Welcome to misalpav.com
लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

भारतातील नेत्यांना लँड रीफॉर्म्समधे फार इंटरेस्ट होता. जमीनदारी मोडून काढायची होती पण पाकिस्तानच्या भाग्यविधात्यांनी भारतात न येऊन याही गोष्टीपासून मुक्ती मिळवली. त्यामुळे झरदारी अंकल, भुट्टो इ. लोकांचे काही हजार एकरचे जमीनदारी वैभव टिकून राहीले त्याला भारताची नजर लागू शकली नाही. भुट्टोंकडे अडीच लाख एकर चे वैभव होते. त्यांच्या मंत्रींडळातील काहींकडे मुघलकाळापासून पंचेचाळीस हजार एकर होते, आजही आहे. पाकिस्तान जन्मला तेव्हा तिथे टाटा नव्हते, बिर्ला नव्हते. पण या प्रतिकूलतेवर देशाने खूप कष्टाने मात केली. झरदारी असोत किंवा शरीफ बंधू यांनी पाणी, वीज यांच्या बिलाचे भय सामान्य माणसाप्रमाणे कधी भय बाळगले नाही इंपोर्ट ड्युटीलाही कधी भीक घातली नाही. अशा प्रकारे पैसा पैसा वाचवला आणि विकास करून दाखवला. आज या देशाने टाटा आणि बिर्ला यांचे बाप त्यांनी पैदा केलेत. जगातील सर्वात मोठा साखर कारखाना कोणाचा याचे उत्तर आहे नवाझ शरीफ यांचा. परराष्ट्रमंत्री खारुताई आणि त्यांचे कुटुंबीय यांनीही असेच कष्ट करून प्रगती साधली आहे या लोकांनी पाणी आणि वीजेच्या बिलाचा धसका कधीच घेतला नाही. निर्भयपणे प्रगती साधली.

प्रगती कसली? पाकिस्तान हा देश भिकेला लागला आहे. विजेची अपार् टंचाई, पाण्याबाबतीत भारतावर अवलंबित्व, कर्ज, संरक्षण खर्चात अमाप वाढ आणि ढासळलेली अर्थव्यवस्था हे तिथले चित्र. येत्या दशकात हा देश पुसला जावून त्याचे चार तुकडे होतील असा अंदाज व आशा.

मेलेल्याला काय मारायचे! पाजीस्तानसारख्या तद्दन फालतू देशाबद्द्ल आणि त्या देशातल्या फालतू जनतेबद्दल काहीही लिहायची गरज नाही.

पाजीस्तानसारख्या तद्दन फालतू देशाबद्द्ल आणि त्या देशातल्या फालतू जनतेबद्दल काहीही लिहायची गरज नाही. बर साहेब तुम्ही म्हणाल तसं

खबरदार!!!! या देशात अफजलखान, औरंगजेब, यांना काही वाईट म्हणाल तर... नुकत्याच लागलेल्या जावई शोधानुसार औरंगजेब हा सुफी संत होता औरंगजेब हा सुफी संत होता... सो अजुन असे काही शोध जाणत्या (?) राजाचे पाईक लावतील आणि तुमच्यावर भावना दुखावल्या म्हणुन "देशद्रोहाचा" खटला भरतील ----- रागा -----

@सो अजुन असे काही शोध जाणत्या (?) राजाचे पाईक लावतील आणि तुमच्यावर भावना दुखावल्या म्हणुन "देशद्रोहाचा" खटला भरतील>>> मि.वागळे याच्यावर आजचा सवाल घेतिल काय??? :)

>>>> नाही घेणार मि. वागळेंच्या द्रुश्तीन्व द्रुष्टीने तो व्यक्ती-स्वातंत्र्याचा प्रश्न असेल ---- रागा ----

हे मात्र खर आहे. औरंगजेबाला सुफी सन्गिताचि प्रचन्ड आवड होती. एवढेच नाही तर त्याचा मुख्य व्यवसाय 'टोप्या विणणे' (टोप्या घालणे नव्हे) होता.

व्हेरी गुड .! अगदी ब्रिटिश सर्क्यॅझम सारखं लिहिण्यात आपण यशस्वी झालेला आहात ! अभिनंदन !! ( वरील वाक्ये सरकॅस्टीक नाहीत . ) पण आपण आपल्या देशातल्या पाकिस्तान बद्दल चर्चा करुया का ह्यापेक्षा ? त्या पाकिस्तानवर लिहा पाहु एक असाच फक्कड लेख !! आमची आपली नम्र विनंती समजा ...

छान लिहिलय हो जोगसाहेब,
मागे वळून पाहताना वाटते, हे लोक भारतातच राहत असते तर या स्वातंत्र्याला मुकले असते. अशी प्रगती जनतेला करून घेता आली नसती.
अगदी पटेश..

चांगला आहे पण..... त्यातून आपल्या देशाच्या सुरुवातीच्या नेत्यांना अप्रत्यक्ष क्रेडिट मिळतंय ना !! ;)

ह्ये थत्तेचाचांना न्हेमी वायलंच कायतरी असतंय. असं गैरसोयीचं बोलायचं नस्तंया. कंदी सम्जायचं तुमास्नी. समूर घंटा टांगलीया न्हवं, ती वाजवा, 'शंभो हर हर' म्हणा नि व्हा बाजूला. आम्ही लायनीतले मागले सम्दे खोळांबलोय.

अगदी असेच म्हणतो. आंधळा पाकिस्तान व्देष सोडला तर लेखामधून काहीच हाती लागत नाही. वूडहाऊसचं एक प्रसिध्द वाक्य आहे- " I don't hate in the plural" बाकी आपली-आपली मते, विचार वगैरे वगैरे!!! ----------------------------------------------------

चला तर मग तुम्ही पाकप्रेमाबद्दल काही लिहा

डोळसपणापेक्षा तेही आपली शेजारी राष्ट्र आहे आणि भारत आणि पाकिस्तानमधील शांतता प्रेमी जर एक आले तर भारत ही आजही महासत्ता होवू शकते. भारत, पाक, बांगला, अफगाण, नेपाळ, म्यानमार यांनी व्यापारी महासंघ बनवायला हवा.

संघर्ष कमी झाल्यास संरक्षणावरचा तोच खर्च इतर चांगल्या कामांसाठी वापरता येइल

अफजलखान, अकबर, मोघल...... एवढं ५०० वर्षापूर्वीचं शिळं पाकं का चघळताय? ते नवीन कुणी तरी वंदे मातरम नको वगैरे बोलले... त्याच्यावर लिवा आता. पाक्यानी मंदीर मोडून हॉटेल बांधून च्यापान्याची तरी सोय केली.. तुम्ही मशीद पाडून देऊळ बांधणार होते ना? त्याचे काय झाले?

५०० वर्षे कशाला आजच्याच अ‍ॅचिवमेंटस लिहिल्या आहेत ना !