल्या नवर्याला सुरुवातीलाच स्पष्ट सांगितले कि मला फक्त जवळीक हवी आहे संबंध नको तर पुरुषाची उद्दीपित होणे आणि नंतर थंड पडणे अशी कुचंबणा टळेल आणि निदान संबंधात तणाव वाढणार नाही.
ही गोष्ट फक्त स्त्री नाही करू शकत. कारण जर नवरा समंजस नसेल तर तो तिच्या पासून मनाने आणि शरीराने दूर जाऊ शकतो. हीच भिती तीला वाटत असावी, जे नैसर्गिक (तिला भिती वाटणे) आहे. नवराही तितकाच विचार करणारा असावा. निसर्गनियमाने आलेली दुर्बलता म्हणजे आयुष्यातील पराभव किंवा आपल्या पती/पत्नी समोर पराभव अशी भावना मनात येता कामा नये. ह्या साठीच समुपदेशनाची, तज्ञांची गरज जास्त आहे असे मला वाटते.
जसे पुरुषांनी दोन पायर्या उतरणे आवश्यक आहे तसेच स्त्रियांनी दोन पायर्या चढणे तितकेच आवश्यक आहे.
अखंड आयुष्यभर प्रत्येक पातळीवर हे आवश्यक आहे फक्त कामजीवनात नाही.
ऑफिसात बॉस ची बकबक गपचूप ऐकून घेताच मग थोडीशी बायकोची ऐकली तर काय बिघडले ?
हा:हा: दोन्ही ठिकाणी बिचार्याला 'चॉईस' कुठे असतो?
(हे विनोदी विधान आहे. कृपया गांभिर्याने घेऊ नये)
आपल्याला काय होते आहे याचे शांत डोक्याने परीक्षण करा कुठे चुकते आहे त्याचा विचार करा आणि संवाद ठेवण्याचा प्रयत्न करा पहा काही फरक पडतो का?
सहमत. अगदी हेच मला म्हणायचे आहे.
ह्या अवस्थेतून जात असलेल्या, लवकरच जाणार असणार्या सर्व नवराबायकोंस शुभेच्छा..!
ज्यांचे लग्न झालेले नाही किंवा अजून अशा समस्या बर्याच दूर आहेत त्यांनी ह्या विषयावरील मिळेल ते साहित्य वाचून आपापल्या मनाची तयारी करावी. मुळात, ही समस्या नसून एक, टाळता न येणारी, नैसर्गिक अवस्था आहे हे ध्यानात असू द्यावे. असो.... त्यांनाही शुभेच्छा..!
सुबोधजी (अर्थात डॉक्टर असल्यानं) शरीर केंद्रबिंदू मानतात आणि प्रश्नाकडे अनिवार्य असाहय्यता म्हणून पाहतात. मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा प्रश्नाकडे पाहण्याचा क्रम : शरीर > मन > आपण असा आहे.
१.- कामेच्छा desire २.उद्दीपन arousal ३.-स्नेहन lubrication ४.- दाह pain ५.- अत्त्युच्च आनंद -orgasm यात उद्दीपन स्नेहन आणि दाह या तीन गोष्टींच्या प्रभावामुळे त्यांचे कामजीवन अस्ताव्यस्त होते. यात कामेच्छा कमी झाली नाही तरी उद्दीपन कमी होते स्नेहन कमी होते त्यामुळे कोरडेपणा जाणवतो यामुळे योनीमध्ये दाह होतो त्यामुळे स्त्रीला अत्त्युच्च आनंदापर्यंत पोहोचणे कठीण होते.
या उलट पेठकर प्रश्नाकडे : (तसं न पाहता, मी म्हटल्याप्रमाणे), आपण > जाणिव > शरीर > मन असं बघतात त्यामुळे वेगळे विकल्प उपलब्ध होतात. अर्थात, प्रश्न नक्की सुटेल असं उत्तर येत नाही.
त्यामुळे :
मानवी संप्रेरकांवर चर्चा करतांना हे दोन पोलॅरिटीज मधलं आकर्षण हाच विषयाचा केंद्र बिंदू ठरतो
हे पारस्पारिक आकर्षण आणि एकमेकातला अनुबंध सर्व प्रश्नांचं एकमेव उत्तर आहे. कामेच्छा, शरीर, वय, आयुष्यातले कोणतेही प्रसंग आणि एकमेकांच्या सर्व मानसिक अवस्था यावर ते मात करतं.
सहमत
खरे ह्यांच्या लिखाणाचे योग्य विश्लेषण केले आहे. अर्थात त्यांच्या व्यवसायाच्या संबंधित लिखाण ते करत असल्याने असे होणे साहजिकच आहे. किंबहुना लेखक म्हणून त्यांचा तो अधिकार आहे.
सुदैवाने पेठकर काका व इतर मान्यवरांच्या प्रतिसादाने चर्चेला योग्य दिशा मिळते.
ह्या विषयावर सध्या वाचन चालले आहे.
ह्या धाग्याचा उपयोग पुढील आयुष्यात नक्कीच होईल.
वाचतो आहे. समजून घेतो आहे. बाकी खरे डॉक्टरसाहेबांना अनाहिता विभागाचे मानद सभासदत्व मिळावे (त्यांची हरकत व इतर महिला सदस्यांची तयारी आणि ऊलट असा विचार करुन) आमच्यासाठी ते आहेतच.
चर्चा वाचते आहे. लेख आवडला.
मी काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियामधे एक लेख वाचला होता. त्या लेखाप्रमाणे आताच्या जीवनशैलीमुळे वयाच्या विशीतही काही महिलांना रजोनिवृत्ती येते आहे. तसे असेल तर ही केवळ मध्यवयातली समस्या न रहाता कोणत्याही करियरिस्ट महिलेला येऊ शकेल अशी समस्या बनत आहे.
तुमच्या पाहण्यात अशा काही केसेस आल्या आहेत का? की अशा दुर्मिळ केसेसचा जास्त बाऊ केला जात आहे? आणि यांचे प्रमाण वाढत असेल तर ते रोखण्यासाठी काही करता येणे शक्य आहे का?
रजोदर्शन अथवा ऋतुप्राप्ती देखील अलीकडे लहान वयातच येऊ लागली आहे असे बर्याच ठिकाणी वाचले आहे. काही ठिकाणी या मागची कारणे गरोदरपणात मातेने घेतलेला योग्य आहार, जन्मानंतर अपत्याचे व्यवस्थित संगोपन आणि त्यामुळे स्त्री-अपत्यामध्ये(सुद्धा) आलेली सुदृढता ही असावीत असा निष्कर्ष होता.
भारतामध्ये कदाचित हे फेनॉमिनन सुखवस्तू वर्गासाठीच लागू असावे.
अतिलठ्ठपणा(ओबेसिटी) सुद्धा नियमितपणावर आणि निवृत्तीवर परिणाम करतो असेही वाचले आहे.
कधीकधी तुमच्या लेखांवर चर्चेत सहभागी व्हावसं वाटतं पण आपले दृष्टीकोन भिन्न आहेत. लेट मी एक्सप्लेन: तुम्ही शरीरतज्ञ असल्यानं प्रश्नाकडे पाहण्याचा क्रम : शरीर > मन > आपण असा आहे.
आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत. आपण शरीर नसून `आपल्याला शरीराची जाणिव आहे' हा माझा अनुभव आहे. त्यामुळे प्रश्नाकडे बघतांना माझा दृष्टीकोन : आपण > जाणिव > शरीर > मन असा आहे.
____________________________________________
या लेखाचं शीर्षक आहे `मध्यवयातील वादळ'. आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत आणि वय शरीराला आहे, आपल्याला नाही हे मला पक्कं माहिती आहे. त्यामुळे पहिल्या चरणातच मी प्रश्नापासनं वेगळा होतो. याचा अर्थ शरीराला प्रश्न येणार आणि त्यांची व्यवस्था करावी लागेल याची पूर्ण कल्पना आहे पण मी कधीही `वादळात' सापडत नाही.
याच दृष्टीकोनाचा दुसरा पैलू त्याही पेक्षा महत्त्वाचा आहे. आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत त्यामुळे लाभलेला देह स्त्री किंवा पुरूष आहे. आपण स्वतः स्त्री किंवा पुरूष झालेलो नाही. दोन वेगवेगळ्या पोलॅरिटीजमधे निसर्गानं स्वतःच्या पुनर्निमितीची अंगभूत योजना केलेली आहे. त्यात स्री देह पुरूष देहाला आकर्षित करण्यासाठी तयार झालेला आहे. त्यामुळे कोण कायकाय सहन करतं आणि कोणाला काहीही तसदी पडत नाही यावर कितीही चर्चा केली तरी ती व्यर्थ आहे. दोन्ही पोलॅरिटीज आवश्यक आहेत आणि त्यांची अंगभूत वैशिष्ठ्य आहेत. आपण देहाचे जाणते आहोत त्यामुळे जे आहे ते नाकारणं म्हणजे स्वपिडनाशिवाय दुसरं काही नाही. त्यानं सगळं जगणं अवघड होण्याखेरीज दुसरं काही साधत नाही.
________________________________________________
या दृष्टीकोनातल्या भिन्नतेमुळे इथल्या सं. मं. चे गैरसमज होतात आणि माझे प्रतिसाद उडवले जातात. तसंच तुम्हाला माझं म्हणणं लक्षात न आल्यानं विधायक आणि सर्वोपयोगी चर्चा होत नाही. त्यात माणसाच्या विनोदबुद्धीचं मला कौतुक आहे त्यामुळे एखाद्यानं हार्मोनियम आणि हार्मोन्सचा संबंध जोडला तर मला ते विषयांतर वाटत नाही. अर्थात त्यामुळे पुन्हा प्रतिसाद उडवले जातात आणि विषय निष्कारण गंभीर होतो.
___________________________________
विथ धीस अंडरस्टँडींग वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मांडलेल्या चर्चेत मी जरूर सहभागी होईन आणि सुचवलेल्या उपायांवर एक अत्यंत अनुभवी डॉक्टर म्हणून तुमचा अनुभव समजावून घ्यायला आनंद होईल.
वरवर पाहता शरीरातील संप्रेरके कमी झाली तर बाहेरून औषध द्वारे ती पुरवली तर काय वाईट आहे. पण हे तितके सोपे नाही आत्ता पर्यंत माहित झालेल्या पुराव्यावरून असे दिसते कि या उपचार पद्धतीमुळे काही फायदे आणी काही तोटे आहेत
according to results based on the review and meta-analysis, among 10 000 women aged 65 to 74 years and using HRT for 1 year, 9 hip fractures, 37.5 wrist fractures, and 57 vertebral fractures would be prevented. Other benefits include preventing 4 cases of colorectal cancer and 34 cases of dementia. Harms include causing 3 strokes, 1.5 thromboembolic events, 0 to 6 cases of breast cancer with short-term use and 10 to 15 cases with long-term use, 25 cases of cholecystitis with short-term use, and 53.5 cases of cholecystitis with long-term use.हे खालील लेखात पूर्ण प्रमाणात उपलब्ध आहे
http://jama.jamanetwork.com/article.aspx?articleid=195214 (jama -journal of american medical association)
याचा अर्थ असा कि हि उपचार पद्धती वाटते तितकी सुरक्षित नाही ती फक्त थोड्या काळासाठी म्हणजे ज्या स्त्रियांना गरम लाटेचा( HOT FLASH) फार त्रास होतो चक्कर येते अशा तर्हेच्या तात्पुरत्या तक्रारीवर उपाय म्हणून वापरता येईल कायम स्वरूपी वापर तेवढा सुरक्षित नाही. यानंतर जर नवीन काही संशोधन माझ्या नजरेस आले तर मी ते लिहीनच
सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २ या माझ्या पूर्वी टंकलेल्या लेखातील उदाहरण देत आहे
तिसरी गोष्ट २०१२ डिसेंबर ची आहे.
एक सासू आपल्या सुनेला( वय २१ वर्षे ) ३ महिन्यापूर्वी लग्न झाले आणि तिची पाळी आली नाही म्हणून माझ्या दवाखान्यात (मुलुंड ला) घेऊन आली होती.तिच्या मुत्र तपासणीमध्ये गर्भारपण नाही असे आले होते म्हणून ते तपासण्यासाठी ती आली होती. सुनेची सोनोग्राफी केली तर असे लक्षात आले कि तिच्या बीजांड कोशात (ovary) मध्ये स्त्री बीज निर्मिती थांबली होती. याचा अर्थ तिला मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाली होती.मी तिला विचारले पाळी केंव्हा पासून आलेली नाही. तर ती म्हणाली कि लग्न झाले आणि पाळी बंद झाली.मी तिला म्हटले कि पण तसे वाटत नाही कि तुमची पाळी ३ महिन्यांपासून बंद झाली आहे.
त्यावर ती म्हणाली कि माझी पाळी १ वर्षापूर्वी बंद झाली मी कल्याण ला एका स्त्रीरोग तज्ञाकडे गेले होते त्यांनी माझी रक्त तपासणी केली. ते रिपोर्ट पहिले तर तिला मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाल्याचे दिसत होते. त्यानंतर त्यांनी त्यास्त्री रोग तज्ञांकडून पाळी येण्यासाठी औषधे घेणे सुरु केले आणि पाळी येत होती तेवढ्या सहा महिन्यात लग्न उरकून घेतले. लग्न झाल्यावर सासू कडे गोळ्या घेण्याची चोरी असल्याने तिची पाळी आता बंद झाली होती.
तिची मुदतपूर्व रजोनिवृत्ती(premature menopause) झाली होती हा दुर्दैवाचा भाग होता पण ते लपवून त्यांनी लग्न उरकून घेतले होते. तिची तपासणी संपल्यावर मी बाहेर आलो तेंव्हा सासुबाई नी विचारले कि निदान काय आहे. मी फक्त एवढेच बोललो कि ती गरोदर नाही.पुढे ती तिचा नवरा आणि सासू काय करणार या प्रश्नाला मी बगल दिली.
अशा केसेस बर्याच प्रमाणात दिसतात. कारण पाळी येणे बंद झाले कि रुग्ण सोनोग्राफी साठी पाठवला जातो त्यामुळे अशा केसेस मी बर्याच प्रमाणात पाहिलेल्या आहेत. याचे नक्की कारण माहित नाही. कारण माहित नसले कि आधुनिक आयुष्यातील तणाव हे सदा धोपटायला मिळणाऱ्या गादीसारखे परंतु ते अजून सिद्ध झालेले नाही. आणी असे रुग्ण आदिवासी आणी खेड्यात सुद्धा दिसतात जेथे आधुनिक आयुष्यातील तणाव नसतो.
पाळी येणे बंद झाले कि रुग्ण सोनोग्राफी साठी पाठवला जातो
अनपेक्षित विनोद होतो आहे. रहावलं नाही.
या विषयाचा अभ्यास नसताना स्पेक्यूलेशनः
पाळी अनपेक्षित वयात बंद होण्याचं कारण एकच एक नाही; तणाव, कुपोषण अशांपैकी एक काही असेल का? विशीत पाळी बंद होण्यामागे अनुवांशिकता किती असेल? काही सांख्यिकी तर्क?
अशा केसेस मी बर्याच प्रमाणात पाहिलेल्या आहेत. याचे नक्की कारण माहित नाही. कारण माहित नसले कि आधुनिक आयुष्यातील तणाव हे सदा धोपटायला मिळणाऱ्या गादीसारखे परंतु ते अजून सिद्ध झालेले नाही. आणी असे रुग्ण आदिवासी आणी खेड्यात सुद्धा दिसतात जेथे आधुनिक आयुष्यातील तणाव नसतो.
याचा अर्थ की यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. पण मी वाचलेल्या टाईम्सच्या बातमी/लेखात मात्र त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या महिलांमधे हा प्रकार आढळल्याचं म्हटलं आहे आणि बंगलोर इथे त्यावरून काही प्रमाणात संशोधन चालू आहे असे दिसते. अशा केसेसंना होमिओपाथी आणि योगाचा फायदा झाल्याचेही वाचनात आले होते. अर्थात हे सगळे अजून प्राथमिक अवस्थेतले निष्कर्ष असावेत.
बीजांड कोशात (ovary) मध्ये स्त्री बीज निर्मिती थांबली होती.
याबद्दल अधिक शंका, प्रश्न आहे. मुलगी जन्माला येतानाच तिच्या बीजांड कोशात २०-३० लाख* बीजं असतात; त्यातली अर्ध्याधिक ती वयात येईपर्यंत मरतात. वयात आल्यापासून दर महिन्याला एक बीज परिपक्व होऊन बाहेर पडतं इथपर्यंत माहिती वाचलेली आहे. रजोनिवृत्ती (कोणत्याही वयात का होईना) होताना ही बीजं पूर्णपणे मरतात का परिपक्व होणं थांबतं का आणखी काही?
(हा आकडा निश्चितपणे आठवत नाही; पण असाच कैच्याकै जास्त वाटू शकेल असा आकडा होता. त्यावरून कोंबडीच्या बीजांड कोशात अशीच रचना असेल तर किती बीजं असतील याचा विचार केला होता. कोंबडी दर २४-३६ तासांत एक अंडं देते.)
मुलगी जन्माला येतानाच तिच्या बीजांड कोशात १० लाख बीजांड असतात.या पैकी दर महिन्याला काही डझन बीजांडे(या बीजांडात फलनशील स्त्री बीज असते) वाढीला लागतात यापैकी फक्त एकच स्त्रीबीज पूर्ण वाढ होते आणि जर त्याचे पुरुष बीजाशी मिलन झाले तर मुल जन्माला येते. चुकून जर २ बीजे वाढली तर जुळे होते हि शक्यता दोनशे पन्नास मध्ये एक अशी असते.
कनिष्ठ प्राणी ( कुत्रे मांजरी इत्यादी) मध्ये ५ ते ६ बीजांची वाढ होते म्हणून म्हणून त्यांना एका वेळी ५-६ पिल्ले होतात.
मानव किंवा सस्तन प्राण्यामध्ये पिल्लांना जन्म दिला जातो आणि पक्षांमध्ये फलन झालेली अंडी " घातली"जातात. कोंबडी दरदिवशी एक अंडे देते आणि अशी १२ ते १३ अंडी घातल्यावर कोंबडी ती उबवायला बसते. आणि या काळात कोंबडी परत अंडी घालत नाही( खुडूक बसली). पण पोल्ट्री फार्म मध्ये पिंजर्यात बसलेल्या कोंबडीची अंडी काढून घेतली जातात आणि ती अंडी देत राहते. अशी एक ते दीड वर्ष अंडी घातल्यावर त्या कोंबडीची अंडी घालण्याची शक्ती कमी होते आणि हळूहळू ती अंडी देणे बंद करते. या वेळेपर्यंत कोंडीची पिसे झडून जातात हाडे पण ठिसूळ होतात( अंडी घालून हाडातील कैल्शियम कमी होते) आणि ती कोंबडी २ वर्षापर्यंत मरते कोंबडीचे नैसर्गिक आयुष्य ७ वर्षे आहे. अर्थात या पूर्वीच तिला मारून तिच्या मासाचे प्रक्रिया केलेल्या अन्नात किंवा चिकन सूपमध्ये स्वादासाठी वापरले जाते.(हाडे ठिसूळ झाल्याने कोंबडीचे वजन कमी होते आणि तिला भाव कमी मिळतो म्हणून). काही देशात कोंबडीला ७ ते १ ४ दिवस उपाशी ठेवले जाते ज्यामुळे ती परत अंडी घालू लागते.कोंबडी अशा तर्हेने जास्तीत जास्त चारशे ते पाचशे अंडी देऊ शकते आणि तिची जीवनयात्रा संपते( संपविली जाते)
मानवी आयुष्यात १४ वर्षे ते ५० वर्षे ( रजोदर्शन ते रजोनिवृत्ती) अशा ३६ वर्षात जास्तीत जास्त ४००-४५० स्त्री बीजांडाची पूर्ण वाढ होऊ शकते. बाकी स्त्रीबीजांडे फुकट जातात. रजोनिवृत्तीच्या वेळेस बीजांड कोशातील सर्व बीजांडे नष्ट झालेली किंवा र्हास पावलेली असतात.
अकाली रजोनिवृत्तीमध्ये सुद्धा अशीच स्त्री बीजांडे नष्ट झालेली असतात त्यामुळे त्याला होमियोपाथी किंवा योगासनांनी फायदा होईल अशी शक्यता फारच कमी आहे.(TOI च्या लेखात म्हटल्याप्रमाणे). बर्याच वेळेला पाळी काही महिने आलेली नसताना हि अकाली रजोनिवृत्ती आहे असा शिक्का मारला जातो. मग असे इतर उपचार केलुयावर नैसर्गिक रित्या पाळी परत आली कि त्याचे श्रेय घेऊन हे लोक मोकळे होतात. मुळात सोनोग्राफी करून आणि संप्रेरकाची रक्तातील पातळी पाहून जर निदान पक्के केले असेल तरच अशा दाव्यांना अर्थ आहे. पोकळ दावे करण्यात काय हशील( पण तो धंद्याचा भाग आहे)आज काळ या इतर लोकांचीच चलती आहे.
आता आणखी एक प्रश्न आहे:
सध्या उपलब्ध इमेजिंग तंत्रज्ञानातून "रजोनिवृत्तीच्या वेळेस बीजांड कोशातील सर्व बीजांडे नष्ट झालेली किंवा र्हास पावलेली असतात." हे बघितलेलं आहे का हॉर्मोन्स इत्यादी अप्रत्यक्ष प्रकारे हे ठरवलं जातं. (सामान्य वयात, ४० च्या पुढे कधीही रजोनिवृत्ती आल्यास अशा प्रकारच्या तपासण्या होत नसतीलही. पण अकाली रजोनिवृत्ती आल्यास, प्रसिद्ध उदाहरण इरोम शर्मिला, काय प्रकारच्या चाचण्या होतात?)
या प्रश्नांची उत्तरं प्रतिसादामधे दिलीत तरी त्याचा एक स्वतंत्र धागा बनवलात तरी चालेल. भविष्यात वाचन, संदर्भाच्या दृष्टीने ते कदाचित सोपं पडेल.
संपादकांना विनंती - मागच्या-पुढच्या सगळ्या धाग्यांमधे या संदर्भातल्या डॉक्टरांच्या सगळ्या धाग्यांच्या लिंका देता येतील का? गुगलून एक लिंक शोधली की बाकीचे सगळे धागे शोधाशोध केल्याशिवाय सापडतील.
रजोनिवृत्तीहोते म्हणजे बीजांड कोश मेंदूत तयार होणार्या संप्रेरकांना(FSH आणि LH) दाद देत नाही कारण त्यात विकास पावू शकणारी बीजांडे शिल्लक नसतात. यामुळे मेंदू ती संप्रेरके अधिक प्रमाणात तयार करतो. अधिक संप्रेरके करूनही बीजांड कोश त्याला दाद देत नाही म्हणून मेंदू ती संप्रेरके अजून अधिक प्रमाणात तयार करतो. आपण जेंव्हा रक्त तपासणी करतो तेंव्हा हि संप्रेरके आपल्याला रक्तात एका विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त आढळतात यावरून आपण हे निदान करतो कि आता रजोनिवृत्ती झाली. जेंव्हा आपण सोनोग्राफी ( किंवा MRI) करतो तेंव्हा हि स्त्री बीजांडे आपल्याला दिसू शकतात आणि बिजान्द्कोशाचा आकार एका विशिष्ट पातळीत असतो. रजोनिवृत्ती झाल्यावर हि स्त्रीबीजे दिसत नाहीत आणि बीजांड कोशाचा आकार फारच कमी झालेला असतो यावरून आपल्याला निदाम करता येते क रजोनिवृत्ती झाली आहे.
अजून एक संप्रेरक (AMH - anti mullerian hormone) हे (बिजान्द्कोशात) बीजांडात तयार होते आणि हे बिजान्डांच्या संख्येवर अवलंबून असते.रजोनिवृत्ती बरोबर याचे रक्तातील प्रमाण खूप कमी होते. AMH चे रक्तातील प्रमाण पहिले असता आपल्याला बिजाण्ड कोशात किती स्त्रीबिजांडे शिल्लक आहेत. ( ovarian reserve) किती आहे ते कळतो. याचा उपयोग आजच्या काळातील महला ज्या आपल्या करियर साठी उशिरा लग्न करतात त्यांना आपण आपल्याला मुल होऊ द्यायचे कि किती थांबता येईल हे ठरविण्यासाठी करता येतो. (जर याची रक्तातील पातळी कमी झाली असेल ovarian reserve कमी आहे आणि रजोनिवृत्ती जवळ आली आहे हे समजते) डॉक्टर त्या महिलांना लवकर गरोदर होण्याचा सल्ला देतात.अर्थात सर्व साधारणपणे डॉक्टर खात्री करण्यासाठी रक्त तपासणी आणि सोनोग्राफी या दोन्ही चाचण्या करून घेतात९ या दोन्ही चाचण्या एकमेकांना पूरक असतात. कारण आपली रजोनिवृत्ती अकाली झाली आहे हा त्या स्त्री च्या दृष्टीने एक धक्का असतो.
या धाग्यावरचे हे प्रतिसाद एकत्र करून एक नवा धागा, भविष्यातल्या संदर्भासाठी बनवाल का?
उस गोड लागला ... असं तुम्ही मनात म्हणत असाल तर थोडी नावं ठेवा मला! ;-)
प्रतिक्रिया
केमिकल लोच्या
दोन्ही भागा मधिल साद
हा लेख जास्त आवडला आहे.
अरे हो मला एक प्रश्न
योगा सोडुन बाकी कुठलाहि
धन्यवाद.
काही काय?
योगा नाहि चालत मासिक पाळी
तुम्हाला कोणी सांगितलं? जो
आम्हाला आमच्या योगाच्या बाइनी
टँपॉन सङळ्यानाच सुट होत नाहि
थोडक्यात जे झेपेल तेच करा
इगो??
आणि आधाराचं म्हणाल तं
मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम
जे ब्बात!
छान लेख
एच आर टी चे साइड इफेक्ट्स खुप
हार्मोन्स प्रॉब्लेम्सवर रामबाण उपाय
नैराश्य( depression) आहे कि
बयो...
अदिती -
लक्ष वेधून घेणे(attention
hot flashes याऐवजी hot
जब्री माहिती....
एकमेका साहाय्य करू....
छान प्रतिसाद..
पेठकरांचा प्रतिसाद विषयाकडे अत्यंत समग्र आणि योग्य दिशेने पाहतो
सहमत
वाचतो आहे. समजून घेतो आहे.
खरे डॉक्टरसाहेबांना अनाहिता
खरे डॉक्टरसाहेबांना अनाहिता विभागाचे मानद सभासदत्व मिळावेआता हा कोणता नवीन विभाग..??हा भाग व प्रतिसाद वाचनिय.
छान लेख आणि चर्चा
ऋतुप्राप्ती
सुबोधजी
स्री देह पुरूष देहाला आकर्षित
तु यांचे प्रतिसाद वाचतेस
शिल्पा, मयत रि कर्न्र क?
हा हा
HRT HORMONE REPLACEMENT THERAPY
अकाली रजोनिवृत्ती
भाषेतली पुरुषप्रधानता
डॉक्टरंनी उत्तर दिले आहे
प्रश्न
मुलगी जन्माला येतानाच तिच्या
माहितीपूर्ण पोस्ट.
धन्यवाद
अदिती ताई
माहितीपूर्ण प्रतिसाद
एक शंका
Pagination