Welcome to misalpav.com
लेखक: किलमाऊस्की | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सर्व घटनाक्रम फारच रोचक आहे पण तितकाच दुर्दैवी वाटतो. सामानाची यादी फारच काळजीपूर्वक व अनुभवाअंती बनवलेली दिसत आहे. हा भागही आवडला व पूढच्या भागाची उत्कंठा लागून राहिलेली आहे.

हा भागही माहीतीपुर्ण आहे. आजच्या जमान्यात स्टँपेडर्सच्या ऐवजी बबल्सवाले लोकं आलेत हाच फरक..डॉट कॉम असु नैतर हौसिंग असु.

आणि ते पाँझी / पिरॅमिड स्कीम वाले यांनीही बाजार उठवलाय नुसता.. :) जपानी गादी आठवली विजूभाऊंची..! लेख अतिशय उत्तम..

सुतारकामाशी काडीचाही संबंध नसल्याने ती यादी समजून घेतांना आणि मराठीत लिहिता लिहिता बोबडी वळली. उगाच गोंधळ नको म्ह्णून काही साहित्य जसंच्या तसं इंग्रजीतच लिहीलं.

छान आणि अत्यंत रोमांचक लिहिले आहे. धन्यवाद फोटू पण भारीच.

झटपट श्रीमंत व्हायच्या आशेने किती जणांनी आपली जीव गमावले आणि सुखाचा जीव दु:खात घातला देवजाणे!

उत्तम लेखमाला. अत्यंत रोचक. काही गोष्टी विशेषकरुन जाणवल्या (लेखनाबाबत नव्हे, घटनेबाबत): -१७०० मैल (सुमारे २७०० किलोमीटर) निव्वळ नदीतून प्रवास हा फार मोठा पल्ला वाटतो. २७०० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी हाताने बनवलेल्या छोट्या लाकडी होड्या ? जवळजवळ तीनहजार किलोमीटर अंतर अशा छोट्या बोटीने वल्हवत जात होते? छायाचित्रात बोटीला इंजिन वगैरे दिसत नाहीये. -सामानाची यादी पाहता प्रत्येक व्यक्तीसोबतचे वजन टनापेक्षा जास्त असावे. स्वतःच्या वजनाच्या दसपटीपेक्षा जास्त वजन आणि आकारमान वाहून नेणं हे मोठ्या बोटीने पहिल्या बंदरापर्यंत समजण्यासारखं आहे, पण त्यापुढे इतकं वजन घेऊन प्रवास करायचा तर प्रतिमाणशी पाच माणसे हा बोजा उचलायलाच लागली असणार. (पाच माणसे बोजा वहायला वापरली तर प्रतिमाणशी आवश्यक वस्तूंचं गणित बिघडणार. दाखवलेल्या लाकडी होडक्यांमधे यादीत निर्दिष्ट केलेल्या सामानासहित एक मनुष्य बसला तरी फार झालं असं वाटतं आहे. हे काही ग्रे एरियाज गोंधळात पाडणारे आहेत. पुन्हा एकदा.. लेखमाला उत्कृष्टच आहे.. हे तपशीलातले प्रश्न मनात उभे राहिले आहेत.

-१७०० मैल (सुमारे २७०० किलोमीटर) निव्वळ नदीतून प्रवास हा फार मोठा पल्ला वाटतो. २७०० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी हाताने बनवलेल्या छोट्या लाकडी होड्या ? जवळजवळ तीनहजार किलोमीटर अंतर अशा छोट्या बोटीने वल्हवत जात होते? छायाचित्रात बोटीला इंजिन वगैरे दिसत नाहीये.
तपशील लिहीतांना गडबड झाली थोडी. थोडं सविस्तर लिहायला हवं होतं. हो, हा फारच लांब पल्ला होता. खरं आहे. सिअ‍ॅटलवरून सेंट मायकल बंदर हा प्रवास मोठ्या जहाजातून होत असे. नंतर युकान नदी बेरींग समुद्राला जिथे मिळते त्या चिंचोळ्या पट्टीतून मोठी जहाजं जाणं अशक्य होतं. त्यामुळे या प्रवासाकरीता छोट्या आगबोटी असत. या अशा - https://lh6.googleusercontent.com/-F0BdoLG0RRA/UZUERleD_VI/AAAAAAAABE0/KfYBiKSR2BE/w435-h530-no/492px-1920_Steamboat_on_the_Yukon_River.jpg सोन्याच्या शोधासाठी या भागात येण्यार्‍या लोकसंख्येला या आगबोटी अपुर्‍या होत्या. त्यातच बर्‍याच लोकांना पुढचा प्रवास वेगळया, छोट्या आगबोटींनी करायचा आहे याची कल्पना नव्ह्ती. जे लोकं वेळेत सेंट मायकल बंदरात पोहोचले आणि ज्यांनी अशा आगबोटीत आधीच जागा राखून ठेवली होती त्यांचा प्रश्न नव्हता पण ज्यांना आगबोटीत जागा मिळाली नाही त्यांनी वर चित्रात दिसत आहेत तशा छोट्या शिडाच्या नावा बांधायला सुरवात केली. या अशा - https://lh4.googleusercontent.com/-vs7DvR2BeOs/UZK_KV5DyUI/AAAAAAAABDE/a5tUIPjXTb8/w220-h149-no/91e2e936f6da38fc6bb28313a662eaaf9f43e449.jpg
-सामानाची यादी पाहता प्रत्येक व्यक्तीसोबतचे वजन टनापेक्षा जास्त असावे. स्वतःच्या वजनाच्या दसपटीपेक्षा जास्त वजन आणि आकारमान वाहून नेणं हे मोठ्या बोटीने पहिल्या बंदरापर्यंत समजण्यासारखं आहे, पण त्यापुढे इतकं वजन घेऊन प्रवास करायचा तर प्रतिमाणशी पाच माणसे हा बोजा उचलायलाच लागली असणार. (पाच माणसे बोजा वहायला वापरली तर प्रतिमाणशी आवश्यक वस्तूंचं गणित बिघडणार. दाखवलेल्या लाकडी होडक्यांमधे यादीत निर्दिष्ट केलेल्या सामानासहित एक मनुष्य बसला तरी फार झालं असं वाटतं आहे.
हो हे खर आहे. याबाबत सविस्तर पुढ्च्या लेखात येईलच. इथे थोडक्यात लिहीते. बर्‍याच जणांनी सेंट मायकल बंदरात उतरल्यावर स्थानिक लोकांना सामान वहाण्याच्या कामगिरीवर ठेवलं. त्यातून बर्‍याच जाणांनी सोनं मिळवण्याच्या गर्दीत न धावताही बक्क्ळ पैसा जमा केला. पुढ्च्या भागांमधे येईलच सविस्तर. तुमचे पुनःश्च धन्यवाद. जे मुद्दे लिहितांना निसटून गेले ते तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने सविस्तर लिहिता आले.

या मालिकेचा पुढचा भाग लिहून तयार आहे. परंतु लेखात वापरायची बरीचशी चित्रं University of Washington Photos Collection विभागाच्या मालकीची असल्याने प्रताधिकारमुक्त नाहीत. इ-पत्राद्वारे संबधित अधिकार्‍यांना चित्रं वापरासंबधी परवानगी विचारली आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळताच पुढचा प्रकाशित करीन.