ज्या वयात स्त्रीची रजोनिवृत्ती येते त्याच काळात पुरुषाचे पोट सुटणे, टक्कल पडणे, चष्मा येणे इ. घडत असते. त्यालाही हे सर्व जाणून वाईट वाटत असते पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतो. मग स्त्रीया त्यांच्या शरीरातील बदल 'निसर्ग नियम' ह्या विचाराने का स्विकारू शकत नाहीत? आपल्या वागण्याने, चिडचिड करण्याने सर्व संसाराची राखरांगोळी होते आहे हे पाहूनही समंजसपणा दाखवून, नवर्याशी बोलून ह्यावर उपाययोजना का करीत नाहीत. ह्याच काळात पुरूषाला त्याच्या (व्यवसाय) निवृत्तीचे वेध लागलेले असतात. निवृत्ती काळातील आर्थिक गणितांनी तोही व्यथित, चिंतित असतो. त्याच्या सहनशक्तीची पातळीही, महागाईशी झुंजता झुंजता, उतरणीला लागलेली असते त्यात निवृत्तीकाळातील समस्यांची चिंता ह्या सर्वांशी एकांगी लढणार्या त्याच्या कडून 'पत्नीला, तिच्या शारीरीक बदलाला समजून घेण्याची' अपेक्षा करणं म्हणजे त्याच्या दुर्बल खांद्यावर अतिरिक्त भार टाकण्यासारखे आहे. अशा वयात दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहीजे, एकमेकांना भावनिक आधार दिला पाहीजे आणि चर्चेतून समस्येची धार बोथट केली पाहीजे.
शब्दांना अतिशय धार असते. धारदार शब्दांचा बेबंद वापर (शारीरीक बदलामुळे)केल्याने नाती कायमस्वरुपी तुटतात. अशा वयात विधायक वाचन आणि डॉक्टरांची मदत घेतल्यास आयुष्यातील हे वळणही पार करताना जास्त कठीण जाऊ नये.
माझ्या संपूर्ण प्रतिसादावर विचार केल्यास तो एकांगी वाटणार नाही.
स्त्रीया त्यांच्या शरीरातील बदल 'निसर्ग नियम' ह्या विचाराने का स्विकारू शकत नाहीत?
ह्या वाक्यातून मला स्त्रीयांच्या अशा काळातील वागण्यावर सखोल चर्चा घडावी अशी अपेक्षा आहे.
आपल्या वागण्याने, चिडचिड करण्याने सर्व संसाराची राखरांगोळी होते आहे हे पाहूनही समंजसपणा दाखवून, नवर्याशी बोलून ह्यावर उपाययोजना का करीत नाहीत.
स्त्रीयांच्या शारीरीक आणि मानसिक बदलांबद्दल नोंद घेऊनच ह्यावर नवर्याशी चर्चा करण्याचा, शांतपणे बोलून समस्या सोडविण्याचा विचार मांडला आहे.
ह्याच काळात पुरूषाला त्याच्या (व्यवसाय) निवृत्तीचे वेध लागलेले असतात. निवृत्ती काळातील आर्थिक गणितांनी तोही व्यथित, चिंतित असतो. त्याच्या सहनशक्तीची पातळीही, महागाईशी झुंजता झुंजता, उतरणीला लागलेली असते त्यात निवृत्तीकाळातील समस्यांची चिंता ह्या सर्वांशी एकांगी लढणार्या त्याच्या कडून 'पत्नीला, तिच्या शारीरीक बदलाला समजून घेण्याची' अपेक्षा करणं म्हणजे त्याच्या दुर्बल खांद्यावर अतिरिक्त भार टाकण्यासारखे आहे.
पुरुषाची ह्या वयातील मानसिक अवस्था विशद करण्याचा एक क्षीण प्रयत्न केला आहे. ह्या व्यतिरि़क्तही अनेक भावभावनांना तोही सामोरा जात असतोच. त्यामुळे 'नवर्याने समजून घेतले पाहिजे' असा विचार न करता, त्याच्या एकट्याच्या खांद्यावर बोजा न टाकता हा भावनिक बोजा दोघांनीही उचलून समस्या निवारण केले पाहिजे.
अशा वयात दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहीजे, एकमेकांना भावनिक आधार दिला पाहीजे आणि चर्चेतून समस्येची धार बोथट केली पाहीजे.
ह्या विचारातही दोघांनाही स्थान आहे. दोघांच्याही गरजेचा विचार केला आहे. एक्मेकांनी एकमेकांचे समुपदेशन करून धीर, आधार दिला पाहिजे.
शब्दांना अतिशय धार असते. धारदार शब्दांचा बेबंद वापर (शारीरीक बदलामुळे)केल्याने नाती कायमस्वरुपी तुटतात. अशा वयात विधायक वाचन आणि डॉक्टरांची मदत घेतल्यास आयुष्यातील हे वळणही पार करताना जास्त कठीण जाऊ नये.
जेंव्हा आपल्याला समुपदेश जमण्यासारखे नसते तेंव्हा तज्ञांची (डॉक्टरची) मदत घ्यावी, विधायक वाचन करावे. असे सुचविले आहे.
ज्या प्रतिसादात दोघांचाही विचार मांडला आहे. तो एकांगी कसा?
मला वाटते की स्त्रीच्या बाबतीत हार्मोनल इफेक्ट जास्त असावा (घरात आणि आजुबाजूला पाहिलेल्या या वयातून स्थित्यंतर केलेल्या स्त्रियांबाबत पाहता). (अद्याप अनुभव नसला तरी, पुन्हा एकदा, निरिक्षणानेच) पुरुषांनाही या काळात जरुर बदलाला सामोरं जावं लागतं पण जनरली आपण पुरुष "कमावणे" हा भाग सोडला तर बर्यापैकी आरामात जगतो असं माझं मत आहे (ऑफिसचे कष्ट वेगळे.. मी रोजच्या घरातल्या तापत्रयींविषयी म्हणतो आहे).
बायका घरात किरकोळ वाटणारी पण तितकीच कष्टाची कामं करुन करुन जास्त इरिटेट होत असाव्यात आणि त्यात भर म्हणजे बहुधा हा थँकलेस जॉब असतो. पुरुषांच्या "ऑफिशियल" कामाप्रमाणे या घरच्या कामाची पोचपावती अजिबात मिळत नाही. त्यामुळे उपरोल्लेखित लेखातल्या वयोगटात स्त्रिया जास्त वेंगत असाव्यात, जे साहजिक आहे. बाकी हार्मोनल इफेक्ट पुरुषांपेक्षा स्त्रियांमधे जास्त प्रखर, अधिक जाणवणारा, दृश्यमान असतो हाही एक फरक असणार. हा मुद्दा सत्य किंवा कसे ते डॉक्टरच ते खात्रीपूर्वक सांगू शकतील.
बाकी वयानुसार तुम्ही जास्त आयुष्य पाहिलेलं आहे. या प्रतिसादात फक्त माख्या मनात असलेली शक्यता बोलून दाखवली.
ज्या वयात स्त्रीची रजोनिवृत्ती येते त्याच काळात पुरुषाचे पोट सुटणे, टक्कल पडणे, चष्मा येणे इ. घडत असते. त्यालाही हे सर्व जाणून वाईट वाटत असते पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या विचाराने सर्व काही स्विकारतो. मग स्त्रीया त्यांच्या शरीरातील बदल 'निसर्ग नियम' ह्या विचाराने का स्विकारू शकत नाहीत?
पेठकरकाका, पुरुष निसर्गनियमानुसार सर्व काही स्वीकारतात, असं खरंच वाटतं तुम्हांला? आणि स्त्रिया स्वीकारत नाहीत हा निष्कर्ष तुम्ही कुठून काढलात?
आपल्या वागण्याने, चिडचिड करण्याने सर्व संसाराची राखरांगोळी होते आहे हे पाहूनही समंजसपणा दाखवून, नवर्याशी बोलून ह्यावर उपाययोजना का करीत नाहीत.
अजून एक गृहितक. अजून एक निष्कर्ष. घर+ ऑफिस = काम + काम हे अनेक स्त्रियांसाठीचे आजचे वास्तव आहे. पुरुष जरी घराबाहेर काम करत असला, तरीही आजही बर्याच घरांतून घरी आल्यावर त्याच्या पदरी आराम पडतो, तेच स्त्रीला पुन्हा एकदा कामासाठी कंबर उभे रहावेच लागते. तिची थकण्याची पातळी अधिक असू शकेल हे तरी तुम्हांला मान्य आहे का? सतत हेच आयुष्य असेल तर हळूहळू वार्धक्याकडे झुकताना तिची अधिक चिडचिड होणं पर्याप्त नाही का?
ह्याच काळात पुरूषाला त्याच्या (व्यवसाय) निवृत्तीचे वेध लागलेले असतात. निवृत्ती काळातील आर्थिक गणितांनी तोही व्यथित, चिंतित असतो. त्याच्या सहनशक्तीची पातळीही, महागाईशी झुंजता झुंजता, उतरणीला लागलेली असते त्यात निवृत्तीकाळातील समस्यांची चिंता ह्या सर्वांशी एकांगी लढणार्या त्याच्या कडून 'पत्नीला, तिच्या शारीरीक बदलाला समजून घेण्याची' अपेक्षा करणं म्हणजे त्याच्या दुर्बल खांद्यावर अतिरिक्त भार टाकण्यासारखे आहे.
स्त्रिया आर्थिक भार उचलत नाहीत? बर्याच मध्यमवर्गीय आणि निम्न मधयमवर्गीय घरांतून स्त्रियाही घरात पगार आणत असल्याने राहणीमानाचा स्तर उंचावला आहे, हे विसरता येईल का? स्त्रियांना आर्थिक विवंचना नसतात हे तुम्हांला कोणी सांगितले? एकीकडे म्हणता की नवर्याशी चर्चा करुन मार्ग काढावा आणि पुढे म्हणता की त्याच्या दुर्बल खांद्यांवर भार टाकू नये? मग जर नवराच स्त्रीच्या शरीरात, मनात घडणारे बदल समजून घेणं ह्याला "भार" समजणार असेल तर बोलणंच खुंटलं की! इतर कोणाकडून अपेक्षाच करायला नको.
अशा वयात दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहीजे, एकमेकांना भावनिक आधार दिला पाहीजे आणि चर्चेतून समस्येची धार बोथट केली पाहीजे.
नक्कीच पण जर समजून घेण्याला भार समजले तर हे होणार कसे?
शब्दांना अतिशय धार असते. धारदार शब्दांचा बेबंद वापर (शारीरीक बदलामुळे)केल्याने नाती कायमस्वरुपी तुटतात. अशा वयात विधायक विधायक वाचन आणि डॉक्टरांची मदत घेतल्यास आयुष्यातील हे वळणही पार करताना जास्त कठीण जाऊ नये.
हे दोघांनाही लागू आहे, जितके स्त्रीला तितकेच पुरुषांनाही. केवळ स्त्रियांना नव्हे इतके लक्षात ठेवले तरी खूप झाले.
स्नेहांकिता आणि गवि ह्यांच्या प्रतिसादांना +१
पुरुष निसर्गनियमानुसार सर्व काही स्वीकारतात, असं खरंच वाटतं तुम्हांला?
सर्वच पुरुष सर्व काही स्विकारत नसले तरी बरेच पुरुष बरंच काही स्विकारतात, हे माझे वैयक्तिक निरिक्षण आहे.
आणि स्त्रिया स्वीकारत नाहीत हा निष्कर्ष तुम्ही कुठून काढलात?
हा निष्कर्ष मी काढलेला नाही. मुळ धाग्यात डॉक्टरसाहेबांचे विधान आहे, रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपण म्हातारे होणार आणि सुंदर राहणार नाही, आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार आणि आपली कांती पूर्वीसारखी राहणार नाही या दडपणाखाली त्यांचे मानसिक आयुष्य उलथापालथ होते.
.........सतत हेच आयुष्य असेल तर हळूहळू वार्धक्याकडे झुकताना तिची अधिक चिडचिड होणं पर्याप्त नाही का?
चिडचिड होणे (शारीरीक बदलामुळे) हे मी कुठे नाकारले आहे?
माझे म्हणणे एवढेच आहे की पुरूष म्हणून कदाचित नवर्याला ह्या शारीरीक बदलांची संपूर्ण माहीती नसू शकते तेंव्हा त्याच्याशी बोलून, चर्चा करून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करावा. ह्यात मी गैर असे काय सुचविले आहे?
स्त्रिया आर्थिक भार उचलत नाहीत?
हे स्त्रियांच्या शारीरिक बदलाच्या विषयाला सोडून होते आहे. स्त्रियांच्या रजोनिवृत्तीसमयी होणार्या शारीरीक/मानसिक्/भावनिक बदलांमुळे उद्भवणार्या समस्यांवर स्त्रियांच्या बाजूने मुद्दे मांडताना त्याच काळात पुरुषाचेही कांही प्रश्न निर्माण झालेले असतात त्याचा विशेष उल्लेख डॉक्टरसाहेबांच्या लिखाणात आढळला नाही तेंव्हा हा मुद्दाही सर्व सदस्यांनी विचारात घ्यावा आणि साधक-बाधक चर्चा करावी असे मला अपेक्षित आहे.
एकीकडे म्हणता की नवर्याशी चर्चा करुन मार्ग काढावा आणि पुढे म्हणता की त्याच्या दुर्बल खांद्यांवर भार टाकू नये? मग जर नवराच स्त्रीच्या शरीरात, मनात घडणारे बदल समजून घेणं ह्याला "भार" समजणार असेल तर बोलणंच खुंटलं की!
कुठलीही चर्चा, सल्लामसलत, तज्ञांचे मार्गदर्शन न घेता 'माझ्या रजोनिवृत्तीचा काळ आहे तेंव्हा मी जे कांही वागेन, बोलेन ते मनावर न घेता मला सगळ्यांनी, विशेषतः नवर्याने, समजून घ्यावे' ह्या समजूतीला मी, तोही कांही विशिष्ट समस्यांना तोंड देत असताना, नवर्याच्या खांद्यावर अतिरिक्त भार टा़कणे म्हणतो आहे. चर्चेला नक्कीच वाव आहे. चर्चा, सल्ला मसलत, तज्ञांचे मार्गदर्शन ह्या मार्गाने जाण्यास मी 'भार टाकणे' म्हणत नाहीए.
नक्कीच पण जर समजून घेण्याला भार समजले तर हे होणार कसे?
वर म्हंटल्याप्रमाणे, चर्चेविना, सल्याविना, तज्ञांच्या मार्गदर्शनाविना 'नुसते समजून घेणे' अपेक्षिणे हा भारच आहे.
हे दोघांनाही लागू आहे, जितके स्त्रीला तितकेच पुरुषांनाही. केवळ स्त्रियांना नव्हे इतके लक्षात ठेवले तरी खूप झाले.
पुन्हा विषयाला सोडून होते आहे हे. पुन्हा सांगतो विषय असा आहे की, 'रजोनिवृतीसमयी स्त्रीच्या शारीरीक, मानसिक आणि भावनिक बदलांमूळे येणार्या समस्या.' हे सर्व स्त्री बद्दलच असल्याने माझ्या प्रतिसादातील माझे विधान फक्त स्त्रियांना (आणि तेही रजोनिवृत्ती काळातील) लागू आहे.
इतर वेळी ते दोघांनाच नाही तर घरातील सर्वांनाच (आई, वडील, नवरा, बायको, बहीण, भाऊ, सासू, सासरे, मुले, इ.इ.इ.) लागू आहे. अगदी मिसळपाववरील सर्व सदस्यांनाही.
अत्यंत, महत्त्वाचा आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यावर निकोप चर्चा व्हावी ह्या उद्देशाने मी पुरुषांच्यावतीने काही मुद्दे मांडले होते. स्त्री-पुरुष वेगळेपणा, स्वभाव विशेष किंवा दोघांपैकी एकाला कमी वगैरे लेखण्याचा माझा उद्देश नाही. मुद्दाम आगी लावण्यासाठी बेछूट विधाने करण्याचे उद्योग मी करीत नाही. पण माझ्या हेतूंबद्द्ल शंका असेल तर संपादक मंडळाने माझे सर्व प्रतिसाद संपादीत करावेत. माझी काही हरकत नाही.
सॉरी यशोधरा,
हे तुला उद्देशून नाही. पण ह्याच धाग्यावर 'काही प्रतिसाद याला स्त्री विरुद्ध पुरुष असे स्वरुप देउ पहातात.' असा आरोप दिसला म्हणून माझ्याकडून ते स्पष्टीकरण दिलेले आहे.
पण ह्याच धाग्यावर 'काही प्रतिसाद याला स्त्री विरुद्ध पुरुष असे स्वरुप देउ पहातात.' असा आरोप दिसला
हे माझ्या एका चारोळी प्रतिसादातील विधान आहे. आरोप नव्हे.आपले मत दर्शवणारे एखादे विधान म्हणजे आरोप म्हणता येणार नाही.ते विधान म्हणजे त्रिकालाबाधित सत्य असेही म्हणता येणार नाही. एखादे मतभिन्नता दर्शवणारे विधान म्हणजे सुद्धा आरोप नव्हे.सार्वजनिक व्यासपीठावर अशी अनेक विधाने होत असतात.प्रत्येक विधान हा फार गांभीर्यानेच केलेले असते अशातला अजिबात भाग नाही.
दुसरी गोष्ट अशी आपण या विधानाशी सहमत नाही असे विधान आपण करु शकता!
तिसरी गोष्ट अशी की या धाग्यावरील आपल्या प्रतिसादाशी मी बहुतांशी सहमत आहे.
चौथी गोष्ट अशी स्त्री पुरुष वर्तनाबाबत मी निरंजन घाटयांच्या पुस्तकाची लिंक एका प्रतिसादात दिली आहे. कोणी पुस्तक वाचले असल्यास तो काही मत देउ शकेल.
घाटपांडे साहेब,
ह्या विषयावर आपले मत, व्यनितून, आधीच कळले आहे. फक्त त्या विधानामुळे कोणाचा कांही गैरसमज झाला असेल तर तो दूर व्हावा म्हणून माझ्या प्रतिसादाच्या तळाशी त्या ओळी टाकल्या आहेत.
(तुम्हाला हे व्यनितून कळविणार होतोच तेवढ्यात हा प्रतिसाद आला, असो.)
धन्यवाद्.
स्त्री मुद्दाम चिडचिड करत नसावी .... हे बदल सुद्धा " निसर्ग नियम " असावेत ...
ती नवर्याला " मला समजुन घे " अशी जबरदस्तीही करत नसावी ...
नवर्याचं ते कर्तव्य असावं ....
कबूल आहे पूरुष टक्कल , पोट सुटणं या गोष्टिंकडे दुर्लक्ष करतो ... पण तसं करायला स्त्री त्याला
नक्कीच सांगत नाहि ... त्याने लक्ष द्यायला हवं पण चालढकल करणे हाच पूरुषाचा
मुळ स्वभाव आहे याला स्त्री काय करणार ???
पूरुषाला निव्रुत्तीचे वेध लागतात ... पण स्त्रीयाना निव्रुत्ती कुठे मिळते ?? सुब्बु काका म्ह्नतात
त्याप्रमाणे संप्रेरके ही स्त्रीयांत होणार्या मानसिक बदलाला कारणीभुत असतात ..
मग स्त्री मुद्दमहुन संसाराची राखरांगोळी करतेय हे म्हणणं कितपत योग्य???
स्त्री मुद्दाम चिडचिड करत नसावी .... हे बदल सुद्धा " निसर्ग नियम " असावेत ...
बदल हे 'निसर्ग नियमाने' होतात. त्यांना स्विकारणे हे परिपक्वतेचे लक्षण आहे.
ती नवर्याला " मला समजुन घे " अशी जबरदस्तीही करत नसावी ...
नवर्याचं ते कर्तव्य असावं ....
हेच म्हणतो मी. एकदा 'कर्तव्याचे' लेबल लावले की त्याने ते केलेच पाहिजे ही जबरदस्ती असते.
कबूल आहे पूरुष टक्कल , पोट सुटणं या गोष्टिंकडे दुर्लक्ष करतो ... पण तसं करायला स्त्री त्याला
नक्कीच सांगत नाहि ...
मी कुठे म्हंटल आहे की तसं करायला स्त्री त्याला सांगत असते म्हणून?
त्याने लक्ष द्यायला हवं पण चालढकल करणे हाच पूरुषाचा
मुळ स्वभाव आहे याला स्त्री काय करणार ???
सगळ्या पुरुषांचा 'चालढकल करणे' हा मूळ स्वभाव असतो?
पूरुषाला निव्रुत्तीचे वेध लागतात ... पण स्त्रीयाना निव्रुत्ती कुठे मिळते ??
हा वेगळा विषय आहे. त्यावर वेगळी चर्चा घडू शकते.
त्याप्रमाणे संप्रेरके ही स्त्रीयांत होणार्या मानसिक बदलाला कारणीभुत असतात ..
मग स्त्री मुद्दमहुन संसाराची राखरांगोळी करतेय हे म्हणणं कितपत योग्य???
सर्व स्त्रीया करतातच असे मी म्हणत नाहीए. पण अशा केसेसही असतात. शारीरिक बदलांना न स्विकारणे, 'आपण आजन्म तरूण राहणार आहोत' हा भ्रम, आजूबाजूच्या स्त्रियांशी संवाद न करणं आणि आपलाच हेका चालवणं ह्या गोष्टी आपल्या संसारासाठी घातक आहेत ह्याची जाणीव ठेवल्यास आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केल्यास 'राखरांगोळी' टाळता येते. 'राखरांगोळी' हा शब्द टाळता येईल पण 'संसारसुखाची होणारी पराकोटीची हानी' असा शब्दप्रयोग केला तरी ते घटीत टाळता आल्यास जास्त चांगले.
------------------------------------------------------------------------------
...रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपण म्हातारे होणार आणि सुंदर राहणार नाही, आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार आणि आपली कांती पूर्वीसारखी राहणार नाही या दडपणाखाली त्यांचे मानसिक आयुष्य उलथा पालथ होते....
....आपले वाढते वय साजरे करावे असे कोणाही स्त्रीला वाटत नाही.....
ह्यावर प्रत्येक स्त्रीने जरूर विचार करावा आणि अशी दडपणे आपल्या आयुष्यात येऊ नयेत म्हणून प्रयत्नशील राहावे.
पेठकरकाका, मला वाटते तुमच्या सगळ्यात पहिल्या प्रतिसादात खूप सरसकटीकरण आहे स्त्रियांविषयी, तसे वाटले नसते तर. मी लिहिलेच नसते तुमच्या प्रतिसादावर. इथेही वर तुम्ही विचारलेच आहे ना की सगळ्या पुरुषांचा चालढकल करण्याचा स्वभाव सतो का म्हणून, तुम्हांला प्रतिसादात सरसकटीकरण वाटल्याशिवाय का विचारले आहे? तसेच तुमच्या पहिल्या प्रतिसादातून ध्वनित होते आहे. (माझ्या वरच्या प्रतिसादात मी ते उदाहरणांसकट सांगितलेही आहे, तेह्वा पुन्हा तेच लिहित नाही) मात्र ह्या वाक्यांचा अपवाद जरुर आहे व ते मान्यही केले आहेच.-
अशा वयात दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहीजे, एकमेकांना भावनिक आधार दिला पाहीजे आणि चर्चेतून समस्येची धार बोथट केली पाहीजे.
पुरुषाला सहसा स्त्रीच्या तुलनेत मिळणारा आराम, स्त्रियांची घर, नोकरी ह्या दोन्ही आघाड्यांवर होणारी मानसिक व काही कालाने शारीरीक दमछाक आणि त्याची सहसा न घेतली जाणारी दखल, आर्थिक सहभाग देऊनही बर्याचदा त्याची कदर नसणं वा एकूणात घरामधील लोकांनी गृहीत धरल्याची भावना आणि तत्सम इतर गोष्टी ह्या सार्यांचा मानसिक परिणाम शरीरावर जाणवल्याशिवाय राहील का? तेह्वा हे सर्व एकमेकांत गुंतलेले विषय आहेत, एकापासून दुसारा असा वेगळा काढता येत नाही. तुम्ही पुरुषांना आर्थिक विवंचना असतात हे म्हणालात तेह्वा मी स्त्रिया आर्थिक भार उचलत नाहीत का हे विचारले आहे. तो विषय वेगळा कसा?
कुठलीही चर्चा, सल्लामसलत, तज्ञांचे मार्गदर्शन न घेता 'माझ्या रजोनिवृत्तीचा काळ आहे तेंव्हा मी जे कांही वागेन, बोलेन ते मनावर न घेता मला सगळ्यांनी, विशेषतः नवर्याने, समजून घ्यावे' ह्या समजूतीला
अशी का आणि कशाला समजूत असेल बरे स्त्रियांची? :) हा काही फार सुखद काळ असतो का त्यांच्यासाठी तरी?
'रजोनिवृतीसमयी स्त्रीच्या शारीरीक, मानसिक आणि भावनिक बदलांमूळे येणार्या समस्या' - ह्या समस्या एकदम येत नाहीत. हे वर्षानुवर्षे साचत रहत असते. त्रास होत असतो, काहीतरी अशा निमित्ताने तो बाहेर पडतो. असो.
माझ्या प्रतिसादात सरसकटीकरण दिसले असेल तर क्षमस्व.
स्त्रीया आर्थिक भार उचलतात हे मान्य आहेच. पण बहुतांश केसेस मध्ये त्यांचे उत्पन्न हे 'पुरक' म्हणून असते. ( म्हणून त्याचे महत्त्व कमी होते असे नाही.) पण घर चालविण्याची, आर्थिक प्रगतीची मुख्य जबाबदारी पुरुषावर असते. कुठे ह्याच्या उलट असेल तर त्या केस मध्ये स्त्रीवर आर्थिक विवंचनेचा भार अधिक असेल. दूसरे, आपली नोकरी गेली तरी 'कुटुंबाला आधार देणारा पुरुष खंबीर आहे' ही सुरक्षिततेची भावना स्त्रीच्या मनांत असते तर, पुरुषाची जबाबदारी अमर्याद असते. मुख्य असते. स्त्री इतकी सुरक्षित वर्तुळात नसते. त्याच्या उत्पन्नावर (असतील तर) आई-वडील, बायको, मुले, (कधी कधी) भावंडे इतके सर्व अवलंबून असतात. त्याच्या ह्या जबाबदारीस अर्थार्जन करून पत्नी हातभार लावत असते तरीही मुख्य आणि महत्त्वाची जबाबदारी त्याची असते. पण चर्चेसाठी हे फार व्यापक क्षेत्र आहे म्हणून ह्या चर्चेत तो विषय मुख्य विषयाला सोडून आहे असे मी म्हंटले आहे.
डॉक्टरसाहेबांचे, स्त्रीयांची मानसिक स्थिती विशद करताना पुरुषांच्याही त्या वयात काही मानसिक समस्या असतात ह्याकडे दुर्लक्ष झाल्यासारखे मला वाटले म्हणून मी पुरुषांची बाजू हलकेच मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात चुका असू शकतील. जसे, गृहीणी आणि नोकरदार स्त्री ह्यांच्या समस्या वेगवेगळ्या असू शकतात ह्या मुद्याकडे माझे अक्षम्य दुर्लक्ष झाले.
'रजोनिवृतीसमयी स्त्रीच्या शारीरीक, मानसिक आणि भावनिक बदलांमूळे येणार्या समस्या' - ह्या समस्या एकदम येत नाहीत. हे वर्षानुवर्षे साचत रहत असते. त्रास होत असतो, काहीतरी अशा निमित्ताने तो बाहेर पडतो.
म्हणूनच नवर्याशी संवाद महत्त्वाचा असे म्हणतो. संवादाने अशा भावनांचा निचरा होऊन अशा निमित्ताने 'एकदम' स्फोट होण्याचे टळेल असे माझे मत आहे.
पेठकर साहेब
आपण म्हणता तसे पुरुषांचे आपले गहन प्रश्न असतात. पण मी केवळ रजोनिवृत्ती हा विषय घेतला होता म्हणून पुरुषांचे प्रश्न त्यात विशद केले नाहीत.
पुढे मागे त्यावर सुद्धा एक जिलबी टाकावी काय या विचारात आहे.
वानगीदाखल--एशियन हार्ट इन्स्टीट्यूट मध्ये असताना एक सज्जन गृहस्थ रुग्ण म्हणून आले होते. ते अतिशय चिंतेत होते हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. हि बाब मी त्यांना विचारली तर त्यांचा बांध फुटला. डोळ्यात अश्रू आणून म्हणाले कि
मी बैंक ऑफ इंडिया मधून निवृत्त होणार आहे मला पेन्शन नाही( तेंव्हा नव्हते) काय मिळतील पैसे ते फंड आणि ग्राच्युईटी चे पैसे. पंचवीस तीस लाख मिळणार आहेत. पण मी माझ्या लग्न झालेल्या मुलाबरोबर एक बेडरूम च्या घरात राहतो. मुलगा म्हणतो आहे कि आपण हे घर विकून तुमच्या फंडाचे पैसे घालून एक दोन बेडरूम चे घर घेऊया.
आता मी अत्यंत तणावाखाली आहे. पैसे दिले तर आयुष्यभर मुलापुढे हात पसरावे लागणार आणि नाही दिले तर मुलगा दुखावला जातो. काय करणार?
माझ्याकडे उत्तर नव्हते शेवटी आपले भोग स्वतःलाच भोगावे लागतात हे खरे.
धन्यवाद खरे साहेब.
मन आहे त्याला/तिला मानसिक समस्या असणारच. त्यावर मिपासारख्या संस्थळावरून कांही समुपदेशन झाले तर सर्वांचाच फायदा होईल. मुले, मुली, स्त्री, पुरुष आणि तृतिय पंथी सर्वांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. निदान आपल्याला माहित असलेल्या समस्यांवर उद्बोधक चर्चा घडावी आणि मिपा ह्या सामुदायिक मंचाचे चिज व्हावे.
माणसाला जेव्हा जेव्हा वाटतं ना की त्याने "निसर्गावर" विजय मिळवला आहे तेव्हा तेव्हा फक्त हे लक्षात घ्यायचं की 'हार्मोन्स' (संप्रेरके) काय हॅवक माजवतात - मग ते ऐन पौगंडावस्थेत असो की मध्यम वयात असो. आपोआप नम्र होईल माणूस.
लेख छानच आहे. याचा दुसरा भाग हा येऊ द्या की डॉक्टर की यातून जाणे टळणार तर नाहीच पण ते सुसह्य व्हायला काय करता येईल. जसे मी वाचले आहे - वेट बेअरींग व्यायामा करुन "हाडांची घनता" वाढविणे, मल्टीव्हायटॅमिन्स नियमित घेणे वगैरे. हे मला सुचलेले व मी वाचलेले. पण बरेच कोणाला फारसे माहीत नसलेले असूही शकतात. हो आणखी एक - मी वाचले होते स्वीट पोटॅटो (रताळं बहुतेक) यात "बी" व्हायटॅमिन असते जे की मूड बूस्टींग असते. त्याचाही खूप फायदा होतो.
"ईस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोनच्या पूरक गोळ्या" असा काही उपाय नाहि वाटतं? अर्थात, १. हि दोन मुख्य, अजून बरेच फॅक्टर्स असतील/असतात व २. प्रत्येकाचा नेमका डोस निश्चित करणं कठीण असेल. पण सरसकट सगळ्याना नाही तरी जास्त त्रास असला तर याचा विचार केला जाऊ शकतो का?
काय गोळ्या वेग्रे घ्यायच्या ते डॉक्टरला विचारुनच घेतलेल्या बर्या नाहीतर तिसरंच कैतरी होउन बसायचं. हा हार्मोन प्रकार भयंकर त्रासदायक आहे खरा..प्रेग्नन्सी असो, पिरिएड्स असो नैतर अजुन कै !! शारीरीक अन मानसिक दोन्ही बाजुने त्रास होतो.
डॉक्टरांनी यावर कॉमन उपाय असतील ते सुचवावे.
चांगले दिसणे आणि चांगले राहणे( good looking and well groomed) हा एक स्त्री स्वभावाचा पैलू आहे.पुरुषांना आकर्षित करणे हा त्या व्यक्तिमत्त्वाचा एक छोटासा भाग आहे
याबाबतीत असहमती.
शिल्पा ब आणि यशोधरा यांच्या वर दिलेल्या प्रतिसादांना +१.
वरील सर्व दुवे एका अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण मालिकेकडे घेऊन जातात. माझ्या मनात एकच गोष्ट होती कि शारीरिक बदलांची माहिती विकी किंवा अशा माहितीपूर्ण लेखांद्वारे सर्वसामान्यपणे मिळते परंतु स्त्रीच्या मानसिक वावटळी बद्दल माहिती त्रोटक/ कमी प्रमाणात उपलब्ध आहे ( किंवा माहिती उपलब्ध असेल पण अज्ञानामुळे मला माहित नाही) यासाठीच मानसिक त्रासाबद्दल जास्त चर्चा करावी असे वाटल्याने मी हा लेख लिहिण्याचा उपद्व्याप केला आहे.
आपल्या माहिती(दुव्यान) बद्दल धन्यवाद
खरे साहेब, आपला लेख उत्तमच आहे. तसेच या विषयावर होईल ती चर्चा चांगलीच.
आपण मागे 'मॅमोग्राम" चा लेख लिहील्यानंतर , मी बराच काहीना काही कारणाने काळ रखडलेली अपॉइंट्मेंट घेतली.
तेव्हा अशा प्रकारचे लेख जरुर जरुर लिहा एवढेच म्हणेन.
खरे साहेब, आपला लेख उत्तमच आहे. तसेच या विषयावर होईल ती चर्चा चांगलीच.
आपण मागे 'मॅमोग्राम" चा लेख लिहील्यानंतर , मी बराच काहीना काही कारणाने काळ रखडलेली अपॉइंट्मेंट घेतली.
तेव्हा अशा प्रकारचे लेख जरुर जरुर लिहा एवढेच म्हणेन.
बारावीच्या जीवशास्त्राच्या अभ्यासक्रमातही मानवी पुनरूत्पादन संस्था (आणि बेडकाचं डिसेक्शन) शिकवलं जातं. (मी ९८ साली बारावी झाले तेव्हा होतं. मी लैच म्हातारी आहे; आता कदाचित काढलं असेल.) मूलभूत आणि तपशीलवार माहिती मायबोलीवरच्या या लेखांमधेही आहे. तेच पुन्हा टंकण्याचे श्रम तुम्ही घेण्यापेक्षा तुमच्या शिक्षण-अनुभवांमधून तुम्ही जे शिकला असाल ते अधिक उपयुक्त ठरेल.
दुसरं म्हणजे तुमचं वय-अनुभव आणि पुरुष असणं हे लक्षात घेता इथे आणि अशासारख्या ठिकाणी कान टोचण्यासाठी तुम्ही योग्य सोनार आहात असं वाटतं.
मायबोलीवरच्या या लेखांमधे सगळं सांगून झालंय असं मला वाटत नाही. दोन्हीकडचा टार्गेट ऑडियन्सही वेगवेगळ्या वृत्तीचा आहे. सगळं सांगून झालेलं असलं तरीही पाळीला अपवित्र समजणं, पाळी जाणं म्हणजे आता आपण स्त्री राहिलेलोच नाही असं समजणं, असे गैरसमज अजूनही आपल्या समाजातून पूर्णपणे हद्दपार झालेले नाही. (शहरी, तरूण मुलीही पाळी सुरू असताना देवळात जात नाहीत, त्यांच्या घरी रोजची देवपूजा होत नाही कारण या "अपवित्र असतात".) त्यामुळेही अशा विषयांवर पुनःपुन्हा चर्चा जरूर घडवून आणली पाहिजे.
हॉर्मोन्स स्त्रीच्या शरीराचा सदासर्वकाळ ताबा घेत नाहीत; स्त्री असण्याची वैज्ञानिक व्याख्या काय, अशासारखे प्रश्न सामाजिक बाबतीतही महत्त्वाचे आहेत. वात्सल्याविण नारी अपूर्ण वगैरे नसते, काही बायकांना नैसर्गिकतःच नटणं-मुरडणं, मुलांचा सांभाळ करण्यात काहीही रस नसतोच; अनेकींवर समाज, आई-वडील, कुटुंबीय या गोष्टी लादतात आणि काही स्त्रियांना पुरुषांमधेच रस नसतो, स्त्रियांमधेच असतो पण त्याही स्त्रियाच असतात अशासारख्या विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाची अपेक्षा या लिखाणातून आहे. (काही पुरुषही अतिशय आवडीने बालसंगोपन, स्वयंपाक, व्यवस्थित रहाणं - मेट्रोसेक्शुअल यात रस घेतात आणि ते पुरुषच असतात.)
अलिकडे मुली मोठ्या प्रमाणात अर्थार्जनच नाही, करियर करायला लागलेल्या आहेत. विसाव्या वर्षी हातात मूल असणार्या कमीच दिसतात. मोठ्या वयात मुलं होतात, रजोनिवृत्ती येते त्या वयात ही मुलं आईचं "आजारपण" समजण्याएवढी मोठीही नसतात आणि विभक्त कुटुंबांमधे मोठ्यांशी वाद न घालण्याची कडवी शिस्तही त्यांना लावली जात नाही. लेखाच्या शेवटी तुम्ही दिलेलं उदाहरण ठीकच, पण मग या कुटुंबियांनी रजोनिवृत्तीमुळे हैराण झालेल्या स्त्रीला कसं सांभाळून घ्यावं, तिच्याशी कसं वागावं अशा प्रकारचा सल्ला अधिक महत्त्वाचा आहे. या विषयातलं शिक्षण नसल्यामुळे, स्वतः कटकटीच्या रजोनिवृत्तीमधून गेलेल्या स्त्रियाही या प्रश्नांना कितपत उत्तरं देऊ शकतील याबद्दल मला शंका वाटते.
हे मला सुचलेले मुद्दे. तुमच्या अनुभवातून अजून बरंच काही येईल.
"आकाश निळं असतं" हे सामान्य मनुष्यही सांगू शकतो. त्यासाठी विज्ञान शिकण्याची आवश्यकता नसते. शिक्षित आणि अनुभवी व्यक्तीकडून आकाश निळंच का असतं आणि सूर्योदय-सूर्यास्ताला एवढे जास्त रंग-छटा का दिसतात या प्रकारच्या स्पष्टीकरणांची, सूचनांची अपेक्षा आहे.
उत्तम माहितीपूर्ण लेख. लेखाच्या शेवट क्रमशः वाचून बरे वाटले. या लक्षणांवर उपाय किंवा ती कमी करण्यासाठी काय करता येईल याबद्दलही कृपया लिहा. तसेच रजोनिवृत्तीनंतर काहीप्रकारच्या रोगांची शक्यता वाढते त्याबद्दलही लिहा. वाचायला आवडेल.
लेखकाचे नाव वाचून धागा उघडला, विक्रांत वादळात सापडली असे काही वाचायचे डोक्यात :-)
धागा उत्तम आहे. तरीच की काही हुशार नवरे कायम नवनवीन लग्ने करत बायकोचे सरासरी वय २० ते ४० मधे ठेवतात ;-)
आपल्या संसाराची गाडी समंजसपणावरच चालते हे पक्के ठाऊक आहे मला तरी या लेखमालेनंतर त्या काळात बायकोला जास्त समजून घेता येईल हे नक्की.. पुढचा भाग सावकाश अन सविस्तर येऊद्या.. वाचतोय.. :)
हल्ली* अनेकदा डॉक्टर मंडळींना रोगाची /आजाराची लक्षणं समजतात पण नेमकं निदान (आणि त्यामुळे उपचार) करता येत नाहीत - त्यामुळे अनेकदा उपचार हा प्रयोगात्मक राहतो...
याची आठवण आली हा लेख वाचताना; विशेषत:
आपण कधी एखाद्या स्त्री चा चाळीशीचा वा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा केलेला पहिला आहे काय?
यांसारखी वाक्यं वाचताना.
असो.
* म्हणजे पूर्वीही घडत असेल; किंवा कधीच घडले नसेल इतरांच्या बाबतीत - मी आपली माझ्या अनुभवावरुन सांगते आहे. इतर कुणाला यापेक्षा वेगळा अनुभव असेल हे मान्य आहे.
खुलासा?
खुलासा इतकाच की एखादं 'तथ्य' आपल्याला दिसतं तेव्हा त्यामागे अनेक सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी इत्यादी संदर्भ असतात. ते सगळे आपल्याला माहिती असू शकत नाहीत - ही आपली मर्यादा असते. पण ते बाजूला ठेवून सरसकट स्त्रियांबाबत विधानं होतात तेव्हा आश्चर्य वाटतं.
'स्त्रियांना आपलं वय लपवायची हौस असते' - हे काही स्त्रियांच्या बाबतीत खरं असेलही - पण ते सर्वांना कितपत लागू पडतं? तसंही मोठ्या (म्हणजे वयाने मोठ्या) माणसांचे वाढदिवस साजरे करणं ही प्रथा किती समाजघटकांमध्ये आहे? त्यातही जाहीरपणे - सार्वजनिक?
वगैरे वगैरे.
शास्त्रीय माहिती हा एक भाग झाला आणि त्या शास्त्रीय माहितीच्या आधारे समाजातील एखाद्या वर्गाबाबत, गटाबाबत (त्यात अनेक उपवर्ग, उपगट आहेत हे विसरुन) विधानं करणं हा दुसरा भाग.
माझ्याकडून या चर्चेला मी पूर्णविराम देते.
बहुतेक धाग्यांमध्ये आणि प्रतिसादानमध्ये स्त्रिया या जास्त Vulnerable (योग्य मराठी प्रतिशब्द माहीत नाही) आहेत आणि त्यांची कशी काळजी घ्यायला हवी असा एक सूर आढळतो. बघायला गेला तर पुरूष पण तेवढाच Vulnerable असतो. पण मर्द को दर्द नही होता सिंड्रोम इथे जास्त काम करत असावा. बाकी लेख उत्तमच
अमोल साहेब,
स्त्रियांची जशी रजोनिवृत्ती होते (menopause) तसा पुरुषांचा andropause होतो. फरक एवढाच आहे कि स्त्रियांमध्ये हा बदल १ ते २ वर्षात होतो आणि पुरुषात हा बदल दहा ते बारा वर्षात होतो. शिवाय स्त्री आणि पुरुषात मूळ फरक असा कि पुरुष आपला प्रश्न तोंड मिटून सोडवण्याचा प्रयत्न करतो तेच स्त्री आपला प्रश्न तोंड उघडून सोडवण्याचा प्रयत्न करते. एकाच स्थिती चा उपाय दोघे वेगवेगळ्या तर्हेने करण्याचा प्रयत्न करतात.
vulnerable- असुरक्षित किंवा हळव्या जमतोय का पहा
मग तोंड दाबून होणारा कोंडमारा हा पण तेवढाच मोठा प्रश्न. तोंड मोकळे सोडल्याने किमान भावनांचा निचरा तरी होतो. अर्थात अशी ही तुलना करणे हा या धाग्याचा उद्देश नसावा. धागा हाइजॅक होऊ नये पण पुरुषांचा बीभत्स कोंडमारा यावर पण काही लिहा तुमच्या अनुभवांचा वापर करून ही विनंती.
याचा अनुभव मलाही आला आहे व त्यावरील उत्तरही असेच मिळाले आहे. निसर्गनियमाने या गोष्टी होत असतात. पण याचा त्रास होतो हे नक्की व तो टाळण्याजोगा नसतो हेही खरेच. यापासून कोणाचीही सुटका होणार नाहि. आपण आपल्या परीने परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे वादविवाद होत नाहित. मुख्य म्हणजे स्त्रीने जर स्वतःला कुठल्यातरी कामात गुंतवून घेतले तर हा त्रास कमी होईल. माझ्या पत्नीने हार्मोनियमचा क्लास लावला. ती शिकत आहे. भिशी तसेच भजनी मंडळात जाते. त्यांचे सतत कुठेनाकुठे कार्यक्रम असतात. त्यांची ठरवाठरव, कार्यक्रमाची पूर्वतयारी इत्यादी मध्ये इतका वेळ जातो कि बाकी विचार करायला त्यांना वेळच मिळत नाहि. त्यामुळे आपोआप चिडचिडहि कमी.
महेश नामजोशी
प्रतिक्रिया
सुंदर...
वाचतोय!
आवडले
पंच्चेचाळीसावं वरीस धोक्याचं....
थोडक्यात उतारवयात सुद्धा
पण तो ते 'निसर्ग नियम' ह्या
एकांगी कसा?
घरुन जरुर उत्तर देईन. आत्ता
मला वाटते की स्त्रीच्या
पेठकरकाका,
स्पष्टीकरण...
पण माझ्या हेतूंबद्द्ल शंका
सॉरी.
हाँ! हुश्श! ओक्के.
विधान
कोणाचा गैरसमज असल्यास.....
हॅहॅहॅ
व्यनीच्या मनीच्या गुजगोष्टी
+११११११११११११११११११.
स्त्री मुद्दाम चिडचिड करत
थोडा विचार करण्याची गरज आहे.
पेठकरकाका, मला वाटते तुमच्या
कांही मुद्दे...
पुरुषांच्या मानसिक समस्या
चर्चा व्हावी.
उत्तम लेख
खरेसाहेब, नेमकं चित्र रंगवलं आहे तुम्ही
असेच म्हणते.............
बाबौ! असं काही वाचलं की
काय गोळ्या वेग्रे घ्यायच्या
+१
विंट्रेश्टिंग ! वाचिंग !
रुणुझुणू यांनी मायबोलीवर
अदिती ताई
खरे साहेब, आपला लेख उत्तमच
खरे साहेब, आपला लेख उत्तमच
अपेक्षा
उदाहरण तितकसं पटलेलं नाहि ...
उत्तम लेख
:-)
काही हुशार नवरे कायम नवनवीन लग्ने करत
आपल्या संसाराची गाडी
हल्ली* अनेकदा डॉक्टर मंडळींना
आपले म्हणणे
खुलासा
बहुतेक धाग्यांमध्ये आणि
vulnerable- असुरक्षित किंवा हळव्या
मग तोंड दाबून होणारा कोंडमारा
Vulnerable.
याचा अनुभव मलाही आला आहे व
Pagination